जीवन छोट्या छोट्या निर्णयांतून निर्माण होते COMPOUND EFFECT DARREN HARDY डॅरेन हार्डी यांचे 'द कंपाउंड इफेक्ट' हे पुस्तक स्वयंशिस्तीवर एक उत्तम मजकूर मानला जातो. हार्डी या पुस्तकात स्पष्ट करतात की गोष्टी एकमेकांशी संबंधित असतात आणि यशस्वी होण्यासाठी अनेक छोट्या छोट्या गोष्टी सुधाराव्या लागतात. संधी वि. निवड आपली नियती योगायोगाने नव्हे, तर आपल्या निवडीनुसार ठरते. आपल्या दैनंदिन जीवनात आपण घेतलेल्या निर्णयामुळे आपले वास्तव निर्माण होत असते. एवढेच नाही, तर ते निर्णय आपले भविष्यही घडवतात. हे फक्त मोठ्या निर्णयाबद्दल नाही, तर आपण घेतलेल्या छोट्या निर्णयांवरही बरेच काही अवलंबून असते. त्यामुळे आयुष्यात मोठ्या गोष्टी मिळवायच्या असतील तर काही छोटे सकारात्मक निर्णय घेतले पाहिजेत. हे निर्णय नंतर तो कंपाउंड इफेक्ट तयार करतील, ज्यामुळे आपल्याला यश मिळेल. चांगल्या सवयी लावणे आपल्या स्वभावातील वर्तनातील सवय ही अशी क्रिया आहे, जिची आपण वारवार पुनरावृत्ती करत असतो व ती आपल्या स्वभावाचा एक भाग बनते, वर्तणूकशास्त्रानुसार आपण ६६ दिवस काही केले तर ती सवय बनते. अशा वेळी चांगल्या सवयी लावल्या तर यश...