विज्ञान भारती Exam 6th to 12th

महोदय, विज्ञान भारती ही आपल्या देशातील सर्व राज्यांमध्ये व अन्य ६ देशामध्ये पसरलेली चळवळ आहे आणि या अंतर्गत स्वदेशी भावनेशी निगडीत विज्ञाननिष्ठ असे विविध कार्यक्रम उपक्रम या मार्फत राबवले जातात ( www.vibhaindia.org ). त्यातील एक उपक्रम म्हणजे "विद्यार्थी विज्ञान मंथन" (VVM) ही वैज्ञानिक प्रतिभा / प्रज्ञा शोध परीक्षा, जी एनसीइआरटी (NCERT) व विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाते.या परीक्षेची नोंदणी सुरू झाली आहे . या परीक्षेला ४० प्रश्न हे भारताचे विज्ञान विश्वातील योगदान, बिरबल साहनी यांचे जीवनकार्य व भारतीय स्वतंत्रता संग्राम आणि विज्ञान या विषयावर असून ५० प्रश्न पाठ्यक्रमावर व १० प्रश्न तर्कावर आधारित असतील. सर्व प्रश्न बहू पर्यायी असतील. पहिल्या ४० प्रश्नासाठी लागणारी पुस्तके विविमं च्या वेबसाईट ( https://vvm.org.in ) वर मिळतील. ही परीक्षा दरवर्षी इयत्ता ६ वी ते ११ च्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. सर्व नोंदणी प्रक्रिया तसेच प्राथमिक परीक्षाही ऑनलाईन (ONLINE) असते. ...