Posts

Showing posts from February, 2024

स्वातंत्र्ययुद्ध - परदेशी मालाचा बहिष्कार

स्वातंत्र्ययुद्ध - परदेशी मालाचा बहिष्कार  १९२२ मध्ये भारतात विदेशी वस्त्रांची होळी करण्याची मोहीम सुरू झाली. कोलकातामधील कापडाच्या व्यापाऱ्यांनी एक सभा आयोजित केली. सभेत बहुमताने या निर्णयास संमती देण्यात आली. एक व्यापारी मात्र श्री. मालवीयांकडे आला व म्हणाला, "यामुळे आमचे खूप नुकसान होईल." मालवीयांनी त्याला स्पष्ट केले, "जो निर्णय झाला तो झाला. त्यात बदल होणे शक्य नाही. तुला पाहिजे तर तू विद्वान व कायदेतज्ज्ञ मोतीलाल नेहरू यांना भेट. ते तुझे समाधान करू शकतील." व्यापारी मोतीलाल नेहरूंकडे गेला व त्यांना विनंती करू लागला, "आपण परदेशी मालाच्या होळीचा निर्णय एक आठवडा कृपया पुढे ढकला. माझ्याजवळ ७-८ कोटींचा विदेशी कपडा आहे. तो सर्व खलास झाला तर मी बरबाद होईन. आयुष्यातून उठेन." मोतीलाल हसत म्हणाले, "बाबा रे, हे स्वातंत्र्ययुद्ध आहे. प्रत्येकाला त्यासाठी त्याग करावाच लागेल. माझे आनंदभुवन घर किती सुंदर आहे. मी ते माझ्या मुलासाठी बांधले. माझा मुलगा जवाहर तर जेलमध्ये आहे." व्यापाऱ्याजवळ आता कोणतीच सबब नव्हती. तो म्हणाला, “ठीक आहे. आपण आजच सर्व विदेशी कपड्य...

चांगली संगत

चांगली संगत हकीम लुकमान फार विद्वान व अनुभवी गृहस्थ होते. आपल्या अंतसमयी त्यांनी सर्व मुलांना बोलावून त्या वेळेस ज्या गोष्टी समजावून सांगायाच्या असतात त्या सांगण्यास सुरुवात केली. मुले लक्षपूर्वक ऐकत होती. सर्व सांगून झाल्यावर हकीम गप्प राहिले. तेव्हा मोठ्या मुलाने विचारले, "पिताजी, अजून काही नाही ना?" "बाळ, आणखी फक्त एक शेवटची गोष्ट. समोरच्या पात्रात चंदनाची पावडर आहे. ती एका हातात आणि दुसऱ्या हातात चुलीतील थोडासा कोळसा आण" सांगितल्याप्रमाणे मुलाने केले. "आता दोन्ही खाली टाकून दे." मुलाने परत वडिलांच्या आज्ञेप्रमाणे केले. हकीम लुकमान म्हणाले, "बेटा, आता तुझ्या दोन्ही हातांचे निरीक्षण कर. चंदनचूर्ण खाली पडले तरी तुझ्या हाताला सुगंध देऊन गेले असेल. याउलट कोळसा निघून गेला तरी तुझा तो तळवा व बोटे यांना थोडेसे काळे करून गेला असेल, हेच मला तुम्हाला शेवटचे सांगायचे आहे." "मी नाही समजलो" म्हणत मुलाने आपली मान नकार दर्शवत हलवली. “चांगल्या लोकांची संगत चंदनासारखी असते. दुर्जनांची, वाईट माणसांची संगत कोळशासारखी असते." लुकमानने आपल्या सांगण्...

चार पहारेकरी

चार पहारेकरी एक होता राजा. त्याचे राज्य खूप मोठे होते. राज्यातील लोक सुसंस्कृत होते. कोणाचा कोणाला उपद्रव नव्हता. भांडणे होत नव्हती. उधोगधंद्याची भरभराट होती. सर्व प्रजाजन सुखाने व शांततेने नांदत होते. त्याच राज्याशेजारी एक छोटेसे राज्य होते. तेथे मात्र प्रजा दुःखी होती. लोकांमध्ये नेहमी भांडणे व्हायची. त्यामुळे हा दुसरा राजा त्रस्त झाला होता. दुसरा राजा एकदा पहिल्या राजाकडे आला व म्हणाला, "आपले राज्य एवढे मोठे असूनही सर्वजण कसे गुण्यागोविंदाने राहतात. मला त्याचे रहस्य सांगाल का ? " पहिला राजा हसून म्हणाला, "आपले म्हणणे बरोबर आहे. माझ्या राज्यातील समृद्धीचे व स्वास्थ्याचे कारण माझे चार पहारेकरी आहेत. ते माझे नेहमी रक्षण करतात." "चारच पहारेकरी! माझ्याकडे तर पहारेकऱ्यांची फौज आहे. फक्त चौघांमध्ये आपले रक्षणाचे काम कसे काय होते ?" दुसऱ्या राजाने आश्चर्याने विचारले. "माझे रक्षक फार वेगळे आहेत ?" "कृपया कोणते ते सांगाल का ?" दुसऱ्या राजाने उत्सुकतेने विचारले. पहिल्या राजाने त्यावर स्पष्ट केले, "माझा पहिला पहारेकरी आहे सत्य . तो मला असत्...