मुलांच्या अभ्यासात पालकांची भूमिका

मुलांच्या अभ्यासात पालकांची भूमिका :

मुलांना अभ्यासाची सवय लावण्यासाठी पालकांना बरेच परिश्रम घ्यावे लागतात. धाक दाखवून, चोप देऊन मुलांना अभ्यासाला बसविणाऱ्या पालकांनी सर्वप्रथम हे लक्षात ठेवावे की, मुलांना अभ्यासाची गोडी लावण्याचे उद्दिष्ट त्या मार्गाने कधीही साध्य करता येत नाही. त्यासाठी मुलांच्या अगदी बालपणापासूनच आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात.

● मुलांना सर्वप्रथम वाचनाची गोडी लावावी. त्यासाठी भरपूर पुस्तकं खरेदी करावीत. सर्वप्रथम बालकथांची पुस्तकं त्यांना वाचायला द्यावीत.

एखाद्या पुस्तकातील गोष्ट आपण त्यांना संपूर्णपणे सांगू नये. गोष्ट त्यांना खूप हवीहवीशी वाटेल त्यावेळी त्यांना ते पुस्तक वाचायला द्यावे आणि यानंतरची गोष्ट या पुस्तकात वाचा असे सांगावे. मुलं लगेच ते. वाचून काढतात. पुस्तक

काही मुलांना अवघड गणितं सोडवायला आवडतात. पालकांनी त्यांना ती संधी द्यावी. त्यासाठी मुलांना प्रेरित करावे. ही सिद्धता मला वेगळ्या पद्धतीने सोडवून दाखवं! हे बघ, हे गणित आणखी एका पद्धतीने सोडवता येतं का ते आपण बघूयात! असं म्हणून त्यांना अभ्यासाला बसवावं. आपण स्वतः त्यांच्या सोबत बसावं.

● भूगोल, इतिहास, विज्ञान यांसारख्या विषयांत नकाशे, आकृत्या, फोटोग्राफ्स, कॅसेट्स, व्हिसीडीज आणि सिडीजच्या साहाय्याने आपण त्यांच्या मनात अभ्यासाची गोडी निर्माण करू शकता.

• दूरदर्शन, कॉम्प्युटर, इंटरनेट, टेपरेकॉर्डर यासह सर्व आकर्षक शैक्षणिक साधनांचा मुलांच्या अभ्यासात भरपूर उपयोग करून घ्या.
● मुलं अभ्यासाला बसलेली असताना पालकांनी शक्यतो त्यांच्यासोबत असावे. त्यांना मार्गदर्शन करावे. ते जमत नसेल तर त्यांनी काही वाचून दाखविले किंवा एखादे गणित सोडवून दाखविले किंवा अभ्यासातील काही सांगितले तर त्यांचे कौतुक करावे. नंतर सांग. जा, तू तुझा अभ्यास कर! असं म्हणून मुलांचा उत्साह कोमेजून टाकू नये.

• मुलांनी केलेल्या कोणत्याही चांगल्या कृतीचे पालकांनी भरभरून कौतुक करावे.

• मुलांना अभ्यासाचे दडपण वाटेल असे पालकांनी वागू नये.

• वारंवार परीक्षेचे स्मरण करून देऊन मुलांमध्ये दहशत निर्माण होईल असे वागू नये. त्यांना सतत दिलासा देत राहावे..

• शुद्ध लेखन, वाचन, पाठांतर यासाठी मुलांना मार्गदर्शन करावे.

● मुलांना एखादा छंद असेल तर त्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा त्यांना पुरवाव्यात. त्यांनी केलेल्या कृतीचे कौतुक करावे.

