विचार प्रक्रिया
विचारप्रक्रियेचे शैक्षणिक महत्व
मानवामध्ये इतर प्राण्यांच्या तुलनेने प्रगत असलेली ही शक्ती मानवी अध्ययनाच्या दृष्टीनेच नव्हे तर एकूण मानवी जीवनाला उन्नत व पाच्या दृष्टीनेदेखील अत्यंत महत्त्वपूर्ण अशी आहे. विद्यार्थ्यांमध्ये या शक्तीचा विकास होण्याच्या दृष्टीने शिक्षकाने अधिक जागरूक असणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांना केवळ माहिती देणे म्हणजे अध्यापन नव्हे. ही बाब ध्यानी घेऊन शिक्षण तज्ज्ञांनी अभ्यासक्रम तयार करताना तसेच पाठ्यपुस्तके तयार करताना विद्यार्थी अधिकाधिक विचारप्रवृत्त कसा होईल याकडे लक्ष पुर आवश्यक आहे.
4) पियाजेच्या संशोधनानुसार, विचारप्रक्रिया हो अगदी बालकाच्या जन्मापासून प्रगत होत जाते. म्हणून लहान मुलांना लहान लहान गोष्टी सांगून त्यातून तात्पर्य काढण्यास प्रवृत्त केले पाहिजे.
iii) बारा ते पंधरा या वयोगटातील मुलांमध्ये तर्कशक्तीचा विकास फार वेगाने होत असतो. म्हणून या वयोगटातील मुलांना अनुमान काढण्याची पद्धती, त्यामध्ये निर्माण होऊ शकणारे दोष याबाबतची माहिती द्यावी.
(iv) शालेय अभ्यासक्रम शिकवित असतानाच तर्काधिष्ठित कोडी, समस्या देऊन त्या सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी द्यावी.
(v) कोणतीही घटना घडण्यासाठी कारण हे आवश्यक असते. हे शास्त्रीय सत्य विद्यार्थ्याच्या मनावर बिंबविणे आवश्यक असते. तसेच विचारातील भोंगळपणा हा सत्यशोधनामध्ये कसा अडथळा बनून रहातो हे विद्यार्थ्यांना समजावून दिले पाहिजे
vi) अपुन्या निरीक्षणावरून अथवा चुकीच्या निरीक्षणामुळे अनुमानामध्ये दोष निर्माण होतो म्हणून विद्यार्थ्यांना कोणत्याही घटनेसंबंधी निष्कर्ष काढण्यापूर्वी पुरेसे निरीक्षण करण्याची संधी दिली पाहिजे. तसेच अन्या निरीक्षणावरून काढलेले निष्कर्ष कसे चुकीचे ठरतात हे त्यांच्या लक्षात आणून दिले पाहिजे.
(vii) कुर उकलनासाठी प्रदीर्घ अशी विचारप्रक्रिया चालत असते त्यामुळे कुट उकलनामध्ये विद्यार्थी कंटाळून ती समस्याच सोडून देण्याची शक्यता असते अशावेळी शिक्षकाने त्याला प्रेरणा देणे आवश्यक असते.
vill) निर्मायक विचार विकसित होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्याना निबंध लेखन, कल्पना विस्तार, कथा-लेखन, काव्य. निर्मिती, विविध खेळणी तयार करणे, चित्रे काढणे, प्रतिकृती तयार करणे यांसारख्या बाबीतून संधी दिली पाहिजे.
Comments
Post a Comment