विद्यार्थी पालक सुचना

गुरूजनांना विनंती :- खालील आवाहन इ. १ ली ते इ.१० वीतील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या निदर्शनास आणाव्यात..

पालकांसाठी सुट्टीतील गृहपाठ

१) रोज सकाळ-संध्याकाळचे जेवण आपल्या मुलांसोबत करा. अन्न वाया जावू देवू नका. त्यांचे ताट त्यांना धुवू द्या.

2) भाजी निवडणे, झाडणे-लोटणे, कपडे धुणे अशी कामे त्यांना करण्यास प्रोत्साहन द्या.

३) शेजारी रहाणाऱ्या कुटूंबाकडे जावून त्यांच्याशी जवळीक वाढविण्याची संधी द्या. दुसऱ्यांच्या मुलांना आपल्या घरी बोलवा.

(४) आजी-आजोबांसोबत गप्पा मारण्याची संधी द्या. त्यांच्या सोबत मुलांचे फोटो काढा. 

५) आपल्या कामाच्या ठिकाणी मुलांना घेवून जा. आपण किती कष्ट करतो ? कोणते काम करतो ? हे मुलांना कळु द्या. त्याची माहिती मुलांना द्या.

६) स्थानिक यात्रा, बाजार अशा ठिकाणी मुलांना सोबत न्या. 

७) आपल्या लहानपणीच्या आठवणी, आपल्या पूर्वजांची माहिती मुलांना सांगा.

८) मुलांच्या प्रश्नांची उत्तरे द्या. त्यांना बोलते करा.

९) मुलांना इयत्तेनुसार १ ते ३ तास अभ्यासासाठी घरातील नेमून दिलेल्या ठिकाणी बसवा.

१०) मुलांना खेळु द्या, पडु द्या, कपडे खराब होवु द्या.

 ११) मुलांना किमान एकतरी पुस्तक विकत घेवुन द्या.

 १२) स्वतः मोबाईचा मर्यादित वापर करा.

१३) मुलाचा चेहरा दोन्ही हातात धरून त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघा. ईश्वराने किती अनमोल
भेट आपणास दिली आहे. याचा आनंद घ्या. 

१४) 'मुलाचे सर्व हट्ट पुरविणे' म्हणजे चांगले पालकत्व, ही खुळचट कल्पना डोक्यातून काढून टाका.

१५) आम्ही शिक्षक आणि तुम्ही पालक मिळून उद्याचे सुजाण नागरिक घडवू या.




Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

जालना नवोदय कट ऑफ लिस्ट 2025

इतिहासात पहिल्यांदाच नवोदय परीक्षामधील मुलांचे मार्क कळत आहेत. बघा यावर्षी चे मार्क्स