• पाल्य समोर दिसताच त्यांना फक्त अभ्यासाविषयी विचारणे, त्यांच्या मनावर अभ्यासाचे दडपण निर्माण करणे, शिक्षेची दहशत निर्माण करणे, नकारार्थी आणि निराशावादी बोलणे, पदोपदी अपमानित करणे या गोष्टी पालकांनी आवर्जून टाळाव्यात.
पालकांनी मुलांच्या बाबतीत, त्यांच्या कुवतीप्रमाणे रास्त अपेक्षा बाळगण्यात आणि त्या पूर्ण होतील यासाठी अधिकात अधिक सोयी सुविधा त्यांना पुरवाव्यात, त्यांचे कौतुक करावे व त्यांना प्रोत्साहित करावे त्यांची पाठराखण करावी.

• मुलांच्या अभ्यासात पालकांचा सहभाग हा शिक्षणातील स्पर्धेमुळे अविभाज्य भाग झाला आहे. मुलांना शाळेत पाठविणे आणि शाळेसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या आवश्यक सोयीसुविधा पुरविणे एवढ्यावर पालकांची जबाबदारी संपत नाही.

• मुलांच्या एकूण शैक्षणिक विकासात आणि प्रगतीत एक पर्यवेक्षक म्हणून तसेच एक मार्गदर्शक आणि सहायक म्हणून पालकांना सक्रिय सहभाग घ्यावा लागतो.

मुले आणि पालक ज्ञानाच्या बाबतीत एकाच पातळीवर येत नाहीत तोपर्यंत पालकांना मुलांच्या अभ्यासात सहभागी होणे अपरिहार्य आहे.

● मुलांची दैनंदिन प्रगती तपासणे म्हणजे मुलाने आज शाळेत काय केले? नवीन काय शिकले? हे पालकांनी विचारायलाच हवे.

शाळेत शिकवलेला तो भाग काही कारणाने मुलांना समजला नसेल तर त्यांच्या अडचणी आणि शंकांचे पालक निरसन करू शकतात. यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढायला मदत होते.

● मूलांचे विषय शिक्षक, वर्गशिक्षक आणि मुख्याध्यापक यांना पालकांनी नियमित भेटायला हवे.

● दिनचर्या आखणे नियोजन करणे, वेळापत्रक तयार करणे, वेळापत्रकाची अंमलबजावणी करणे, मार्गदर्शन करणे यांसारख्या बाबींसाठी पालक आपल्या पाल्यांना मदत करू शकतात.

मुलगा अभ्यासाला बसल्यानंतर तो नियोजनाप्रमाणे आणि वेळापत्रकाप्रमाणे अभ्यास करतो की नाही, हे पालकांनी जाणीवपूर्वक तपासावे.

अभ्यास आणि परीक्षेतील यश याबाबत पालकांनी मुलांकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नयेत, तसेच आपल्या अपेक्षांचे मुलांच्या मनावर फार ओझे होणार नाही, याचीही काळजी पालकांनी घ्यावी.

● आपल्या मुलाच्या क्षमता आणि कुवत ओळखून त्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावा, तसेच वेळोवेळी मुलांना मार्गदर्शन आणि आपल्या परीने शक्य होईल ती मदत करावी.

एखादी गोष्ट मुलांना जमत नसेल तर पालकांनी ती कशा प्रकारे करायची ते सांगावे. अगदीच गरज पडल्यास करून दाखवावे; पण शेवटी त्याचे त्यालाच करायला सांगावे.

• मुले प्रत्येक गोष्ट करायला शिकत असतात. कोणतीही गोष्ट कशा प्रकारे करायची हे त्यांनी शिकायलाच हवे. हा दृष्टिकोन मुलांच्या मनात पालकांनी निर्माण करावा.

अभ्यासातील आणि शैक्षणिक प्रगतीसाठी मुलांना स्वावलंबी करण्यावर आणि स्वयंशिस्त लावण्यावर पालकांनी भर द्यावा.

• स्वावलंबन आणि स्वयंशिस्त या गोष्टी मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी खूप आवश्यक असतात. मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे आणि त्यांना स्वयंनिर्भर करण्याचे काम पालकांचे असते.


Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

1000 "OPPOSITE" Words in English