बुद्धिमत्ता _ Gardner
३.२.५ बहुविध बुद्धिमत्ता - (गार्डनर)
गार्डनर हे प्रोजेक्ट झिरो या कला शिक्षणविषयक प्रकल्पात संशोधन कार्य करत होतो. गार्डनर यांचे हे संशोधन दोन दिशांनी माहिती संकलित करत होते. त्यामध्ये एक दिशा म्हणजे सामान्य व असामान्य मुलाच्या बुद्धिमत्तेबाबत संशोधन करणे आणि दुसरी दिशा म्हणजे ज्या प्रौढ व्यक्ती यांच्या मेंदूला इजा पोहचली आहे त्यांच्या विविध प्रतीकांच्या व्यापराच्या क्षमतांचा अभ्यास करणे, या दोन प्रकारच्या केलेल्या संशोधनातून गार्डनर यांना बहुविध किया बहु आयामी बुद्धीमत्तेचा सिद्धांत मांडण्यास खूप मदत झाली.
बुद्धिही संकल्पना बुद्धीशी व बुद्धी ही मेंदूशी संबंधित संकल्पना आहे. मेंदू मार्फत घडणान्या आंतरक्रियेचा परिणाम म्हणून विचार प्रक्रिया होत असते व या विचार प्रक्रियेच फलित म्हणजेच वर्तन असते. गार्डनर यांनी मेंदु ब चेतातंतू पावर आधारित बुद्धिमत्ता स्पष्ट करण्याचा प्रयत्न या उपस्थित केलेला आहे. म्हणून गार्डनर यांच्या या उपपत्तीला चेता विज्ञानावर आधारित उपपत्ती असेही म्हटले जाते. गार्डनर यांनी मेंदूची रचना व त्यातील केंद्रात केंद्रांचा उल्लेख करून त्याबाबतचे स्पष्टीकरण केलेले आहे. मेंदूमध्ये उजवा व डावा असे दोन भाग असतात, त्यातील मेंदूचा डावा भाग हा भाषा क्षमता नियंत्रित करतो. कल्पनाशक्ती, सकल्पना, विश्लेषण, सांख्यिकी भाषिक पुनर्रचना, तर्क, व भूमितीय सापेक्षता इत्यादी कार्याचे नियंत्रण हे डाव्या मेंदूचे कार्य असते.
मेंदूचा उजवा भाग मेंदूतील केंद्राद्वारे पुढील कार्य करत असतो. अशाब्दिक माहिती संग्रह, चित्र काढणे, प्रतिमा निर्मिती करणे, ध्वनी, ध्वनीची उच्चारण करणे, अवकाश वृत्तो व दृष्टिकोन इत्यादीचे कार्य नियंत्रण मेंदूच्या उजव्या भागा मार्फत केले जाते. गार्डनर यांच्या मते, कोणत्याही व्यक्ती मधील बुद्धीमत्तेचा विकास हा मेंदू, मेंदूमधील विविध भाग व मेंदूचा केंद्र यांच्या विकासावर अवलंबून असतो. मेंदूतील विविध भाग यामध्ये विशिष्ट क्षमताचे विकसन होत असते. यावरून गार्डनर यांनी मंदू आणि बुद्धिमत्ता यामधील सहसंबंध जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे व हा सहसंबंध लक्षात
येऊन गार्डनर यांना बुद्धिमत्तेविषयक उपपत्ती मांडताना खालील बाबी स्पष्ट केलेल्या आहेत. २. मेंदूच्या वेगवेगळ्या भागातून वेगवेगळी कार्य केले जातात. मेंदूच्या एखाद्या भागामध्ये किंवा केंद्रामध्ये दोष
निर्माण झाला तर त्या भागातून नियंत्रित होणारी क्षमता प्रभावित होत असते. २. सांस्कृतिक व सामाजिक आवश्यकतेनुसार विविध समाजामध्ये विविध प्रकारच्या बुद्धिमत्तेला अधिक
देण्यात आलेले असतं.
३. कुशाग्र किंवा अति हुशार व्यक्ती मध्येही काही क्षमता अविकसित स्वरूपात असू शकतात.
