Posts

Showing posts from July, 2020

सर्व मान्यवरांविषयी थोडक्यात

Image
                    युवा शास्त्रज्ञ अजिंक्य कोत्तावार                                         ( अध्यक्ष - ज्ञान फाउंडेशन ) Founder and President at Foundation Director research at softsense techno service India private limited Former CEO at technological services at Yavatmal Work at national institute of technology silchar महाराष्ट्राचा रेंचो  विविध अठरा पेटंटचा हक्क प्राप्त करणारा भारतातील एकमेव युवा संशोधक झी युवा सन्मान 2017 या पुरस्काराने सन्मानित  वयाच्या  26 व्या वर्षी अठरा पेटंट मिळवणारा पहिला भारतीय. इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद एकाच दिवसात चार पेटंट करून आयझॅक न्यूटन आणि अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या रेकॉर्ड सोबत बरोबरी. विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारोपयोगी ज्ञान मिळवावे यासाठी ज्ञान फाऊंडेशन ची स्थापना. भारताचे  भविष्य उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ...

विज्ञानाचे प्रयोग - तयार करा ज्वालामुखी घरी

Image
ज्वालामुखी तयार करा घरात साहित्य : मातीचा गोळा किंवा कागदाचा लगदा,बेकिंग पावडर, व्हिनेगर, खाण्याचा लाल व नारिंगी रंग, गोंद, लाकडाचा भुसा वएखादा पाट. कृती : सर्वप्रथम माती अथवा कागदाच्या लगद्यापासून एक छानसा डोंगर तयार करा. त्यालाथोडे सुकू द्या. नंतर त्यावर डिंकाच्या साहाय्याने लाकडी भुसा चिकटवा. डोंगराच्या वरील भागात एक छोटासा खड्डा करा. हा झाला तुमचा ज्वालामुखी पर्वत. आता तुम्ही आणलेली बेकिंग पावडर व रंग व्यवस्थित एकत्र करा व चमच्याने ते मिश्रण वरच्या खड्डयात टाका. आता तुमच्या सर्व मित्रांना बोलवा. ज्या क्षणी दोनचमचे व्हिनेगर तुम्ही खड्डयात ओताल त्याक्षणी लाव्हा उसळून बाहेर येईल. हे बघताना खूप मजा येईल. मात्र मित्रांनो, ही सर्व क्रिया होताना तुम्हाला एक घाणेरडा वास सहन करावा लागेल. आंता हा घाण वास का येतो ते मात्र तुमच्या विज्ञानाच्या शिक्षकांना अवश्य विचारा.

विज्ञानाचे प्रयोग - तयार करा हायड्रोजनचा फुगा

Image
             तयार करा हायड्रोजनचा फुगा साहित्य : बाटली, पाणी, ड्रेनेक्स, फुगे, दोरी. कृती : एक उभी लहान तोंडाची बाटली घ्या. बाटलीत एक तृतीयांश उंचीपर्यंत पाणी भरा. बाटलीच्या तोंडावर बरोबर बसेल असा एक फुगा घ्या. कात्रीने ड्रेनेक्सची पुडीच्या कोपऱ्याला काप द्या. ड्रेनेक्सच्या पूडीतून सुमारे दोन ग्रॅम पूड बाटलीतल्या पाण्यात टाका. बाटलीच्या तोंडावर फुगा अडकवा. फुगा फुगला की दोरीने बांधून घ्या. हा फुगा हवेत तरंगतो. असे का झाले? : ड्रेनेक्समध्ये दाहक सोडा आणि अॅल्युमिनियमचा चुरा असतो. त्याच्या क्रियेने हैड्रोजन वायू तयार होतो. हा प्रयोग आई बाबा वा मोठी ताई दादा यांच्या मदतीने करा.ड्रेनेक्स काळजीपूर्वक हाताळा. ड्रेनेक्स ऐवजी व्हीनेगर आणि बेकींग सोडा वापरून देखिल हा प्रयोग करता येईल.

