कथा - टमाटे

-----------------
नीतिकथा
-----------------

🍅 एकदा शिक्षिकेने तिच्या विद्यार्थ्यांना प्लॅस्टिकच्या पिशवीतून काही टमाटे शाळेमध्ये आणावयास सांगितले.

🍅 प्रत्येक टमाट्यावर त्या मुलांनी, ते ज्या व्यक्तिचा द्वेष करत असतील त्याचे नाव लिहून आणावयाचे होते.

🍅अशा रीतीने, जेवढ्या व्यक्तींचा ते द्वेष करत असतील तेवढेच टमाटे त्यांनी आणावयाचे होते.

🍅 ठरलेल्या दिवशी, सर्व मुलांनी व्यवस्थित नावे टाकलेले त्यांचे टमाटे आणले.

🍅 काहींनी दोन, काहींनी तीन, काहींनी पाच तर काहींनी वीस टमाटे, ते द्वेष करीत असलेल्या संख्ये बरहुकूम आणले.

🍅 शिक्षिकेने नंतर सर्वांना सांगितले की, त्यांना ते टमाटे ते जिथे जिथे जातील त्या सर्व ठिकाणी दोन आठवडे बरोबर घेऊन जायचे आहेत. 

🍅 जस जसे दिवस उलटू लागले, तस तसे मुले टमाट्यांच्या कुजण्याची आणि दुर्गंधीची तक्रार करू लागले.

🍅 ज्या विद्यार्थ्यांकडे संख्येने जास्त टमाटे होते त्यांनी तक्रार केली की, त्यांच्याकडची ओझी वाहून नेण्यास अतिशय जड असून दुर्गंधही फारच सुटलेला आहे.

🍅 आठवड्यानंतर, शिक्षिकेने विद्यार्थ्यांना प्रश्न केला, " तुम्हाला या आठवडाभर कसे वाटले ? "

🍅 मुलांनी घाणेरड्या वासाबद्दल आणि टमाट्यांच्या जड वजनाबद्दल तक्रारी केल्या. विशेषत: ज्यांनी अनेक टमाटे आणले होते.

🍅 शिक्षिका म्हणाली, " हे अगदी तुम्ही, आपल्या अंत:करणात, तुम्हाला काही न आवडणाऱ्या व्यक्तिंबद्दल द्वेष बाळगता त्याप्रमाणेच तंतोतंत आहे."

🍅 द्वेषामुळे अंत:करण रोगट बनते आणि तुम्ही तो द्वेष जिथे जिथे जाल तिथे बरोबर घेऊन जाता.

🍅 "जर तुम्ही टमाट्यांचा दुर्गंध आठवडाभरासाठी सहन करू शकत नसाल, तर कल्पना करा, तुम्ही रोज वागवत असलेल्या कडवटपणाचा तुमच्याअंत:करणावर किती परिणाम होत असेल ! "

🍅 अंत:करण ही एक सुंदर बाग आहे. अनावश्यक तण काढून टाकून त्याची नियमीत मशागत करण्याची गरज असते.

🍅 तुम्हाला क्रोध दिलेल्यांना क्षमा करा.

🍅 त्यामुळं नवीन चांगल्या गोष्टी साठवण्यासाठी तुमच्या अंत:करणात जागा तयार होईल.

🍅 आपण सर्वजण मिळून एकत्रित काम करूया. कटुता नव्हे तर काही चांगलं मिळवण्यासाठी. 
--------------------------------

🍅 🍅 🍅 🍅
App download करण्यासाठी समोर क्लिक करा Coastal Mind App

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

जालना नवोदय कट ऑफ लिस्ट 2025

इतिहासात पहिल्यांदाच नवोदय परीक्षामधील मुलांचे मार्क कळत आहेत. बघा यावर्षी चे मार्क्स