४. प्रत्येक व्यक्तीमध्ये आवश्यकतेनुसार विविध प्रकारच्या क्षमता व कौशल्यांचा विकास होत असतो.
हॉवर्ड गार्डनरने बहुविध बुद्धिमत्तेची उपपत्ती १९८३ मध्ये फ्रेम्स ऑफ माईड या पुस्तकात प्रथमतः प्रसिद्ध केली.
गार्डनरनं मूळतः बुद्धिमत्तेचे सात मुख्य प्रकार निर्देशित केलेले आहेत.
भाषिक बुद्धिमत्ता
२. तार्किक बुद्धिमता अवकाश विषयक बुद्धिमत्ता)
४. शरीर गती कुशलता विषयक बुद्धिमत्ता
५ संगीत विषयक बुद्धिमत्ता ६. आतरव्यक्तिक बुद्धिमत्ता
७. स्वज्ञानात्मक बुद्धिमत्ता
यानंतर १९९९ मध्ये गार्डनर यांनी नैसर्गिक बुद्धिमत्ता व अस्तित्ववादी बुद्धिमत्ता या दोन नवीन प्रकारच्या
बुद्धिमत्तेचा समावेश बहुविध बुद्धिमत्ता अंतर्गत केला. १. भाषिक बुद्धिमत्ताः भाषिक बुद्धिमत्ता अंतर्गत गार्डनर यांच्या मते हे भाषेचे आकलन करण्यासाठी साठी एखाद्या व्यक्तीला ज्या क्रिया कराव्या लागतात त्या करण्यासंदर्भात क्षमता अपेक्षित असते त्यास तो भाषिक बुद्धिमत्ता असे म्हणतो. भाषेची विविध कार्य जाणून घेण्याची क्षमता. भाषेचे व्याकरण, आवाजातील चढ-उतार समजण्याची क्षमता,
शाब्दिक भावना समजून घेण्याची क्षमता व विविध शब्दाचा अर्थ लावण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय.
उदा. शिक्षक, पत्रकार, नेता, लेखक किया कम यांचा आपापल्या क्षेत्रात करत असलेला भाषेचा वापर होय.
२ तार्किक बुद्धिमता
गार्डनर यांच्या मते एखाद्या व्यक्तीमध्ये तर्क करणे, परस्पर संबंध ओळख असम तक बुद्धिमत्ता होय. तार्किक बुद्धिमत्ता अंतर्गत कोणताही व्यक्ती विविध चिन्हांचा नाम करण्याची क्षमता बाळगतो तसेच अमूर्त विचार करण्याची क्षमता आहे ही संपादीत करतो. उदाहरणा एखादा गणिया, अर्थशास्त्रज्ञ किंवा शास्त्रश हे तार्किक बुद्धिमतेचा वापर करून विविध प्रकारच्या शोधन प्रक्रिय करत असतात.
३. अवकाशविषयक बुद्धिमत्ताः गार्डनर यांच्या मते एखादी प्रतिमा किंवा एखाद्या घटकाचे चित्र मनातल्या म निर्माण करण्याची क्षमता म्हणजे अवकाश विषयक बुद्धिमत्ता होय. अवकाश विषयक बुद्धिमत्तेला अवकाश विषयक आकलन क्षमता असे ही म्हणता येते. उदाहरणार्थ एखादा अभियंता किंवा कलाकार आपापल्या कार्य करत असताना मनामध्ये चित्र रेखाटतो व त्यानुसार मनातील चित्रा ला मूर्त स्वरूप देत असतो.
४. शरीरगती कुशलता विषयक बुद्धिमत्ताः गार्डनर यांच्या मते एखाद्या व्यक्तीकडे स्वतःहाच्या हालचालीवर कुशल नियंत्रण ठेवण्याची क्षमता असते व एखादी वस्तू कौशल्यपूर्वक हाताळण्याची ही क्षमता असते अशा क्षमता म्हण शरीर गतो कुशलता विषयक बुद्धिमत्ता होय. उदाहरणार्थ हस्त कलाकार, अभिनेता व क्रीडापटू स्वतहाच्या हालचालीवर कौशल्यपूर्ण रित्या नियंत्रण ठेवतात तसेच स्वतःच्या शरीराचा अत्यंत अचूकतेने व सक्षमपणे वापर करतात यास शरीर गती कुशलता विषयक बुद्धिमत्ता असे म्हणता येते.
