Posts

Showing posts from August, 2022

धुपे सर सुविचार

धुपे सर सुविचार  *_सत्यवाणी...._*✍🏻 सन्मान प्राप्त झाल्यावर,,      *ज्याला गर्व होत नाही....* अपमान झाला तरी,,       *जो क्रोधीत होत नाही....* आणि....... क्रोध उत्पन्न झाला तरी,, *जो कठोर शब्द उच्चारत नाही..* *..तो मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो..*      ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *जबाबदारीची जाणीव असणारी* *माणसे फारशी वाद-विवाद किंवा* *सवाल जवाबाच्या फंदात पडत नाहीत,* *तर समोरील काम अत्यंत महत्त्वाचे* *समजून उत्कृष्टतेसाठी सतत झिजत असतात!* *म्हणूनच झिजणारे खांदे हे बोलणाऱ्या ओठांपेक्षा नेहमीच श्रेष्ठ असतात..* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *नेहमी वाटत की लोक आपल्याला दुखावतात पण तस नसत तर ते आपल्याला काही तरी शिकवून जातात .*  *बोध काय घ्यायचा हाआपला भाग झाला पण भ्रमनिराश होणं हा दोष झाला .*      *सुखासाठी कोणाकडे हात पसरू नये, वेळ वाया जातो, त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा, चांगली वेळ येईल.*         *साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे . क्षमा ही परम शक्ती आहे . नम्रता हा सर्वोत्तम युक्तीवाद आहे . आणि ओळख हा चांगला संबंध आहे . फार कमावून ग...

विद्या प्रवेश कृती भाग 1

कृती क्र 1 - स्वतःच्या एका अवयवावर हात ठेवून अवयवाचे नाव उच्चारा.  विदयार्थ्यांनाही तसेच करायला सांगा. जसे, डोक्यावर हात ठेवून म्हणा 'डोके', पायावर हात ठेवून म्हणा 'पाय'. २) विद्यार्थ्यांना सूचना दया 'मी अवयवाचे नाव सांगतो, तुम्ही त्या अवयवावर हात ठेवा. ' सर्व विद्यार्थी योग्य अवयवावर हात ठेवत आहेत याकडे लक्ष ठेवा. कृती क्र. २ : अवयवांची कामे व गप्पा १) आपले अवयव कोणकोणती कामे करतात त्यावर चर्चा करूया. उदा. माझे हात लिहितात, असे म्हणून लिहिण्याची कृती करून दाखवा. २) प्रत्येक विद्यार्थ्याला एका अवयवाचे नाव व त्याच अवयवाचे कार्य सांगण्यासाठी प्रोत्साहन दया, मदत करा. मुलांना सांगता आले नाही, तर योग्य प्रश्न विचारा, 'तू 'जेवतोस कशाने' 'भांग कशाने पाडतोस'. एखादी वस्तू उचलण्यासाठी तू कोणता अवयव वापरतोस ? गाणे ऐकण्यासाठी तू कोणता अवयव वापरतोस ? ३) एखादया विदयार्थ्याला एखादा अवयव नसल्यास ते कशा पद्धतीने काम करीत असतील? हे मुलांना विचारावे. विदयार्थ्यांच्या कल्पना ऐकून घ्याव्यात. त्यांनी अशी एखादी व्यक्ती पाहिली आहे का असे विचारून त्यांचे अनुभव ऐकून घ...

विद्यार्थ्यांची प्रगती खुंटत आहे कारण

Image
*जिथे पालक शिक्षकांशी उद्धटपणे वागतात तिथे विद्यार्थ्यांची प्रगती खुंटते. मानसशास्त्राचा नियम आहे* गेल्या १० वर्षातील शिक्षकांना वर्गामध्ये क्लास कंट्रोल करणे कठीण होऊ लागले. ADHD, Learning Disabilities, Lack of Concentration यासारख्या समस्यांचे प्रमाण वाढले. वर्गातील दोन-तीन टग्या मुलांमुळे अख्खा वर्ग डिस्टर्ब होऊ लागला. त्यात हायपरऍक्‍टिव्ह मुलांच्या समस्या वेगळ्याच होत्या. त्या हाताळायच्या कशा हा शिक्षकांसमोर प्रश्न पडला. शिक्षण हक्क कायद्याच्या गैरवापरामुळे विद्यार्थ्यांना मारणे सोडा साधे रागावणे कठीण होऊन बसलेआहे . शिस्त लावण्यासाठी शिक्षा द्यावी तर काय द्यावी हा प्रश्न पडला. वर्गाच्या बाहेर काढले तर पालक भांडायला येतात की तो/ती वर्गाच्या बाहेर राहिल्याने तिचे शैक्षणिक नुकसान झाले. वर्गात उभे केले तर पालक ओरडतात की त्याच्या मानसिकतेवर परिणाम झाला, आता तो शाळेत यायला नाही म्हणतो. कान पकडून उठाबशा काढायला सांगितले तर पालक दुसऱ्या दिवशी मेडिकल सर्टिफिकेट घेऊन येतात. खूप त्रास देतो म्हणून कुठल्या ऍक्टिव्हिटी मधून काढून टाकले तर लगेच पालक म्हणतात आम्ही फी भरली आहे त्याला ॲक्टिव्हिटीमध्...

