इस्रो मध्ये संधी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना

तुमचा पाल्य जर इयत्ता नववीच्या वर्गात शिकत असेल, तर त्याला भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. बाल शास्त्रज्ञांसाठीचा युविका म्हणजे युवा विज्ञानी कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. १५ ते २६ मे दरम्यान इस्रोच्या केंद्रांवर हा कार्यक्रम पार पडेल.

 विद्यार्थ्यांना अवकाश विज्ञान, तंत्रज्ञान, नवे शोध आणि करिअरच्या वाटांबद्दल लहान वयातच योग्य दिशा मिळावी म्हणून या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. इस्रोच्या अधिकृत संकेतस्थळावर या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजेनिवड प्रक्रियेत ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना १५ टक्के अधिक गुण मिळणार असून, याचा थेट फायदा जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना होणार आहे. गुणवत्ता यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या जाण्या-येण्याचा व राहण्याचा खर्च इस्रोच्या वतीने करण्यात येणार आहे.
 *महत्त्वाच्या तारखा -* 
 • २० मार्च - अर्ज भरण्यास सुरुवात
 • ३ एप्रिल - अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
 • १० एप्रिल - पहिली निवड यादी
 • २० एप्रिल - दुसरी निवड यादी
 • १४ मे - विद्यार्थी इस्रोच्या विविध केंद्रांवर हजर होतील.
 १५ मे - २६ मे - युविका विज्ञान शिबीर.
१. इयत्ता आठवीतील किंवा शेवटच्या परीक्षेतील गुण - ५०
 टक्के
 २. ऑनलाइन क्विझ मधील कामगिरी - १० टक्के
 ३. विज्ञान प्रदर्शनात सहभाग - १७ टक्के
 ४. ऑलिम्पियाड परीक्षेतील रँक - ११ टक्के
 ५. क्रीडा स्पर्धांचे विजेते - ११ टक्के
 ६. स्काऊट आणि गाईड / एनसीसी / एनएसएस - ५ टक्के
 ७. ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत जिल्हा परिषद किंवा इतर शाळेतील विद्यार्थी - १५ टक्के.
 *इथे पार पडणार शिबीर -* 
 १. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ रिमोट सेंसिंग, डेहराडून
 २. विक्रम साराभाई स्पेस सेंटर, तिरुअनंतपुरम
 ३. सतीश धवन स्पेस सेंटर, श्रीहरिकोटा
 ४. यू. आर. राव सटेलाईट सेंटर, बेंगळुरू
 ५. स्पेस अॅप्लिकेशन सेंटर, अहमदाबाद
 ६. नॅशनल रिमोट सेन्सिग सेंटर, हैदराबाद
 ७. नॉर्थ ईस्ट स्पेस अॅप्लिकेशन सेंटर, शिलाँग
अधिक माहिती आणि *अर्जासाठीचे संकेतस्थळ* 

Comments

Popular posts from this blog

जालना नवोदय कट ऑफ लिस्ट 2025

नवोदय / स्कॉलरशिप / मंथन परीक्षेसाठी महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका

इतिहासात पहिल्यांदाच नवोदय परीक्षामधील मुलांचे मार्क कळत आहेत. बघा यावर्षी चे मार्क्स