५. संगीत विषयक बुद्धिमत्ताः कोणत्याही व्यक्तीमध्ये स्वर, ताल, लय व नाद ओळखण्याची तसेच निर्माण
करण्याची जो क्षमता असते त्यास संगीतविषयक बुद्धिमत्ता असे म्हणतात. उदाहरणार्थ गायक, वाद्य वादक व संगीत दिग्दर्शक निर्देशक हे अशा प्रकारच्या बुद्धिमत्तेचा वापर करून स्वरबद्ध गाणी आपणापर्यंत पोहचवत असतात.
६. आंतरव्यक्तिक संबंधाविषयक बुद्धिमत्ताः कोणताही व्यक्ती आपले दैनंदिन व्यवहार करत असताना सभोवतालच्या विविध व्यक्तीच्या संपर्कात येत असतो. अशा संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या इच्छा, भावभावना व प्रेरणा इत्यादीचे अचूक व समर्पक आकलन करण्याची क्षमता म्हणजे आंतरव्यक्तिक बुद्धिमत्ता होय. एखाद्या व्यक्तीला इतर व्यक्तीशी उत्कृष्ट संबंध प्रस्थापित करता येणे, दुसऱ्यांना समजून घेऊन सुसंवाद साधणे व समायोजन साधता येणे हे आंतरव्यक्तीक बुद्धिमत्तेचा भाग असतो. उदाहरणार्थ राजकारणी व अध्यापक हे आपल्या सभोवताली असणाऱ्या कार्यकर्ते व विद्यार्थी यांच्या संदर्भात अचूक आंतरक्रिया करत असतात. हे आंतरव्यक्तीक संबंध विषयक बुद्धिमत्तेचे चे एक लक्षण आहे.
७. स्व-ज्ञानात्मक बुद्धिमत्ताः कोणतीही व्यक्ती जेव्हा स्वतःच्या इच्छा, बुद्धी व भावभावनांची जाण ठेवू शकते व स्वतःची बलस्थाने समजावून घेते अशा क्षमतांना स्व-ज्ञानात्मक बुद्धिमत्ता असे म्हणतात. उदाहरणार्थ एखादा अध्यात्मिक गुरू किंवा तत्वज्ञानी हे स्वतःला समजून घेतात आणि स्वतःच्या बलस्थाने ओळखून उर्फ इतरांना मार्गदर्शन करत असतात.
८. निसर्गविषयक बुद्धिमत्ताः निसर्गामध्ये असणाऱ्या विविध रचना आणि गुणवैशिष्ट्ये आकलन करण्याची क्षमता म्हणजे निसर्गविषयक बुद्धिमत्ता होय. जीवन जगत असताना निसर्गातील विविध घटकांची ओळख करून घेणे तसेच
त्या घटकांचा होणारा परिणाम समजून घेणे हे निसर्ग विषयक बुद्धिमत्तेत अपेक्षित असते. याशिवाय निसर्ग व पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन करण्यास स्वतःला सक्षम करणे आणि त्यानुसार जीवन जगणे यास निसर्गविषयक बुद्धिमत्ता असे म्हणतात. उदाहरणार्थ एखादा निसर्गवादी किंवा शेतकरी हा निसर्गातील घटकांचा व निसर्गातील परिवर्तनाचा अचूक अर्थ लावतो व स्वतःचं कार्य यशस्वीपणे पूर्ण करत असतो.
९. अस्तित्ववादी बुद्धिमत्ताः कोणत्याही व्यक्तीकडे असणारी संवेदनशीलता तसेच मानवी अस्तित्व संदर्भातील मूलभूत प्रश्न निराकरण करण्याची क्षमता म्हणजे अस्तित्ववादी बुद्धिमत्ता होय. उदाहरणार्थ एखादा तत्त्वज्ञानी व्यक्ती हा मानवी मूलभूत प्रश्नांकडे डोळसपणे पाहू शकतो व ते प्रश्न सोडवण्यासाठी मार्गदर्शन ही करू शकतो.
Comments
Post a Comment