जीवन छोट्या छोट्या निर्णयातून निर्माण होते...

जीवन छोट्या छोट्या निर्णयांतून निर्माण होते
COMPOUND EFFECT
DARREN HARDY

डॅरेन हार्डी यांचे 'द कंपाउंड इफेक्ट' हे पुस्तक स्वयंशिस्तीवर एक उत्तम मजकूर मानला जातो. हार्डी या पुस्तकात स्पष्ट करतात की गोष्टी एकमेकांशी संबंधित असतात आणि यशस्वी होण्यासाठी अनेक छोट्या छोट्या गोष्टी सुधाराव्या लागतात.

संधी वि. निवड
आपली नियती योगायोगाने नव्हे, तर आपल्या निवडीनुसार ठरते. आपल्या दैनंदिन जीवनात आपण घेतलेल्या निर्णयामुळे आपले वास्तव निर्माण होत असते. एवढेच नाही, तर ते निर्णय आपले भविष्यही घडवतात. हे फक्त मोठ्या निर्णयाबद्दल नाही, तर आपण घेतलेल्या छोट्या निर्णयांवरही बरेच काही अवलंबून असते. त्यामुळे आयुष्यात मोठ्या गोष्टी मिळवायच्या असतील तर काही छोटे सकारात्मक निर्णय घेतले पाहिजेत. हे निर्णय नंतर तो कंपाउंड इफेक्ट तयार करतील, ज्यामुळे आपल्याला यश मिळेल.

चांगल्या सवयी लावणे 
आपल्या स्वभावातील वर्तनातील सवय ही अशी क्रिया आहे, जिची आपण वारवार पुनरावृत्ती करत असतो व ती आपल्या स्वभावाचा एक भाग बनते, वर्तणूकशास्त्रानुसार आपण ६६ दिवस काही केले तर ती सवय बनते. अशा वेळी चांगल्या सवयी लावल्या तर यश दूर नाही. याच्या उलटही खरे आहे. वाईट सवयीही आपला पराभव करू शकतात.

प्रतिभा पुरेशी नाही
जीवनात यश मिळवण्यासाठी प्रतिभा आवश्यक असते, पण ती पुरेशी नसते. यशस्वी होण्यासाठी यशाचा सराव करावा लागेल. चांगल्या सवयी लावून हे घडते. शिस्त आणि सातत्य अंगी बाणवावे लागेल. थोडक्यात, अशा सवयी विकसित करा, ज्या आपल्याला ध्येयाच्या जवळ नेतील

जीवन सर्वात आधी

आधी जीवन निवडा, मग करिअर अनेकदा लोक कोणत्या प्रकारचे जीवन जगायचे आहे याचा विचार करता नोकरी निवडण्याची चूक करतात. ज्यात खरा आनंद मिळतो ते काम नेहमी आधी निवडले पाहिजे.

आपल्या निर्णयाचे फळ
आपल्याला आयुष्यात काही गोष्टी मिळवायच्या असतील तर त्यासाठी अशी व्यक्ती असायला हवी जी सहसा त्या गोष्टी आपल्याकडे आकर्षित करते आजचे जीवन आपलेच प्रतिबिंच आहे. तो आपल्या निर्णयांचा निव्वळ परिणाम आहे आपली स्थिती सुधारायची असेल तर क्षमता दृष्टी व कौशल्य यावर काम करावे.

काही सर्जनशील करा
विध्वंसक वा आपली हानी करणाऱ्या सवयच्या सापळ्यात सापडता तेव्हा स्वतःला विचारा, आपल्याला जे करायचे आहे ते आपल्या यशात योगदान देईल का? नसल्यास त्याऐवजी काही सर्जनशील करा: केवळ आपली क्षमता वाढवून आणि त्यांना प्रभावी बनवून आपल्या आवडीच्या गोष्टी आपल्याकडे आकर्षित करू शकाल.

सौजन्य - दिव्य मराठी 

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

1000 "OPPOSITE" Words in English