राजश्री शाहू महाविद्यालय लातूर 11 प्रवेश 2023
शिवछत्रपती शिक्षण संस्था, लातूर. राजर्षी शाहू महाविद्यालय (ज्यू. सायन्स), लातूर
एससीएसएस (शाहू) निवड चाचणी - २०२३ SCSS-Screening Test 2023
माहिती पत्रक
इयत्ता १० वी बोर्ड परीक्षा २०२३ देत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिवछत्रपती शिक्षण संस्थेमार्फत SCSS-Screening Test 2023' आयोजित केली आहे. ही परिक्षा १० वी उत्तीर्ण झाल्यानंतर ११ वी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या
विद्याथ्यांसाठी आहे. या प्रवेश परिक्षेतून वैद्यकिय आणि अभियांत्रिकी साठीच्या प्रवेश परिक्षांची तयारी करण्यासाठी अनुक्रमे एम्स् व आयआयटी बॅच तयार करण्यात येईल.
एम्स बॅच (वैद्यकिय गट) : महाराष्ट्रातील विद्यार्थ्याना राष्ट्रीय स्तरावरील AIIMS, JIMPER, AFMC, CENTRAL INSTITUTIONS
आणि देशभरातील सर्व शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील १५ टक्के जागांच्या प्रवेशासाठीचे मुख्य उद्दिष्ट ठेवून एम्स बॅचची
निर्मीती करण्यात आली आहे.
आयआयटी बॅच (अभियांत्रीकी गट) : अभियांत्रीकी क्षेत्रासाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठीत अशा आयआयटी (Indian Institute of Technology), एनआयटी (National Institute of Technology), आयआयआयटी (Indian Institute of Information Technology ), आयआयएससी (Indian Institute of Science), आयआयएसईआर (Indian Education | Science Education and Research), एनआयएसईआर (National Institute of Science Education and Research ) आयआयएसटी (Indian Institute of Space Technology) तसेच देशपातळीवरील काही खाजगी प्रतिष्ठीत अभियांत्रिकी च आर्किटेक्चर महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी आयआयटी बॅचची निर्मिती करण्यात आली आहे.
सदरील महाविद्यालयात प्रवेशासाठी नीट (युजी), जेईई (मेन), जेईई (अॅडव्हान्स्ड्), एनईएसटी, आयआयएसईआर
(अॅप्टीटयूड टेस्ट) या राष्ट्रीय पातळीवरील परिक्षा घेतल्या जातात.
प्रामुख्याने या परिक्षांची तयारी एम्स आणि आयआयटी तुकडीमधून केली जाते.
विज्ञान राजर्षी शाहू महाविद्यालय (स्टेट बोर्ड) प्रवेश :
शिवछत्रपती शिक्षण संस्थाअंतर्गत राजर्षी शाहू महाविद्यालय (ज्यू, सायन्स) ने ११ वी विज्ञान (स्टेट बोर्ड) वर्गात प्रवेश घेऊ
११ वी इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश इ. १० बोर्ड परिक्षेच्या निकालानंतर होतील. सदरील प्रवेश हे बोर्ड परिक्षेतील गुण आणि शासनाच ११ वी विज्ञानसाटीच्या प्रवेशासाठीचे नियमानुसारच होतील. त्यामुळे Screening Test मधून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचेही ११ वी विज्ञान वर्गातील प्रवेश बोर्ड परिक्षेच्या निकालानंतरच शासकीय नियमानुसार अंतिम करण्यात येतील. या बॅचसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्याचे भविष्यातील ११ वी विज्ञान वर्गातील प्रवेश केवळ स्टेट बोर्ड साठी असतील.
Comments
Post a Comment