गुणकारी हळद
टिप्स
गुणकारी हळद
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे गृहिणींचं वर्षभर लागणाऱ्या वस्तू करण्याचं काम जोमाने सुरू आहे. खारोड्या, कुरडया, शेवया याबरोबरच आपल्या सख्या या दिवसात वर्षाची मोहरी, तिखट, हळद करण्यात मग्न असतात. हळद ही पूजेत आणि स्वयंपाकात उपयोगी पडते. अचानक कापलं, खरचटलं तर जंतुनाशक म्हणून अतिशय आवश्यक बाब आहे. अशी ही गुणकारी हळद बऱ्याच गोष्टीला कामी येत असते.
जसे -
💥पावसाने भिजल्याने किंवा थंडी गारव्यामुळे झालेल्या सर्दीत हळदीचा धूर घेतल्यास सर्दी कमी होते.
💥गरम दुधात गूळ व हळद घेतल्यास खोकला थांबतो.
💥गोमूत्रात थोडी हळद मिसळून घेतल्यास श्वास रोगात आराम पडतो.
💥हळद आणि मध एकत्र करून लावल्यास टॉन्सिल्स कमी होतात.
💥आवळ्याच्या रसात हळद व मध मिसळून घेतल्यास मूत्रदोष कमी होतो.
💥हळद व तुरटीच्या पाण्याने डोळे धुतल्यास नेत्रदाह कमी होतो.
💥कच्च्या दुधात हळद मिसळून लावल्यास त्वचा उजळते.
💥जखमेतून येणाऱ्या रक्तावर हळद लावल्यास रक्त थांबते.
💥फोड येऊन तो दुखत असल्यास कापसावर थोडी हळद टाकून ती पट्टी फोडावर बांधल्यास फोड फुकून पस बाहेर येतो.
औषधी पालक
❗️पालकाच्या भाजीत लोह खूप असते. त्यामुळे अॅनिमियाच्या पेशंटला पालक मुद्दाम द्यावा.
❗️पालक खाण्याने पचनक्रिया सुधारते.
❗️बद्धकोष्ठता झाल्यास पालकाचे सूप प्यावे.
❗️कफ झाल्यास पालकच्या रसात मध आणि मिरेपूड मिसळून घेतल्यास कफ कमी होतो.
❗️पालक टाकून उकळलेल्या पाण्याने गुळण्या केल्यास घसा दुखणे थांबते व घशाला आलेली सूज कमी होते.
Comments
Post a Comment