सर्व मान्यवरांविषयी थोडक्यात

          





         युवा शास्त्रज्ञ अजिंक्य कोत्तावार
                                ( अध्यक्ष - ज्ञान फाउंडेशन )

Founder and President at Foundation

Director research at softsense techno service India private limited

Former CEO at technological services at Yavatmal

Work at national institute of technology silchar

महाराष्ट्राचा रेंचो  विविध अठरा पेटंटचा हक्क प्राप्त करणारा भारतातील एकमेव युवा संशोधक

झी युवा सन्मान 2017 या पुरस्काराने सन्मानित 

वयाच्या  26 व्या वर्षी अठरा पेटंट मिळवणारा पहिला भारतीय.

इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद


एकाच दिवसात चार पेटंट करून आयझॅक न्यूटन आणि अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या रेकॉर्ड सोबत बरोबरी.

विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारोपयोगी ज्ञान मिळवावे यासाठी ज्ञान फाऊंडेशन ची स्थापना.

भारताचे  भविष्य उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या युवा शास्त्रज्ञाला Coastal Mind चा सलाम  

अजिंक्य सरांची APB माझा मधील मुलाखत.👇





----------------------------------------------------------------------------


            श्री. अजय किंगरे
                  (अध्यक्ष , मैत्र मांदियाळी )

  प्रकाश वाटा पुस्तक वाचून अनेकांच्या जीवनात प्रकाश पाडणारा एक ध्येयवेडा इंजिनीयर.

मैत्र मांदियाळी प्रतिष्ठानची स्थापना करून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आशेचा किरण घेऊन येणारा तरुण.

मुले आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून अजय किंगरे यांनी आतापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना राहण्यासाठी, मेस साठी तसेच इतर शैक्षणिक फीसाठी मदत केली आहे.

यांच्या मदतीमुळे  विद्यार्थी आज class 2 , class 3 या पदावर कार्यरत आहेत.

मैत्र  मांदियाळीने शैक्षणिक पालकत्व घेतलेल्या श्री यशवंत थोरात हे सध्या मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत आहेत तसेच  श्री.गणेश साळवे हे औरंगाबाद येथे एक्साईज इन्स्पेक्टर पदावर कार्यरत.

अनेकांच्या जीवनात ध्रुवतारा ठरलेल्या, हजारो विद्यार्थ्यांचा भाऊ (दादा) अजय किंगरे यांना Coastal Mind कडून मानाचा मुजरा.


----------------------------------------------------------------------


                     डॉ. बळीराम बागल
   ( संचालक - संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल )
(संचालक संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जालना)

एका शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन आपल्या मेहनतीच्या व बुद्धीच्या जोरावर जालना जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात टॉप फाइव्ह मध्ये ज्यांच्या हॉस्पिटलची गणना होते असे आदरणीय डॉ. बळीराम बागल.

रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा असे समजून जालना जिल्ह्यातील अनेक रुग्णांचे कैवारी

जिल्ह्यातील रुग्णांना अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात यासाठी अविरत प्रयत्न करणारे डॉक्टर बागल.

माजी विद्यार्थी फाउंडेशनची स्थापना करून विद्यार्थ्यांना आवश्यक ते शैक्षणिक साहित्य , मार्गदर्शन पुरविणारे डॉक्टर बागल.

विद्यार्थ्यांना ओपीडी मध्ये  50 टक्के सवलत देऊन सामाजिक दातृत्व निभावणारे डॉक्टर.

विद्यार्थ्यांनी आपल्या गुणांचा विकास करून आवडत्या क्षेत्रात करिअर करावे असे आवर्जून सांगणारे व त्यासाठी प्रयत्न करणारे डॉक्टर बागल यांना Coastal Mind  तर्फे मानाचा मुजरा


----------------------------------------------------------------------------




                     श्री.भास्कर  पडूळ
( अध्यक्ष - ISRSD, Chairman  - BPG Farmer Group)

( आधुनिक शेतीविषयी 27 देशातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे आंतरराष्ट्रीय व्याख्याते )
 
अत्यंत सामान्य कुटुंबात जन्म घेऊन आजपर्यंत 27 देशात शेती विषयक व्याख्यान देणारे असामान्य व्यक्तिमत्व

ISRSD च्या द्वारे अनेक रुग्णांना सेवा देणारे देवदूत

BPG FARMER ची स्थापना करून हजारो शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी अहोरात्र प्रयत्न करणारा बळीराजा.

