विज्ञानाचे प्रयोग - पानातील रहस्य
पानातील रहस्य
साहित्य - झाडाची पाने मोठ्या
तोंडाच्या बाटल्या.
कृती: वीतभर उंचीची मोठ्या तोंडाची
बाटली घ्या. तुमच्या आसपास असणारी
झाडे न्याहाळा. ज्या झाडांची पाने दोन
सेंटिमीटरपेक्षा लांब आहेत त्याची
तपासणी करा. पान न मोडता वाकवून
पानाच्या खालच्या बाजूला पाहा. ज्या
पानाखाली पुंजक्यात घातलेली अंडी
दिसतील अशी एक-दोन पाने तोडून
घ्या. बाटलीत उभी ठेवा. झाकण
लावा. काही काळाने अंड्यातून अळ्या
बाहेर आलेल्या दिसतील. त्या वेळी
त्याच प्रकारची आणखी एक-दोन
पाने बाटलीत भरा. झाकण लावा.
निरीक्षण करा. अळ्या वाढतील, कोष
करतील, कोषाचे रंग बदलतील, किडे
बाहेर येतील. विशिष्ट झाडावर विशिष्ट
किडे आढळतील.
Comments
Post a Comment