बिलीफ सिस्टीम

Image
💐बिलीफ सिस्टीम !💐 💐 स्वविश्वास पद्धती💐 💐 NATURAL POWER💐 शुन्यातून साम्राज्य निर्माण करणार्‍या लोकांच्या मेंदुत एखादी स्पेशल चीप बसवलेली असते का? जी त्यांना एक्स्ट्रा ऑर्डीनरी बनवते? धीरुभाई अंबानी म्हटलं की काय आठवतं? – पैसा, प्रगती, झपाटलेपणा, संपत्ती!   तेच जेआरडी टाटा म्हटलं की - पैशासोबतच सचोटी, दानशशूरपणा आणि मुल्यांची जपणुक! स्टीव्ह जॉब्ज म्हणजे – गॅझेटच्या जगातली क्रांती! तेंडूलकर किंवा अमिताभ म्हणजे शिस्त, प्रचंड आणि कठोर परिश्रम! जगाला प्रदुषणमुक्त करण्याचं स्वप्न बघणारा निकोल टेस्ला माहितीये? जगप्रसिद्ध व्हर्जिन ग्रुपचा मालक ‘रिचर्ड ब्रॅन्सन’? बारा बारा उद्योगामध्ये एक नंबरवर असलेला हा माणुस तुम्हाला नेहमी समुद्रकिनार्‍यावर मजा करताना दिसेल!  ह्या लोकांनी जगाला प्रभावित केलं ह्याचं कारण काय?  ह्या लोकांमधे असं काय वेगळं होतं,जे इतर लोकांकडे नव्हतं! बिलीफ सिस्टीम! तुम्हाला त्या पायाला दोरखंड बांधलेल्या हत्तीची गोष्ट माहितीये? त्याच्या मनावर लहानपणापासून बिंबवलेलं असतं, की तो दोरखंड तोडू शकत नाही, आणि हा जगातला सर्वात शक्तिशाली प्राणी शेळी ...

मुलांच्या अभ्यासात पालकांची भूमिका

Image
मुलांच्या अभ्यासात पालकांची भूमिका : मुलांना अभ्यासाची सवय लावण्यासाठी पालकांना बरेच परिश्रम घ्यावे लागतात. धाक दाखवून, चोप देऊन मुलांना अभ्यासाला बसविणाऱ्या पालकांनी सर्वप्रथम हे लक्षात ठेवावे की, मुलांना अभ्यासाची गोडी लावण्याचे उद्दिष्ट त्या मार्गाने कधीही साध्य करता येत नाही. त्यासाठी मुलांच्या अगदी बालपणापासूनच आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. ● मुलांना सर्वप्रथम वाचनाची गोडी लावावी. त्यासाठी भरपूर पुस्तकं खरेदी करावीत. सर्वप्रथम बालकथांची पुस्तकं त्यांना वाचायला द्यावीत. एखाद्या पुस्तकातील गोष्ट आपण त्यांना संपूर्णपणे सांगू नये. गोष्ट त्यांना खूप हवीहवीशी वाटेल त्यावेळी त्यांना ते पुस्तक वाचायला द्यावे आणि यानंतरची गोष्ट या पुस्तकात वाचा असे सांगावे. मुलं लगेच ते. वाचून काढतात. पुस्तक काही मुलांना अवघड गणितं सोडवायला आवडतात. पालकांनी त्यांना ती संधी द्यावी. त्यासाठी मुलांना प्रेरित करावे. ही सिद्धता मला वेगळ्या पद्धतीने सोडवून दाखवं! हे बघ, हे गणित आणखी एका पद्धतीने सोडवता येतं का ते आपण बघूयात! असं म्हणून त्यांना अभ्यासाला बसवावं. आपण स्वतः त्यांच्या सोबत बसावं. ● भूगो...

फेथ शो Faith Show

Image
1. 1942 2. 1994 3. 1964 4.  2000 5.. 2001 6.. 2001 7. 2002 8. 2003 9. 2004 10. 2005 11. 2006 12. 2007 13. 2008 14. 2009 15. 2010 16. 2011 17. 2012 18. 2013 19. 2014 20. 2015 21. 2016 22. 2017 23. 2018 24. 2019 25. 2020 26. 2021 27. 2022 28. 2023 29. 2024 30. 2025 31. 2026 32. 2028 33. 2029 34. 2030 35. 2031 36. 2032 37. 2033 38. 2034 39. 2036 40. 2037 41. 2038 42. 2039 43. 2040 44. 2041 45. 2042 46. 2043 47. 2045 48. 2046 49. 2048 50.. 2054 50.. 2056 51.. 2057 52. 2058 53. 2059 54. 2060 55. 2061 56. 2062 57. 2063 58.. 2064 59. 2065 60. 2066 61. 2067 62.. 2068 63.. 2069 64. 2070 65.. 2071 66.. 2072 67.. 2073 68.. 2074 69. 2075 70. 2076 71. 2077 72. 2078 73. 2079 74.. 2081 75.. 2082 76. 2083 77.  2084 78. 2085 79. 2086 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100