विज्ञानाचे प्रयोग - तयार करा ज्वालामुखी घरी
ज्वालामुखी तयार करा घरात
साहित्य : मातीचा गोळा किंवा कागदाचा
लगदा,बेकिंग पावडर, व्हिनेगर, खाण्याचा
लाल व नारिंगी रंग, गोंद, लाकडाचा भुसा
वएखादा पाट.
कृती : सर्वप्रथम माती अथवा कागदाच्या
लगद्यापासून एक छानसा डोंगर तयार करा.
त्यालाथोडे सुकू द्या. नंतर त्यावर डिंकाच्या
साहाय्याने लाकडी भुसा चिकटवा.
डोंगराच्या वरील भागात एक छोटासा खड्डा
करा. हा झाला तुमचा ज्वालामुखी पर्वत.
आता तुम्ही आणलेली बेकिंग पावडर व
रंग व्यवस्थित एकत्र करा व चमच्याने
ते मिश्रण वरच्या खड्डयात टाका. आता
तुमच्या सर्व मित्रांना बोलवा. ज्या क्षणी
दोनचमचे व्हिनेगर तुम्ही खड्डयात ओताल
त्याक्षणी लाव्हा उसळून बाहेर येईल. हे
बघताना खूप मजा येईल. मात्र मित्रांनो, ही
सर्व क्रिया होताना तुम्हाला एक घाणेरडा
वास सहन करावा लागेल. आंता हा घाण
वास का येतो ते मात्र तुमच्या विज्ञानाच्या
शिक्षकांना अवश्य विचारा.
Comments
Post a Comment