विज्ञानाचे प्रयोग - पाणी ओढून घेणारा ग्लास
पाणी ओढून घेणारा ग्लास
साहित्य : एक छोटे खोलगट भांडे किंवा
बाऊल, एक कप, पाणी, एक रिकामा ग्लास,
पाण्यात विरघळणारे रंग किंवा शाई (वॉटरप्रूफ
इंक) काडीपेटी, एक मोठी मेणबत्ती किंवा एकत्र
बांधलेल्या ४-५ छोट्या मेणबत्त्या.
कृती : सर्वप्रथम बाऊलमध्ये एक मेणबत्ती (जी
वर ग्लास ठेवल्यानंतर पेटती राहील अशी) किंवा
छोट्या एकत्र बांधलेल्या मेणबत्त्या ठेवा. ग्लासात
एक ते दीड कप पाणी टाका. यात विरघळणारा
कोणताही रंग टाका व ते मिश्रण हलवा. हे रंगीत
पाणी बाऊलमध्ये टाका. ग्लास व्यवस्थित कापडाने
स्वच्छ करून घ्या. आता मेणबत्ती पेटवा आणि
लगेचच काचेचा स्वच्छ केलेला रिकामा ग्लास
त्यावर पालथा ठेवा व निरीक्षण करा.
= काय होईल ? मेणबत्ती विझून जाईल व
भांड्यातील सर्व रंगीत पाणी ग्लासात खेचले
जाईल.
असे का झाले ?
मेणबत्तीच्या उष्णतेने
ग्लासाच्या आतील तापमानात वाढ झाली.
ग्लासाच्या आतील या हवेचा संयोग आतील
पाण्याशी होताच याचे संपृक्त वाफेत रूपांतर होते.
जेव्हा मेणबत्ती विझते तेव्हा आतील तापमान कमी
होते आणि या संपूक्त वाफेचा दाब कमी होतो.
Comments
Post a Comment