विद्या प्रवेश कृती भाग 1
कृती क्र 1 - स्वतःच्या एका अवयवावर हात ठेवून अवयवाचे नाव उच्चारा.
विदयार्थ्यांनाही तसेच करायला सांगा. जसे, डोक्यावर हात ठेवून म्हणा 'डोके', पायावर हात ठेवून म्हणा 'पाय'.
२) विद्यार्थ्यांना सूचना दया 'मी अवयवाचे नाव सांगतो, तुम्ही त्या अवयवावर हात ठेवा. '
सर्व विद्यार्थी योग्य अवयवावर हात ठेवत आहेत याकडे लक्ष ठेवा.
कृती क्र. २ : अवयवांची कामे व गप्पा
१) आपले अवयव कोणकोणती कामे करतात त्यावर चर्चा करूया. उदा. माझे हात
लिहितात, असे म्हणून लिहिण्याची कृती करून दाखवा.
२) प्रत्येक विद्यार्थ्याला एका अवयवाचे नाव व त्याच अवयवाचे कार्य सांगण्यासाठी प्रोत्साहन दया, मदत करा. मुलांना सांगता आले नाही, तर योग्य प्रश्न विचारा, 'तू 'जेवतोस कशाने' 'भांग कशाने पाडतोस'. एखादी वस्तू उचलण्यासाठी तू कोणता अवयव वापरतोस ? गाणे ऐकण्यासाठी तू कोणता अवयव वापरतोस ?
३) एखादया विदयार्थ्याला एखादा अवयव नसल्यास ते कशा पद्धतीने काम करीत असतील? हे मुलांना विचारावे. विदयार्थ्यांच्या कल्पना ऐकून घ्याव्यात. त्यांनी अशी एखादी व्यक्ती पाहिली आहे का असे विचारून त्यांचे अनुभव ऐकून घ्यावेत.
४) एखादा अवयव नसतानाही इतर अवयवांच्या साहाय्याने उत्तम आयुष्य जगता येऊ
शकते या चर्चेकडे विद्यार्थ्यांना आणायचे आहे हे लक्षात ठेवावे. विशेष गरजा असणाऱ्या विदयार्थ्यांसाठी (CWSN): विद्यार्थ्यास बोलण्यास अडचण असेल तर दर्शविण्यास, कृती करून दाखविण्यास सांगावे.
कृती क्र. ३ : नेहमीपेक्षा वेगळे
विदयाथ्र्यांना त्यांचे हात/पाय, एक एक अवयव वेगळ्या पद्धतीने वापरून दाखविण्यास सांगावे. जसे पायाने चालतो त्याऐवजी पायाने रंगकाम करतो याचा अभिनय करावा. इत्यादी.
कृती क्र. ४ : बिंगो
१) मुलांना रिंगणात बसवावे.
२) आज आपण बिंगो नावाचा खेळ खेळणार आहेत असे सांगावे. मुलांना कृतिपत्रिका
दाखवून त्यात कोणकोणती चित्रे आहेत. हे विचारून त्यावर चर्चा करावी.
३) मुलांचे ४-४ चे गट करावेत.
४) कृतिपत्रिकेवरील सूचना वाचून दाखवावी मित्राला प्रश्न कसा विचारावा याचा एक नुमना करून दाखवावा. जसे "बघा हं मी रवीला विचारते. तू वर्ग साफसफाई करायला मदत करतोस का?" तो नाही म्हणाला म्हणून मी करत नाही. आता मी मेधाला विचारते. तू वर्ग साफसफाई करायला मदत करतेस का? ती हो म्हणाली म्हणून मी करते. आता तुम्ही तुमच्या गटात मित्रांना विचारा व सर्व चौकोन भरले की बिंगो म्हणायचे." यानंतर विदयार्थ्यांना आपापसात चर्चा करून कृतिपत्रिका सोडवून दयावी.
