भूगोल बद्दल सर्वसामान्य माहिती माहीत आहे का ?
भूगोल
भूगोल हा सर्व शास्त्रांची *जननी* म्हणून ओळखला जाणारा सर्वसमावेशक असा विषय आहे. भूगोलाचे स्वरूप आता अधिक गतिशील होत आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा उदा. जीआयएस , जीपीएस चा अभ्यासात वापर केला जात असल्याने भूगोलशास्त्र ही आता अधिकाधिक उपयोजित ज्ञानशाखा झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपले भवितव्य घडवण्यासाठी विविध आकर्षक पर्याय भूगोलाच्या अभ्यासामुळे उपलब्ध होत आहेत. ते आत्मसात केल्यास रोजगाराच्या अनेक संधीही उपलब्ध होऊ शकतात. भूगोलाच्या अभ्यासात साधारणता खालील गोष्टींचा समावेश होतो .
🔰 1) *एक ब्रम्हांड* - (ज्यात वायुमंडल वातावरणातील थर इ.)
🔰 2) दोन अयन -
■ *उत्तरायण व दक्षिणायन* (सूर्याचे भासमान भ्रमण)
🔰 3) तीन पृथ्वीच्या अंतरंगाचे विभाग -
■ *भूकवच, प्रावरण आणि गाभा*
(त्यातील मूलद्रव्य, घनता इत्यादी)
🔰 4) चार प्राणी वर्ग-
■ *जलचर , भूचर, उभयचर , नभचर* (कोणत्या प्रदेशात- कोणत्या हवामानात कोणते इत्यादी )
व 4 महासागर-
■ *पॅसिफिक, अटलांटिक, आर्टिक, हिंदी*
🔰 5) पाच तत्व -
■ *पृथ्वी ,आकाश, अग्नी, जल, वायू* ( पंचमहाभूते)
◆ पृथ्वी - माती, दगड, खनिजे इ
◆ जल - पाणी, वाफ, ढग इ
◆ अग्नी- वीज, प्रकाश, रेडिएश , उष्णता वितरण इ
◆ वायू- हवा, हवामान ,हालचाल, वेग इ
◆ आकाश- अवकाश, पोकळी इ
🔰 6) सहा ऋतू-
■ *शरद, वसंत, शिशिर, ग्रीष्म , वर्षा, हेमंत*
( महिने -ऋतू समीकरणे व त्यातील सामाजिक जीवन , सण )
🔰 7) सात खंड-
■ *आशिया , युरोप , उत्तर अमेरिका , दक्षिण अमेरिका, आफ्रिका , अंटार्टिका, ऑस्ट्रेलिया*
(या खंडावरील लोकजीवन व त्यांची सात वारांमधील - सोमवार ते रविवार व्यवहारिकता)
🔰 8 ) आठ भूस्वरूपे -
■ *पर्वत , पठार, मैदान, खचदरी, ■ खंडांत उतार, सागरी मैदान , सागरी गर्ता, सागरी बेटे*
🔰 9 ) नऊ खगोल-
■ *एक तारा व आठ ग्रह* ( ग्रहांची वैशिष्ट्ये त्यांच्या भोवतीच्या छोट्या वस्तू उदाहरणार्थ उल्का , धूमकेतू इ )
🔰10 ) दहा दिशा -
■ *पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, वायव्य , ईशान्य, आग्नेय, नैऋत्य , ऊर्ध्व , अधर* ( वाहतूक दळणवळण, नकाशा वाचन इ )
*- सामाजिक शास्त्र विभाग.*
(डायट जालना)
Comments
Post a Comment