विज्ञान भारती Exam 6th to 12th
महोदय,
विज्ञान भारती ही आपल्या देशातील सर्व राज्यांमध्ये व अन्य ६ देशामध्ये पसरलेली चळवळ आहे आणि या अंतर्गत स्वदेशी भावनेशी निगडीत विज्ञाननिष्ठ असे विविध कार्यक्रम उपक्रम या मार्फत राबवले जातात (www.vibhaindia.org). त्यातील एक उपक्रम म्हणजे "विद्यार्थी विज्ञान मंथन" (VVM) ही वैज्ञानिक प्रतिभा / प्रज्ञा शोध परीक्षा, जी एनसीइआरटी (NCERT) व विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाते.या परीक्षेची नोंदणी सुरू झाली आहे . या परीक्षेला ४० प्रश्न हे भारताचे विज्ञान विश्वातील योगदान, बिरबल साहनी यांचे जीवनकार्य व भारतीय स्वतंत्रता संग्राम आणि विज्ञान या विषयावर असून ५० प्रश्न पाठ्यक्रमावर व १० प्रश्न तर्कावर आधारित असतील.
सर्व प्रश्न बहू पर्यायी असतील. पहिल्या ४० प्रश्नासाठी लागणारी पुस्तके विविमं च्या वेबसाईट (https://vvm.org.in) वर मिळतील. ही परीक्षा दरवर्षी इयत्ता ६ वी ते ११ च्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. सर्व नोंदणी प्रक्रिया तसेच प्राथमिक परीक्षाही ऑनलाईन (ONLINE) असते.
गेल्या वर्षी देशभरातून ३८०० शाळामधून १,०५,००० विद्यार्थी या परीक्षेत सहभागी झाले होते. यावर्षी सुद्धा ही ओपन बुक परीक्षा १२ भाषा मधून २९ किंवा ३० ऑक्टोंबर २०२३ यापैकी एका दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यन्त निवडलेल्या ९० मिनिटात देता येणार आहे. या परीक्षेचे एक विशेष आकर्षण आहे. ते म्हणजे मुलांचा एका आहार विषयक विशाल प्रयोगात सहभाग. तो प्रयोग विविमं ने ठरवून दिलेल्या कालावधीत करायचा आहे. त्याची विस्तृत माहिती पत्रकात दिलेली आहे. त्यात सहभागी होण्याचा आनंद प्रत्येक नोंदणीकृत विद्यार्थ्याला मिळेल. नोंदणी पासून ते राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेपर्यंतची विस्तृत माहिती आपल्या vvm.org.in या वेबसाईट वर उपलब्ध आहे.
या परीक्षेतील क्षेत्रीय आणि राष्ट्रीय विजेत्यांना राष्ट्रीय नामांकित प्रयोगशाळा किंवा DRDO, ISRO, CSIR, BARC यांसारख्या प्रमुख संशोधन संस्थांमध्ये विस्तृत प्रशिक्षण कार्यक्रमात ( १ ते ३ आठवडे ) सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. तसेच राष्ट्रीय विजेत्यांना रु. २००० प्रति माह अशी शिष्यवृत्ती एका वर्षासाठी मिळणार आहे.
तरी या स्पर्धेची माहिती आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यंना द्यावी ही विनंती.
Comments
Post a Comment