विज्ञानाचे प्रयोग - तयार करा हायड्रोजनचा फुगा

             तयार करा हायड्रोजनचा फुगा

साहित्य : बाटली, पाणी, ड्रेनेक्स, फुगे,
दोरी.
कृती : एक उभी लहान तोंडाची बाटली
घ्या. बाटलीत एक तृतीयांश उंचीपर्यंत पाणी
भरा. बाटलीच्या तोंडावर बरोबर बसेल असा
एक फुगा घ्या. कात्रीने ड्रेनेक्सची पुडीच्या
कोपऱ्याला काप द्या. ड्रेनेक्सच्या पूडीतून
सुमारे दोन ग्रॅम पूड बाटलीतल्या पाण्यात
टाका. बाटलीच्या तोंडावर फुगा अडकवा.
फुगा फुगला की दोरीने बांधून घ्या. हा फुगा
हवेत तरंगतो.
असे का झाले? : ड्रेनेक्समध्ये दाहक
सोडा आणि अॅल्युमिनियमचा चुरा असतो.
त्याच्या क्रियेने हैड्रोजन वायू तयार होतो. हा
प्रयोग आई बाबा वा मोठी ताई दादा यांच्या
मदतीने करा.ड्रेनेक्स काळजीपूर्वक हाताळा.
ड्रेनेक्स ऐवजी व्हीनेगर आणि बेकींग सोडा
वापरून देखिल हा प्रयोग करता येईल.

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

जालना नवोदय कट ऑफ लिस्ट 2025

इतिहासात पहिल्यांदाच नवोदय परीक्षामधील मुलांचे मार्क कळत आहेत. बघा यावर्षी चे मार्क्स