संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्याची महाराष्ट्रातील युवतींना सुवर्ण संधी
संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्याची महाराष्ट्रातील युवतींना सुवर्ण संधी
Gateway To Defence Career
महाराष्ट्र शासन
पूर्वीचे लष्करी मुलांचे वसतिगृह, पत्रकार कॉलनी जवळ, त्र्यंबक रोड, नाशिक-४२२००२.
GSPI
FORMERLY MILITARY BOYS HOSTEL, NEAR PATRAKAR COLONY. TRIMBAK ROAD, NASIK-422002
मुलींची सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था नाशिक :- संरक्षण सेवेमध्ये अधिकारी
१. म्हणून महाराष्ट्रातील युवतींनी जास्तीत जास्त संख्येने जावे, ह्यासाठी नाशिक येथे मुलींची सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची स्थापना महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. प्रथम तुकडीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
२. पात्रता :- (अ) अविवाहित (मुलगी). (ब) महाराष्ट्र/बेळगांव/कारवार / बिंदर येथील अधिवासी (Domicile). (क) जन्म तारीख ०१ जुलै, २००६ ते ३१ डिसेंबर, २००८ च्या दरम्यान. (ड) मार्च एप्रिल / मे, २०२३ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेला बसणारी. (इ) जून-२०२३ मध्ये इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असावी.
३. शारिरीक पात्रता :- सैन्यदलात अधिकारी बनण्यासाठी दिलेल्या सर्व निकषांसाठी पात्र असावी. UPSC ने NDA आणि INA साठी दिलेल्या शारिरीक सर्व निकषांस पात्र असावी. हे निकष UPSC तथा संस्थेच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. काही प्रमुख निकष उंची १५२ से.मी., वजन ४२.५ कि.ग्रा., रातांधळी किंवा रंगांधळेपणा नसावा. NDA / INA प्रवेशासाठी UPSC च्या अधिसूचनेनुसार डोळ्यांची क्षमता असावी (eye power).
४. लेखी परीक्षा आणि मुलाखत :- पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा इंग्रजी माध्यमातून ०९ एप्रिल २०२३ रोजी विविध केंद्रावर घेतली जाईल. परीक्षेमध्ये एकाच प्रश्नपत्रिकेत १५० मार्कांचे बहुपर्यायी Multiple Choice Questions, ७५ गणिताचे आणि ७५ सामान्यज्ञान General Ability Test (GAT) असतील. लेखी परीक्षा साधारणतः इयत्ता ८ वी ते १० वीच्या स्टेट बोर्ड व सी.बी.एस.ई. च्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. प्रत्येक योग्य उत्तराला (१) गुण मिळेल. यशस्वी परीक्षार्थीना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.
५. ऑनलाईन अर्ज www.girlspinashik.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. परीक्षा शुल्क रूपये ४५०/- (परत न करता येण्याजोगे) ऑनलाईन फक्त क्रेडीट कार्ड / डेबिट कार्ड / नेटबँकीग इत्यादी व्दारे भरावे, डिमांड ड्राफ्ट किंवा चलानव्दारे भरलेले परीक्षा शुल्क स्विकारले जाणार नाही. प्रवेश अर्ज संस्थेच्या अटी व शर्तीनुसार भरलेला नसल्यास अर्ज नामंजूर होईल, तसेच प्रवेश परीक्षा शुल्क परत मिळणार नाही.
६. प्रवेश अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख आणि वेळ १२ मार्च, २०२३ संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत.
७. हॉल तिकीट : दिनांक ३० मार्च, २०२३ सकाळी १०:०० वा. नंतर संस्थेच्या संकेत स्थळावरून डाऊनलोड करून घेता येतील.
८.परीक्षा संबधीत सूचनांसाठी www.girispinashik.com हे संकेत स्थळ वेळोवेळी तपासावे.
(एस फिरासत) मेजर (निवृत्त), प्रभारी संचालक.
Comments
Post a Comment