बेत्ते नेस्मिथ ग्रॅहम

1951 मध्ये या शॉर्टशॉर्टहँड टायपिंग करणाऱ्या मुलीने व्हाइटनर चा शोध लावला. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात ती टायपिस्टची नोकरी करू लागली. टायपिंग मध्ये काही चुका झाल्यास तिला बॉस ची बोलणी खावी लागत असत. चित्रकार आपली एखादी चूक झाल्यास त्यावर पांढरा रंग लावतात हे तिने पाहिले होते. त्याच धर्तीवर तिने पांढरा रंग आणि काही रसायने वापरून एक मिश्रण तयार केले. आपल्या चुकांवर ते मिश्रण लावून बेत्त बिनचूक कागदपत्रे तयार करू लागली. हे गुपित तिने आपल्या इतर टायपिस्ट मैत्रिणींना सांगितले. तिच्याकडून हे मिश्रण घेऊन मैत्रिणी वापरू लागल्या.घरीच स्वयंपाक घरात घरगुती मिक्सर वर बेते हे मिश्रण तयार करीत असत परंतु मागणी वाढल्यामुळे तिला वेळ मिळेनासा झाला तिच्या बॉसने तीला कामावरून काढून टाकले. मग तिने स्वतःची कंपनी सुरू केली मिस्टेक आऊ ट या गमतीशीर नावाने तिने हे उत्पादन सुरू केले.