प्रगतशील शेतकरी तथा मराठवाडा रत्न भास्करराव पडूळ यांचा संक्षिप्त परिचय

प्रगतशील शेतकरी तथा मराठवाडा रत्न भास्करराव पडूळ यांचा संक्षिप्त परिचय अंतरवाला ता. जि. जालना येथील सामान्य कुटुंबात जन्म घेऊन केवळ जालनाचेच नव्हे तर शेती विषय, हवामान बदल या विषयांमध्ये भारताचे जगामध्ये प्रतिनिधीत्व करणारे भास्करराव पडूळ यांनी संघर्षमय जीवनातून सुद्धा यशाची अनेक शिखरे पदाकांत केली आहेत. शेती संदर्भात 30 पेक्षा जास्त देशाची वारी करणारे भास्करराव पडूळ हे जालन्यातील एकमेव व्यक्ती असतील. विविध देशांमध्ये त्यांची व्याख्याने असतात. एवढेच नव्हे तर स्थानिक लोकांना रोजगारांच्या संधी व आयात निर्यात याबद्दलही योग्य ते मार्गदर्शन करतात त्यासाठी त्यांनी BPG फार्मर प्रोडूसर कंपनी या संस्थेची स्थापना केली आहे. एड्सग्रस्त लोकांना मोफत औषधोपचार त्यांच्या संस्थेद्वारे सुद्धा केले जातात. भास्करराव पडूळ यांना मिळालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे 🌟⭐️🏆 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा रत्न अवार्ड कृषिभूषण रावसाहेब कडलक राज्यस्तरीय कृषी क्रांती पुरस्कार युवा समूह प्रकाशन राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार युवा समूह प्रकाशन मानव भूषण पुरस्कार दलित साहित्य ...