सरपंच सुविचार
_*समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात, म्हणून मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा कारण त्याने मन हलकं तर होईलच व लढण्याची ताकद पण येईल..!*_
_*यशस्वी होण्याचे सगळे मंत्र, मेहनत या शब्दाने सुरु होतात...*_
_*यशस्वी भरपूर जण असतात परंतु समाधानी फार कमी असतात यश हा जरी तुमच्या कर्तुत्वाचा विजय असला तरीही समाधान हा तुमच्या मनाचा विजय असतो.*_
_*उंच शिखरावर जरुर चढावं पण जगाने आपल्याकडे पहावे म्हणून नाही तर, शिखरावरून आपल्याला जग पाहता यावं म्हणून...*_
*इतरांकडून कमीत कमी "अपेक्षा" आणि स्वतः कडून जास्तीत जास्त "तडजोड" या दोनच गोष्टी प्रत्येकाचं जीवन आनंदी आणि यशस्वी बनवू शकतात.*
*शांतता बऱ्याच समस्यांवर औषध असते पण जेव्हा मान, सन्मान आणि स्वाभिमानावर वार केला जातो तिथं तोंड उघडणे खूप गरजेचे असते. समोरचं संकट पाहून रडायचं की लढायचं हे स्वतः ठरवायचं असतं. रडलात तर संकट तुम्हाला संपवून टाकेल आणि लढलात तर तुम्ही संकटाला संपवून टाकाल. आशिर्वाद आणि सदिच्छा यांना कोणताही रंग नसतो. पण ते मिळाले की, जीवनात रंग भरले जातात. मनाचं भांडवल मोठं असलं की सुखाचा तोटा कधीच होत नसतो. लोक म्हणतात पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत..*_
_*दिवस तेच आहेत...*_
_*पण खरं तर लोकं पाहिल्यासारखे राहिले नाहीत.प्रत्येकजण आपल्या गरजेनुसार महत्व देत असतो आणि आपल्याला 'भ्रम' असतो आपण खास आहोत म्हणून लक्षात ठेवा वेळेनुसार जशा तारखा बदलतात तसंच गरजेनुसार लोकांच्या बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते ..!!!*_*आयुष्यात कितीही लोकांची गर्दी असली तरी,*
*आपल्याला विसावा प्रेम आपलेपणा आपल्याच व्यक्ती जवळ मिळतो...*
🌷 *शुभ सकाळ*🌷
*कोणी कसं "वागावं" हे आपल्या हातात केव्हाच नसतं, पण त्याचा आपण स्वतःवर कितपत "परिणाम" करून घ्यायचा हे मात्र निश्चित आपल्या हातात असतं..!!!* *मोक्यावर साथ सोडणारी माणसं बऱ्याचदा तीच असतात ज्यांना कधी काळी आपण डोक्यावर घेऊन नाचलेलो असतो..!*
_*त्यामुळे आपल्या व्यथा तिथे मांडा जिथे समाधान मिळेल. आणि आपला माथा तिथे टेकवा जिथे स्वाभिमान मिळेल.नाही तर व्यथा आणि माथा तुडवण्यात लोकं खूप सराईत आहेत...म्हणून*_
*सांभाळून चला कारण कौतुकाच्या पुलाखाली स्वार्थाची नदी वाहत असते....* *ओळख,मैत्री,विश्वास,प्रेम,श्रद्धा व भक्ती या आयुष्यातील एका सुंदर प्रवासाच्या पायऱ्या आहेत.....*
*कोणी,कुठे आणि किती वेळ थांबायचे हे ज्याचं त्यानं ठरवायचं..*
🌹 *शुभ सकाळ*🌹
*तत्वनिष्ठ माणूस चुक असेल, बरोबर असेल, पण त्याला स्वतःचे स्वतंत्र विचार असतात...*
*स्वतःच्या विचारांशी एकनिष्ठ माणसं, आपल्या तत्वांचं वेगळेपण जपत असतात, स्वतःच्या विचाराने चालतात...*
*म्हणूनच तत्वनिष्ठ माणसं अनेकदा लोकांच्या नजरेला खटकतात..!*