५) त्यानंतर वर्गात चर्चा घ्यावी.
६) फळ्यावर एक उदाहरण करून दाखवावे.
७) या खेळात विद्यार्थ्यांनी इतरांशी संवाद साधणे, आपली व दुसऱ्यांची आवडनिवड,समजून घेणे महत्त्वाचे आहे.
विशेष गरजा असणाऱ्या विदयार्थ्यांसाठी (CWSN): ज्या विदयार्थ्यांना चार मित्र शोधणे अवघड जाईल, त्यांनी एक मित्र शोधला तरी मान्य करावे.
कृती क्र. ५ : माझे वेगळेपण
१) एका रिकाम्या खोक्याच्या तळाशी एक आरसा ठेवावा. ते खोके बंद करून ठेवावे.
२) विद्यार्थ्यांना सूचना देऊन खोक्यात काय आहे ते पाहण्यास सांगावे. विदयाथ्र्यांनी पहावे व आपल्या जागेवर बसावे. कुणाशी बोलू नये. सर्व विदयार्थ्यांचे पाहून झाल्यानंतर प्रत्येकाला तू खोक्यात काय पाहिलेस ? तुला काय वाटले? हे विचारावे.
३) नंतर शिक्षकांनी सांगावे, की प्रत्येक मूल विशेष असते व त्या खोक्यात दिसणारी
विशेष गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः आहात. प्रत्येकामध्ये काहीना काही विशेष असते. हे
शिक्षकांनी लक्षात आणून दयावे.
४) सर्व विदयार्थ्यांना आपल्या आवडीचे खाद्य पदार्थ, रंग, खेळ इत्यादी विचारावे व ही
जाणीव करून दयावी, की प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात.
कृती क्र. ६ : माझे कुटुंब
१) विद्यार्थ्यांना रिंगणात बसवावे.
२) आज आपण आपल्या घरात कोण कोण आहेत याबाबत गप्पा मारणार आहोत, असे सांगावे. विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी कोण कोण आहे हे विचारून आजी, आजोबा इ. नात्यांना त्यांच्या भाषेत काय म्हणतात हे विचारावे. काका कोणाला म्हणतात, मामा म्हणजे कोण ? (आईचा भाऊ) हे मुलांना सांगायचे आहे.
३) त्याच बरोबर एकत्र कुटुंब, विभक्त कुटुंब, तसेच पठडी बाहेरील कुटुंब म्हणजे आई,
मुलगी, आत्या आजी हे पण कुटुंबच आहे याबाबतही मुलांसोबत चर्चा करावी.
४) त्यानंतर कृतिपत्रिका ७ देऊन त्यांना त्यात घरातील व्यक्तींची चित्रे काढायला / फोटो
चिकटवायला सांगावे, स्वलिपीत नाव लिहिण्यास सांगावे.
कृती क्र. ७ : कोण कसे ?
विद्यार्थ्यांना रिंगणात बसवावे. आई कोणते कपडे घालते ? बाबा कोणते कपडे घालतात ? | असे विदयार्थ्यांना विचारावे. ताई, दादा, तुम्ही कोणकोणते कपडे हे विचारावे व त्याची यादी करावी. उदा. साडी, पॅन्ट-शर्ट, सदरा, पंजाबी ड्रेस, फ्रॉक, स्कर्ट इ. घरातील | लोकांचे तुम्हांला काय, काय आवडते यांबद्दल मुलांना बोलते करावे. जसे- आजी गाणी म्हणते ते मला आवडते. काकू विणकाम खूप छान करते. आबा ढोलकी मस्त वाजवतात.
कृती क्र. ८ : आपले मदतनीस
१) आपल्याला कोण कोण मदत करते? जसे की आपल्याला एस. टी ने गावाला जायचे असेल तर कोणाची मदत होते? असा प्रश्न विचारून सुरुवात करता येईल. विद्यार्थ्यांना गाडी चालक / वाहक यांच्याबद्दल बोलते करून अजून इतर मदतनिसांबद्दल गप्पा मारता येतील.