साऊथ कोरिया येथे झालेल्या क्लायमेट चेंज अडोप्शन अंड इंटरनेशनल अग्री एक्जीबिशन मध्ये भारताचे नेतृत्व करणारे 
एक असामान्य नेतृत्व


क्लायमेट चेंज, वॉटर शेड यासारख्या अनेक परिषदांमध्ये भाग घेऊन आपले विचार परखडपणे मांडणारे  एक विचारवंत.





---------------------------------------------------------------------------


              श्री. संदीप शिंदे
               (पोलीस उपनिरीक्षक औरंगाबाद )

पोलीस भरतीमध्ये नियुक्त होऊन त्याच पदावर न थांबता अत्यंत  कमी कालावधीमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारणारे PSI संदीप शिंदे.

अनेक गुन्ह्यांचा तपास करून सामान्यांना न्याय देणारे  व्यक्तीमत्व 


पोलीस अधीक्षक( SP)  यांनी reward देऊन ज्यांच्या कार्याचा गौरव केला असे PSI संदीप शिंदे  यांना Coastal Mind चा मानाचा मुजरा.





----------------------------------------------------------------------------


                 श्री.योगेश देशमाने
             (संचालक G-Champ Abacus)
                (Aeronautical engineer)

G-Champ Abacus ची स्थापना करून शेकडो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणारे श्री योगेश देशमाने.

अबॅकस सारख्या अत्यंत उपयुक्त  अशा विषयाला हात घालून अत्यंत सोप्या पद्धतीने सर्वसामान्यांच्या घराघरात पोहचविले.

मॅनेजमेंट कसं करावं यासाठी मॅनेजमेंट क्षेत्रात एक आदर्श व्यक्तिमत्व.

फक्त श्रीमंतांच  शिक्षण समजल्या जाणाऱ्या अबॅकस ला गावागावात नेऊन सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवून राष्ट्राचे आधारस्तंभ बौधिकदृष्ट्या सक्षम करणारे  श्री योगेश देशमाने सर.
आदरणीय देशमाने सरांना Coastal Mind  चा मानाचा मुजरा.




----------------------------------------------------------------------------



                   श्री.प्रकाश गाताडे
                 (अध्यक्ष , उमेद फाउंडेशन )

सरकारी नोकरी असून सुद्धा समाजातील उपेक्षित , वंचित घटकांसाठी अहोरात्र सेवा करणारा ध्येयवेडा तरुण.

 शाहू महाराजांतर्फे समाजसेवेचा वारसा लाभलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात सामाजिक कार्य मनापासून पुढे चालु ठेवणारा एक धुरंधर तरुण 

उमेद फाउंडेशनची स्थापना करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणारा एक शिक्षक.

केवळ शैक्षणिक क्षेत्रातच  नव्हे तर  दरवर्षी आपल्या मित्रांच्या मदतीने वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारा   एक  आदर्श शिक्षक.

कचरावेचक ,स्थलांतरीत मूल , ऊसतोदणी मजुरांची मूल यासाठी -  उमेद शिक्षण केंद्र , ज्ञानांगण , ज्ञानसेतु , मायेचं घर इ अभिनव शिक्षण प्रयोग राबवून अनेक मुलाना शिक्षण प्रवाहात आणणारे एक असामान्य शिक्षक ,

IBN Lokmat  ने ज्यांच्या लॉक डाऊन मधील दुर्गम भागातील गावात  *शिक्षण आले दारी*  या उपक्रमाची  दखल घेतली असे नवोपक्रम शील  शिक्षक 

श्री. प्रकाश गाताडे सरांना Coastal Mind तर्फे मानाचा मुजरा...


----------------------------------------------------------------------------


दिनांक 15 जुलै 2020

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

1000 "OPPOSITE" Words in English