विज्ञानाचे प्रयोग - इंद्रधनुष्य बनवा घरी

Image
                     इंद्रधनुष्य बनवा घरी साहित्य : पसरट पातेले किंवा परात, पाणी, छोटा आरसा कृती : घराबाहेर उन्हात एक पसरट पातेले किंवा परात ठेवा. त्याच्या आत एक छोटा आरसा ठेवा. आरशातून परावर्तित झालेल्या उन्हाचा कवडसा घरात भिंतावर पडेल अशा पद्धतीने आरशाची जागा पक्की करा. पसरट पातेल्यात हळूहळू पाणी घालून पातेले पाण्याने पूर्ण भरा. घरात पडलेला कवडसा इंद्रधनुष्यासारखा सप्तरंगी झालेला दिसेल. सूर्यप्रकाश अनेक रंगछटांचा बनलेला असतो. पाण्यात शिरताना प्रत्येक रंगछटेच्या किरणाची दिशा वेगवेगळ्या प्रमाणात बदलते. आरशावरून परावर्तित झाल्यानंतर पुन्हा पाण्याबाहेर पडताना प्रत्येक रंगछटेच्या किरणाची दिशा वेगवेगळ्या प्रमाणात आणखी थोडी बदलते. त्यामुळे रंगछटा अलग झालेल्या दिसतात...

विज्ञानाचे प्रयोग - पानातील रहस्य

Image
                         पानातील रहस्य साहित्य - झाडाची पाने मोठ्या  तोंडाच्या बाटल्या. कृती : वीतभर उंचीची मोठ्या तोंडाची बाटली घ्या. तुमच्या आसपास असणारी झाडे न्याहाळा. ज्या झाडांची पाने दोन सेंटिमीटरपेक्षा लांब आहेत त्याची तपासणी करा. पान न मोडता वाकवून पानाच्या खालच्या बाजूला पाहा. ज्या पानाखाली पुंजक्यात घातलेली अंडी दिसतील अशी एक-दोन पाने तोडून घ्या. बाटलीत उभी ठेवा. झाकण लावा. काही काळाने अंड्यातून अळ्या बाहेर आलेल्या दिसतील. त्या वेळी त्याच प्रकारची आणखी एक-दोन पाने बाटलीत भरा. झाकण लावा. निरीक्षण करा. अळ्या वाढतील, कोष करतील, कोषाचे रंग बदलतील, किडे बाहेर येतील. विशिष्ट झाडावर विशिष्ट किडे आढळतील.

विज्ञानाचे प्रयोग - पाणी ओढून घेणारा ग्लास

Image
             पाणी ओढून घेणारा ग्लास साहित्य : एक छोटे खोलगट भांडे किंवा बाऊल, एक कप, पाणी, एक रिकामा ग्लास, पाण्यात विरघळणारे रंग किंवा शाई (वॉटरप्रूफ इंक) काडीपेटी, एक मोठी मेणबत्ती किंवा एकत्र बांधलेल्या ४-५ छोट्या मेणबत्त्या. कृती : सर्वप्रथम बाऊलमध्ये एक मेणबत्ती (जी वर ग्लास ठेवल्यानंतर पेटती राहील अशी) किंवा छोट्या एकत्र बांधलेल्या मेणबत्त्या ठेवा. ग्लासात एक ते दीड कप पाणी टाका. यात विरघळणारा कोणताही रंग टाका व ते मिश्रण हलवा. हे रंगीत पाणी बाऊलमध्ये टाका. ग्लास व्यवस्थित कापडाने स्वच्छ करून घ्या. आता मेणबत्ती पेटवा आणि लगेचच काचेचा स्वच्छ केलेला रिकामा ग्लास त्यावर पालथा ठेवा व निरीक्षण करा. = काय होईल ? मेणबत्ती विझून जाईल व भांड्यातील सर्व रंगीत पाणी ग्लासात खेचले जाईल. असे का झाले ?  मेणबत्तीच्या उष्णतेने ग्लासाच्या आतील तापमानात वाढ झाली. ग्लासाच्या आतील या हवेचा संयोग आतील पाण्याशी होताच याचे संपृक्त वाफेत रूपांतर होते. जेव्हा मेणबत्ती विझते तेव्हा आतील तापमान कमी होते आणि या संपूक्त वाफेचा दाब कमी होतो.