२) गावातील एखादी व्यक्ती/पालक यांच्यापैकी कोणी पोस्टमन, डॉक्टर, पोलीस, कंडक्टर असे असल्यास त्यांना वर्गात मुलाखतीसाठी बोलविता येईल.
३) विद्यार्थ्याबरोबर चर्चा करून मुलाखतीसाठीचे प्रश्न एका छोट्या कागदावर लिहिण्यास सुरुवात करावी. कागद विद्यार्थ्यांना दिसेल असा भिंतीवर लावून या प्रश्नामध्ये आपण भर घालू शकतो याची विदयार्थ्यांना कल्पना दयावी.
कृती क्र. ९ : ओळखा कोण ?
दोन गटांमध्ये हा खेळ घेता येईल.
(१) एका गटातील विद्यार्थ्यांनी व्यावसायिकाचे वर्णन करावे. कोड्यामध्ये. जसे : लाल गाडी चालवितात आपल्याला दूरदूरच्या गावाला नेतात. मूकाभिनयाद्वारे दाखवून दयावे. जसे : टणटण घंटागाडी.. असे ओरडत गाडी ओढत आणण्याचा अभिनय करावा व दुसऱ्या गटाने व्यावसायिकाचे नाव ओळखावे.
२) व्यावसायिकांनी आपले काम करणे बंद केले तर काय समस्या उद्भवतील याचाही अभिनय करता येईल व आता कोणाची मदत लागेल असे विचारून दुसऱ्या गटाने मदतनीस ओळखणे असाही खेळ घेता येईल. जसे : गाडी बंद पडली./ कोणीतरी आजारी आहे.
विशेष गरजा असणाऱ्या विदयार्थ्यांसाठी (CWSN): काही विदयार्थ्यांना कदाचित हे करता येणार नाही. त्यांना इतरांनी मदत करावी.
कृती क्र. १० : कोलाज काम
१) विदयार्थ्यांना गोलाकार बसवावे व पुढील कोलाज कामाचा एक नमुना त्यांना करून दाखवावा.
२) तीन-चार छोटे पाठकोरे किंवा पेन्सिलने लिहिलेले कागद घ्यावेत. तेलखडूने प्रत्येक कागदाला एक एक रंग दयावा. नंतर त्या कागदांचे मध्यम आकाराचे तुकडे करावेत. एका फुलस्केप एवढ्या कागदावर ते रंगीत तुकडे चिकटवून कोलाज काम करून निसर्गचित्र किंवा वस्तूचे चित्र बनवावे. विद्यार्थ्यांना सांगावे, की प्रत्येकाने वेगळे चित्र बनवायचे आहे. दुसऱ्या पेक्षा आपले चित्र वेगळे हवे. हे करताना तीन-चार मुलांच्या गटात तेलखडू, खळ एकत्रित दयावी. सगळ्यांनी मिळून वापरायचे आहे. दुसऱ्याचे कागद घ्यायचे नाहीत. गरज असल्यास विचारून घ्यावेत अशा सूचना दयाव्यात.
३) प्रत्येक विद्यार्थी आपापला विचार करून कोलाजकाम करतो ना याकडे शिक्षकांनी लक्ष दयावे. वस्तूंचा वापर करताना एकमेकांना मदत करतात का, मदत हवी असल्यास कशाप्रकारे मागतात याकडेही शिक्षकांनी बारकाईने लक्ष दयावे.
कृती क्र. ११ : आमचे नियम
विद्यार्थ्यांशी बोलून वर्गात पाळायचे नियम सोप्या भाषेत तयार करावेत. एका तक्त्यावर | लिहून मुलांना दिसेल अशा ठिकाणी लावावेत.
