Posts

बेत्ते नेस्मिथ ग्रॅहम

Image
1951 मध्ये या शॉर्टशॉर्टहँड टायपिंग करणाऱ्या मुलीने व्हाइटनर चा शोध लावला. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात ती टायपिस्टची नोकरी करू लागली. टायपिंग मध्ये काही चुका झाल्यास तिला बॉस ची बोलणी खावी लागत असत. चित्रकार आपली एखादी चूक झाल्यास त्यावर पांढरा रंग लावतात हे तिने पाहिले होते. त्याच धर्तीवर तिने पांढरा रंग आणि काही रसायने वापरून एक मिश्रण तयार केले. आपल्या चुकांवर ते मिश्रण लावून बेत्त बिनचूक कागदपत्रे तयार करू लागली. हे गुपित तिने आपल्या इतर टायपिस्ट मैत्रिणींना सांगितले. तिच्याकडून हे मिश्रण घेऊन मैत्रिणी वापरू लागल्या.घरीच स्वयंपाक घरात घरगुती मिक्सर वर बेते हे मिश्रण तयार करीत असत परंतु मागणी वाढल्यामुळे तिला वेळ मिळेनासा झाला तिच्या बॉसने तीला कामावरून काढून टाकले. मग तिने स्वतःची कंपनी सुरू केली मिस्टेक आऊ ट या गमतीशीर नावाने तिने हे उत्पादन सुरू केले.

महान बुद्धिमत्ताच स्वतःचा विचार करते

Image
इमॅन्युएल केंट आधुनिक तंत्रज्ञानाचे केंद्रबिंदू मानले जात. मानवाचा मेंदू त्याच्या विचारांची इमारत बांधतो या चर्चेला त्यांनी तोंड फोडले.  जन्म - 22 एप्रिल 1724.    मृत्यू - 12 फेब्रुवारी 1804 तुमच्याकडे जे आहे त्यावरून तुम्ही श्रीमंत बनत नाही, तर जे नाही त्याच्याविना काम भागवून तुम्ही श्रीमंत बनत असतात. कमजोर माणसाची शक्ती आहे धैर्य, शक्तिशाली माणसाची कमजोरी बेचैनी. खोटे हे तर खोटेच असते मग ते चांगल्या हेतूने ही बोललेले का असेना. डोळे, मित्र आणि त्याची आवडती व्यक्ती  बाबत खूप काही सांगत असतात. तुम्ही मला जेवढे पाहू शकता तेवढेच जाणू ही शकता मात्र मी वास्तवात कसा आहे हे जाणू शकत नाही. व्यक्ती मनाच्या अंदाज गुरांशी त्याची वागणूक कशी आहे यावरून सुद्धा लावला जातो. उचित असतात म्हणूनच उचित कामे करा. महान मेंदूच स्वतः बाबत विचार करतो. मनुष्याने शिस्तप्रिय असणे अतिशय गरजेचे कारण त्याचा स्वभाव रानटी असतो. बुद्धिमान व्यक्तीच स्वतःला बदलू शकते जिद्दी व्यक्ती कधीच बदलू शकत नाही. - इमॅन्युएल केंट

नवोदय माहिती

5 वी नवोदय प्रवेश परीक्षा Online form भरण्याचा अंतिम दिनांक - 15 डिसेंबर 2020 परीक्षा दिनांक - 10 एप्रिल 2021 Form व अधिक माहिती साठी http://www.navodaya.gov.in Prospect Download करण्यासाठी पुढे क्लिक करा.. Prospect of JNVS    आज आपण 5 वी नवोदय प्रवेश परीक्षा बद्दल संपूर्ण माहिती घेऊया.   ▪️ *5 वी शिकत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते* • प्रत्येक जिल्ह्यातील 80 विद्यार्थ्यांची निवड होते  • ग्रामीण भागातील विद्यार्थी 60% व शहरी भागातील 40% विद्यार्थ्यांची निवड केली जाते.  • SC / ST/OBC / OPEN आरक्षण आहे.  • निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 6 वी ते 12 पर्यंत जवाहर नवोदय विद्यालय येथे *संपूर्ण मोफत शिक्षण NCERT BOARD प्रमाणे असते* . ▪️ *परीक्षा* • परीक्षा प्रत्येक तालुकास्तराव होते.  • एकूण गुण - 100  • एकूण प्रश्न संख्या - 80  • प्रत्येक प्रश्न - 1.25 गुणासाठी. • परीक्षा वेळ - 2 तास. ▪️ *विषय व गुण* • मानसिक क्षमता - 40 प्रश्न  " 10 प्रश्न असून प्रत्येक प्रश्नात 4 उपप्रश्न असतात. "  • अंकगणित  - 20 प्रश्न...

