महाराष्ट्र माहिती

आपणास माहित आहे का ?
( महाराष्ट्र)
🪵 क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागतो.

🪵महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी : ८०० कि.मी.

🪵महाराष्ट्राची दक्षिण-उत्तर लांबी : ७०० कि.मी.

🪵महाराष्ट्राला लाभलेला समुद्रकिनारा : ७२० कि.मी.

🪵महाराष्ट्रातील एकूण ७ जिल्ह्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे.

🪵महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्याला समांतर व दक्षिणोत्तर पसरलेली पर्वतरांग म्हणजेच 'सह्याद्री' किंवा 'पश्चिम घाट' होय.

🪵सह्याद्रीची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ९०० ते १२०० मिटरच्या दरम्यान आहे. → सह्याद्रीच्या पूर्वेस महाराष्ट्र पठार (दख्खनच्या पठाराचा भाग) पसरलेले आहे. महाराष्ट्राचा भूभाग मुख्यतः 'बेसॉल्ट' म्हणजेच 'अग्निजन्य' खडकांनी बनलेला आहे.

🪵 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा : अहमदनगर 
🪵महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा : मुंबई शहर

🪵महाराष्ट्रातील सर्वात जास्त जिल्ह्यांच्या सीमा लागून असलेला जिल्हा : अहमदनगर 
🪵महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्ह्यांच्या सीमा लागून असलेले शेजारील राज्य : मध्यप्रदेश

🪵 महाराष्ट्रातील सर्वात कमी जिल्ह्यांच्या सीमा लागून असलेले शेजारील राज्य : गोवा


महाराष्ट्राच्या सीमेवरील जिल्हे :

शेजारील राज्य / समुद्र.  .  -    जिल्हे

१. गुजरात  - नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर

२. दादरा व नगर हवेली. - पालघर

३. मध्यप्रदेश. - नंदुरबार, धुळे बुलडाणा, जळगाव, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदीया

४. छत्तीसगढ - गोंदिया व गडचिरोली

५. तेलंगणा. - गडचिरोली, चंद्रपुर, यवतमाळ व नांदेड

६. कर्नाटक - नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग

७. गोवा - सिंधुदुर्ग

८. अरबी समुद्र  - मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर








Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

जालना नवोदय कट ऑफ लिस्ट 2025

इतिहासात पहिल्यांदाच नवोदय परीक्षामधील मुलांचे मार्क कळत आहेत. बघा यावर्षी चे मार्क्स