जसे खेळून झाल्यावर खेळणी जागेवर ठेवू | आपली पिशवी व पाण्याची बाटली ठरलेल्या ठिकाणी रांगेत ठेवू.
| विशेष गरजा असणाऱ्या विदयार्थ्यांसाठी (CWSN) : नियम अधिक स्पष्ट करण्यासाठी | त्यांना चित्र स्वरूपात दाखवावे. जसे: पिशव्या ठेवायच्या ठिकाणी रांगेत ठेवलेल्या पिशव्या व बाटल्यांची रांग असे चित्र चिकटवावे.
कृती क्र. १२ : करूया स्वागत
१) वर्गाच्या दरवाज्याजवळ उभे राहून विद्यार्थी वर्गात प्रवेश करीत असताना विविध प्रकारांनी त्यांचे स्वागत करावे.
उदा: टाळी देणे, नमस्कार करणे, हसून स्वागत करणे, मिठी मारणे, हस्तांदोलन करणे इत्यादी, अशा विविध पद्धती वापरून स्वागत करावे.
कृती क्र. १३ : आमची दैनंदिनी
१) दर आठवड्याचे वेळापत्रक (आपण आठवड्यात काय काय करणार आहोत त्याचा तक्ता) लिहून ठेवावे.
२) रोज सुरुवातीला आज काय काय करणार हे विदयार्थ्यांना तक्ता वाचून सांगावे. आज कोणते गाणे म्हणणार, कोणता खेळ खेळणार हे नमूद करावे.
३) उपक्रमाची सुरुवात गाण्याने करावी. (संपली वेळ स्वागताची - आता वेळ गोष्टीची - संपली वेळ गोष्टीची आता वेळ खेळाची) - उपक्रमाचा एक-एक टप्पा संपल्यानंतर गाणे घ्यावे.
| विशेष गरजा असणाऱ्या विदयार्थ्यासाठी (CWSN): वेळापत्रक अधिक स्पष्ट करण्यासाठी त्यांना चित्र स्वरूपात दाखवावे. जसे परिपाठाची वेळ दाखविण्यासाठी गोलात बसलेल्या | बाई व विद्यार्थ्यांचे चित्र काढता येईल. जेवणाच्या वेळेला जेवणाच्या ताटाचे चित्र व विद्यार्थी ओळीने जेवायला बसले आहेत असे चित्र काढता येईल.
कृती क्र. १४ : रंग कोपरा बनवूया
१) विद्यार्थ्याचे तीन गट करावेत. त्यांना तीन रंग ठरवून दयावेत. (किंवा त्यांना निवडायला सांगावेत. त्या रंगांच्या वस्तू जमवून त्या वस्तू त्या त्या कोपऱ्यात ठेवण्यास सांगावे. जसे : लाल कोपरा, हिरवा कोपरा इ.
२) त्यासाठी विदयार्थ्यांना एक दिवसाचा वेळ दयावा. जसे आज गट केल्यास दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांचा कोपरा सजवायचा आहे.
३) तयारीसाठी आवश्यक वस्तू उपलब्ध करून द्यायच्या आहेत. जसे : वस्तू मांडण्यासाठी टेबल, कागद, रंग, दोरा इ.
४) शक्य असल्यास शिक्षकांनी हा उपक्रम घेण्याआधी एका रंगाचा कोपरा तयार करून दाखवावा.
कृती क्र. १५ : तर कसे वाटेल ?
१) विदयार्थ्यांना वेगवेगळे प्रसंग सांगून, त्यांना त्याविषयी काय वाटले हे एका वाक्यात मुट सांगायला सांगावे. जसे माझा ड्रेस फाटला. - मुले उत्तर देतील. मला वाईट वाटेल, भा : रडू येईल./ मला भीती वाटेल, आई ओरडेल म्हणून/ मला राग येईल/ आनंद होईल, नवा ड्रेस मिळेल म्हणून.. इ.