*जेव्हा आपण निसर्गाचं अनुकरण करतो, तेव्हा साद, प्रतिसाद, कौतुक, प्रसिद्धी आणि लौकिक या सगळ्या गोष्टी सामान्य पातळीवरच्या वाटतात...!*
*जेवणात आणि जीवनात "ठेचा" खाल्ल्याशिवाय मज्जा येत नाही.*
*कल्पनेच्या जगात माणसाला सत्याची ठेच लागली की माणूस वास्तवतेच्या दुनियेत येऊन पडतो* *जगात वेदना इतकी सुंदर बोलते तितकं सुख नाही बोलत सुख माणसाला मुकं बनवतं.*
*ओळख मोठ्या लोकांशी नाही तर साथ देणाऱ्या लोकांशी असावी.*
🌹 *शुभ सकाळ*🌹
*कुणाच्या सांगण्यावरून नाही*
*तर स्वतःच्या अनुभवानुसार*
*माणसाची पारख करा.*
*म्हणजे चांगली माणसं दूर*
*होणार नाहीत.*
*प्रवाहासोबत वाहत जाणं*
*चुकीचं नसतं.*
*पण प्रवाह कशाचा आहे?*
*हे पाहणं जास्त महत्वाचे असते!*
*दुसऱ्यांचं चांगलं करण्यासाठी*
*कोणत्याही पदवीची गरज नसते.*
*फक्त मनात आपलेपणाची*
*चांगली भावना असावी*
*लागते.*
_*शुभ प्रभात...*_🌹🙏🙏🌹
*************************
*बोध कथा*
*************************
*सुसंगतता!!*
----------------------------------------
*कथा*
एकदा एक शिकारी शिकार करायला गेला, त्याला शिकार सापडली नाही, थकल्यासारखे वाटले आणि झाडाखाली झोपी गेला. वाऱ्याचा वेग जास्त होता त्यामुळे झाडाची सावली इकडे तिकडे हलत असल्याने झाडाची सावली वाढत होती किंवा कमी होत होती.
आणि तिथून एक अतिशय सुंदर हंस उडत होता, राजहंसाने पाहिले की बिचारा चिंताग्रस्त, परेशान झाला आहे, सूर्य तळपत आहे. त्याच्या चेहऱ्यावर आणि त्याला नीट झोप येत नव्हती म्हणून हंसाने झाडाच्या फांदीवर पंख उघडले.खाली बसला जेणेकरून शिकारी त्याच्या सावलीत आरामात झोपू शकेल.
तो झोपलेला असताना, एक कावळा आला आणि त्याच फांदीवर बसला, त्याने आजूबाजूला पाहिले आणि काहीही विचार न करता शिकारीवर आपली विष्ठा विसर्जन केली आणि तेथून उडून गेला. मग शिकारी उठला आणि इकडे तिकडे रागाने पाहू लागला आणि त्याची नजर राजहंसावर पडली आणि त्याने ताबडतोब धनुष्यबाण काढून हंसाचा वध केला. हंस खाली पडला आणि मरताना हंस म्हणाला - मी तुझी सेवा करत होतो, मी तुला सावली देत होतो, तू मला मारलेस? यात माझा काय दोष? त्यावेळी पद्मपुराणाचा शिकारी म्हणाला - तुझा जन्म उच्च कुळात झाला असला तरी तुझे विचार तुझ्या शरीरासारखे सुंदर आहेत, तुझे संस्कार शुद्ध आहेत, इतकेच की तू फांदीवर बसून माझी सेवा करत होता. चांगल्या हेतूने झाड. पण तुझी चूक झाली की एक कावळा तुझ्या जवळ येऊन बसला, त्याच क्षणी तुला उडून जायला हवं होतं. त्या दुष्ट कावळ्याचा क्षणभर सहवास तुला मृत्यूच्या दारात घेऊन आला.
*बोध*
*या जगात संगति सदैव ध्यानात ठेवली पाहिजे .जे मन, कृती आणि बुद्धीने ( परमहंस ) श्रेष्ठ आहे. त्यांनी कावळ्यांच्या सभा पासून मेळाव्यापासून अंतर ठेवायला पाहिजे.*
*नेहमी आनंदी राहा - जे काही साध्य होईल ते पुरेसे आहे.*
*ज्याचे मन आनंदी आहे - त्याच्याकडे सर्व काही आहे.*
Comments
Post a Comment