महात्मा गांधी गोष्ट - 1


महात्मा गांधी गोष्ट - 1

गांधीजी दुसरी-तिसरीत इंग्रजी शिकत होते.
शाळेत एकदा विद्या अधिकारी तपासणीसाठी आले आणि त्यांनी वर्गात सर्व विद्यार्थ्यांना पाच इंग्रजी शब्द लिहायला दिले.

वर्गशिक्षक फिरत फिरत तिरप्या दृष्टीने विद्यार्थी काय लिहितात ते पहात होते. त्यांची छाती धडधडत होती. कुणी चुकीचे लिहिले तर अपयशाचे खापर शिक्षकांच्या डोक्यावरच फुटणार ना? अधिकारी म्हणतील, शिक्षकांनी चांगले शिकविले नाही. 

मोहनदास यांनी केटल (kettle) शब्दाचे शुद्धलेखन चुकीचे लिहिले होते. ते शिक्षकांच्या लक्षात आले; पण बिचारे काय करणार फिरत फिरत ते त्याच्या जवळ गेले आणि त्याच्या पायावर बुटाच्या टोकाचा स्पर्श केला, डोळ्यांनी खून करून शेजार च्या विद्यार्थ्यांची पाटी दाखवली.

 पण चोरी करावी असा विचार मोहनदासच्या स्वप्नात देखील आला नव्हता. त्यांना कसे समजणार की, गुरुजी दुसऱ्यापासून चोरी करून शुद्धलेखन लिहिण्याचा धडा देत आहेत.

 दुसऱ्या दिवशी गुरुजींनी सांगितले, "खरोखर, मूर्ख मुलगा! किती सूचना देऊन सुद्धा समजले नाही."
 
गांधीजी गुरुजी समोर बोलले नाहीत पण मनात समजले की त्यांचा उद्देश घेण्यासारखा नव्हता, कारण तो असत्याचा आदेश होता.



For Download click here Coastal Mind App

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

1000 "OPPOSITE" Words in English