(२) विद्यार्थ्यांची सर्व उत्तरे स्वीकारावीत. त्यांमागील कारण सांगण्यास मुलांना प्रोत्साहित करावे. गरज पडल्यास त्यांना कारण शोधून सांगण्यास मदत करावी.
३) आपल्या सगळ्यांना वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या भावना जाणवत असतात. आपल्याला नक्की काय वाटते हे ओळखता येणे, शब्दांत मांडता येणे महत्त्वाचे. हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचे आहे.
विशेष गरजा असणाऱ्या विदयार्थ्यांसाठी (CWSN) : काही प्रसंगचित्रे वापरून विदयार्थ्यांना बोलण्यास मदत करावी.
कृती क्र. १६ : अक्कू हुई गुस्सा
ही गोष्ट मुलांना सांगावी व या कथेतील मुलगी जशी तिचा राग चित्रातून व्यक्त करते तशी तुम्ही कोणतीही एक भावना चित्रातून दाखवायची आहे. विदयार्थ्यांना चित्र काढण्यास दयावे.
जसे : तुम्हांला आनंद कशाने होतो ?
कृती क्रमांक 17 :- गमतीदार चेहरे
१) कृतिपत्रिकेत दिलेल्या चेहऱ्यांमध्ये वेगवेगळ्या भावना काढण्यास विद्यार्थ्यांना मदत करावी.
२) तसेच चेहरे दुसऱ्या स्वतंत्र कागदावर काढून ते छोटे-छोटे चेहरे कापून त्याला खाली काठी चिकटवावी. आता प्रत्येकाजवळ प्रत्येक भावनेचा एक चेहरा असेल. या मार्गदर्शिकेच्या शेवटी चेहऱ्यावरील वेगवेगळ्या भावना दिल्या आहेत त्याचा वापर करावा.
कृती क्र. १८ : गोष्टीत काय झाले ?
आता प्रत्येकाकडे विविध भावना दर्शविणारे चेहरे असतील. विदयार्थ्यांना एखादी गोष्ट सांगत मध्येच थांबून, 'त्याला कसे वाटले असेल? तुमच्या जवळचा चेहरा उचलून दाखवा' असे सांगावे. जसे : एक म्हातारी आजीबाई होती. ती एकटीच रहायची. तिला तिच्या | लेकीची खूप आठवण येत होती. (येथे थांबून तिला कसे वाटत असेल ? मला वाटते तिला खूप वाईट वाटत असेल. असे सांगून शिक्षकांनी त्यांच्या जवळील दुःखी चेहरा उचलून दाखवावा. विदयार्थ्यांनाही दाखविण्यास सांगावे.) तिने ठरविले लेकीला भेटायला जायचे. पण वाटेत खूप घनदाट जंगल होते. (तिला काय वाटत असेल रे ? असे विचारावे व दिलेल्या चेहऱ्यांपैकी एक उचलून दाखविण्यास सांगावे.) अशा प्रकारे गोष्ट पुढे न्यावी.
| विशेष गरजा असणाऱ्या विदयार्थ्यांसाठी (CWSN) : काही विदयार्थ्यांना एखादी भावना | पुन्हा पुन्हा वर्णन करून सांगावी लागेल.
कृती क्र. १९ : मला आज कसे वाटते?
| हजेरी तक्त्याशेजारीच मुलांना त्यांच्या मनःस्थिती (मूड) नुसार, त्यांना आज कसे वाटते | दर्शविणारा चेहरा चिकटविण्यास जागा दयावी.
| विशेष गरजा असणाऱ्या विदयार्थ्यांसाठी (CWSN): विद्यार्थ्यांची भावनिक व मानसिक स्थिती समजून घेण्यासाठी ही अत्यंत उपयोगी कृती आहे. एखादा विद्यार्थी सतत दुःखी, | रागावलेला किंवा निराश असतो का याकडे लक्ष दयावे. काही समस्यांमधून, भावनिक
Comments
Post a Comment