कासव आणि ससा - कथा जुनी आशय नवीन

Image
*कथा जुनी आशय नवीन*              ससा आणि कासवाच्या शर्यतीत ससा झोपून राहिल्याने हरला. कासव जिंकले पण सशाला शांत बसवेना . आपल्यात वेगाने पळण्याची क्षमता अधिक असूनही निव्वळ झोपल्यामुळे आपण हरलो हे त्याच्या लक्षात आले. पराभवाचा हा सल संपविण्यासाठी त्याने कासवापुढे पुन्हा शर्यतीचा प्रस्ताव ठेवला. विजयाच्या आनंदात आपण जिंकू शकतो, यावर विश्वास बसलेल्या कासवाने होकार भरला. शर्यत पुन्हा सुरू झाली. यावेळी सशाने चूक केली नाही. तो थांबला नाही. झोपला नाही. परिणामी, वेगवान ससा शर्यत जिंकला. हळू चालणारे कासव हरले. *पण एकदा विजयाची चव चाखलेलं कासव हार पत्करायला तयार नव्हतं.* कासव पुन्हा सशाकडे गेलं. म्हणालं,'मी तुझं ऐकलं. आता तू माझे ऐक. आपण पुन्हा शर्यत लावू !'ससा हसला आणि म्हणाला,  *"एकदा माझ्या चुकीमुळे हरलो. पुनःपुन्हा मी ती चूक कशी करेन ?* पण तुझी हरण्याचीच इच्छा असेल तर लावू पुन्हा शर्यत !' सशाचा होकार मिळाला तसं कासव म्हणालं, 'पण यावेळी शर्यतीचा मार्ग मी ठरवणार !' स्वतःच्या वेगाची आणि कासवाच्या धिम्या गतीची खात्री असलेल्या सशाने त्यालाही होकार भरला . ...

डॉ.ए.पि. जे.अब्दुल कलाम यांचा जीवन परिचय

Image
*डॉ.ए.पि. जे.अब्दुल कलाम यांचा जीवन परिचय* पूर्ण नाव : अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम जन्म  : १५ ऑक्टोबर १९३१, रामेश्वर नागरिकत्व : भारतीय राष्ट्रीयत्व : भारतीय धर्म : मुस्लीम पुरस्कार : पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’, ‘भारतरत्न वडील : जैनुलाबदिन अब्दुल अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम (तमिळ: அவுல் பகீர் ஜைனுலாப்தீன் அப்துல் கலாம்) (जन्म ऑक्टोबर १५, १९३१, तमिळनाडू, भारत) यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते. हे भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७) होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून लोकप्रिय झाले. अनुक्रमणिका १. शिक्षण २. कार्य ३. गौरव ४. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची कारकीर्द ५. अब्दुल कलाम यांनी लिहिलेली पुस्तके ६. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके ७. संदर्भ * शिक्षण * त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र ग...

गुळवेलाचे फायदे

Image
गुळवेल हे वरदान व राष्ट्रीय औषध म्हणून जाहीर केले त्याबद्दल उपयुक्त माहिती... 🙋‍♂🌴🙋🙋‍♂🌴🙋🙋‍♂👇🏻 गुळवेल  ========== दिव्य औषधी ‘गुळवेल’ ही आयुर्वेदातील महत्त्वाची वनस्पती आहे. गुळवेल या वनस्पतीस ‘अमृता’ हे नाव देखील आहे. कारण, ती अमृतासमान गुणकारी आहे. गुळवेल माणसाच्या अगणित व्याधींना दूर करून त्यास दीर्घायुषी करते.  गुळवेल ही अनेक वर्षे टिकणारी, एखाद्या झाडाच्या वा दुसर्‍या कोणत्याही आधाराला धरून वर चढणारी, नेहमी हिरवीगार राहणारी वेल आहे. दोन फांद्यामधून फुटणार्‍या बारीक दोर्‍यासारख्या तणावाच्या साहाय्याने आधाराला धरून गुळवेल वर चढते. गुळवेल ही दिसायला मनीप्लांटसारखी परंतु, अतिशय दाट अशी विशाल वेल असते. पाने हृदयाच्या आकाराची असतात. यास पिवळी फुले येतात व लाल रंगाची छोटी छोटी गोल फळे झुबक्यांमध्ये लागतात. याचे कांड रसभरीत असते, ज्याचा औषधीकरिता उपयोग केला जातो. गुळवेलीची अमृतासमान, रसायनी वा वयस्था (तारुण्याचे रक्षण करून म्हातारपण व रोगाचा नाश करणारी) अशी आयुर्वेदीय समर्पक नावे आधुनिक संशोधनाने यथार्थ ठरली आहे. गुळवेलीच्या मोठ्या वेली मांसल असून, मोठ्या झाडा...

प्रेरणादायी विचार 1

📍 कधीही शाळेत न गेलेले छत्रपति  स्वराज निर्माण करतात 📍जातीय व्यवस्थेमुळे अपमान सहन करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारताची राज्य घटना लिहितात. 📍आईचे प्रेम आणि बापाचे छत्र नसलेला 'बराक'नावाचा पोर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो 📍पेट्रोलपंपा वर काम करणारे 'धीरुभाई' करोड़ोंचे साम्राज्य उभे करतात... 📍कॉलेजच्या प्रवेश फी साठी पैसे नाहीत म्हणून बहिणीचे दागिने गहाण ठेवणारे 'अब्दुल कलाम' राष्ट्रपती पदापर्यंत जाता 📍रोजगार हमीच्या कामावर जाणारे आर.आर.पाटील राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री होतात. 📍सत्तावीस वर्ष तुरुंगात काढणारे 'नेल्सन मंडेला' जगाला प्रेम शिकवतात. 📍कुठलीही शारीरिक हालचाल न करू शकणारे 'स्टीफन हॉकिंग' जग हलवणारे संशोधन करतात... "शुन्यातून प्रवास करत माणसे प्रेरणादायी जग निर्माण करतात..." मग, आम्ही का नाही???" 🍒 माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो यावरून त्याची किंमत होत नसते,  परंतु, तो इतरांची किती किंमत करतो,किती सकारात्मक विचार करतो,परिस्थितीशी कसा लढतो  यावरून त्याची किंमत ठरत असते . 🍒 🐧पक्षी जेंव्हा जिवंत असतो तेंव्हा तो...