विज्ञानाचे प्रयोग - इंद्रधनुष्य बनवा घरी

                     इंद्रधनुष्य बनवा घरी


साहित्य : पसरट पातेले किंवा परात, पाणी, छोटा
आरसा
कृती : घराबाहेर उन्हात एक पसरट पातेले किंवा
परात ठेवा. त्याच्या आत एक छोटा आरसा ठेवा.
आरशातून परावर्तित झालेल्या उन्हाचा कवडसा
घरात भिंतावर पडेल अशा पद्धतीने आरशाची जागा
पक्की करा. पसरट पातेल्यात हळूहळू पाणी घालून
पातेले पाण्याने पूर्ण भरा. घरात पडलेला कवडसा
इंद्रधनुष्यासारखा सप्तरंगी झालेला दिसेल.
सूर्यप्रकाश अनेक रंगछटांचा बनलेला असतो.
पाण्यात शिरताना प्रत्येक रंगछटेच्या किरणाची
दिशा वेगवेगळ्या प्रमाणात बदलते. आरशावरून
परावर्तित झाल्यानंतर पुन्हा पाण्याबाहेर पडताना
प्रत्येक रंगछटेच्या किरणाची दिशा वेगवेगळ्या
प्रमाणात आणखी थोडी बदलते. त्यामुळे रंगछटा
अलग झालेल्या दिसतात...

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

1000 "OPPOSITE" Words in English