बदक की गरुड ? निर्णय तुमचा आहे. 🦅🦆🦅🦆🦅🦆🦅🦆🦅🦆🦅🦆🦅🦆 एकदा विमानतळावर असताना माझी एका टॅक्सी चालकाशी गाठ पडली आणि त्याच्या टॅक्सीत सर्वप्रथम माझ्या नजरेस एक गोष्ट पडली ती म्हणजे, एक पाटी जि म्हणजेच्यावर लिहिले होते की *बदक की गरुड* *तुमचे तुम्हीच ठरवा.* दुसरी गोष्ट जाणवली ती स्वच्छ आणि चकचकीत गाडी, ड्रायव्हर अतिशय टापटीप आणि स्वच्छ आणि इस्त्रीच्या ड्रेस मध्ये होता. स्वच्छ पांढरा इस्त्रीचा शर्ट आणि पँट वर टाई. ड्रायव्हर स्वतः उतरून गाडीबाहेर आला आणि त्याने माझ्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला. आणि बोलला, " माझे नाव जॉन आहे. आणि मी तुमचा वाहक आहे. जो पर्यंत मी तुमचे समान गाडीच्या डिकीत ठेवतो तोपर्यंत आपण माझे हे मिशन कार्ड वाचावे सर." त्या कार्ड वर लिहिले होते, *जॉन चे मिशन* *माझ्या ग्राहकांना लवकरात लवकर, सुरक्षित* *आणि रास्त दरात त्यांच्या इच्छित स्थळी* *पोहचवणे आणि तेसुद्धा आल्हाददायक आणि* *मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये.* मी भारावून गेलो होतो. गाडीतील आतील बाजूही तेवढीच टापटीप आणि स्वच्छ, नीटनेटकी होती. जॉन ने मला विचारले. "आपल्याला कॉफी घ्यायला आवडेल काय?"...