ज्ञानज्योती-क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार मोती

ज्ञानज्योती-क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे 
विचार मोती

१. देव हा एक काल्पनीक साह्यकर्ता आहे असे बहुतेक लोक समजतात. पण हा साह्यकर्ता सत्य नसून बे भरवशाचा असून मानव व उद्योग यांत भेद पाडून त्यांच्यात शत्रृत्व उत्पन्न करून माणसास आळशी बनवितो.
२. दैव, प्रारब्ध यावर विश्वास ठेवणारे लोक आळशी व भिकारी असून त्यांचा देश नेहमीच दुसऱ्यांच्या गुलामगिरीत रहातो. याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे आपला हिंदुस्थान होय.
३. दिवसभर नं थकता उद्योग करणे हा मनुष्याचा उत्तम धर्म असून तो त्याचा कल्याण करणारा मित्र होय.
४. आळस दरिद्रिपणाचे लक्षण आहे. ज्ञान, धन आणि मान यांचा तो वैरी असून आळशी मनुष्यास या तिन्ही गोष्टी मिळत नाहीत तर येवडी हानी होत असून त्यास मनुष्यत्वही कंटाळून सोडून जाते.
५. गुन्हेगारास दया दाखवणे हे गुन्हेगाराच्या दुष्ट कार्यात भाग घेणे असे होईल.
६. दया, दान-धर्म करण्याचा ज्यांना छंद आहे अशा लोकांनी आपल्या क्रियेचा काय परिणाम होईल याचा विचार करून ती कृत्ये केली पाहिजेत. सतकृत्यापासूनसुद्धा समाजावर वाईट परिणाम घडण्याचा संभव असतो.
७. आळस, परावलंबन वगैरे दूरगूण नं वाढण्यास व मनुष्याच्या अंगचे सद्गूण वाढण्यास उपयुक्त असा कोणता धर्म असेल तर विद्यादान. विद्या देणारा व विद्या घेणारा असे दोघेही या धर्माच्या योगाने खरीखुरी माणसे बनतात. या धर्माच्या शक्तीमुळे मनुष्यातील पषुत्वाचा लोप होतो. विद्या देणारा धैर्यशाली निर्भय बनून विद्या घेणारा सामर्थ्यशाली शहाणा बनतो.
८. पैसा, धर्म करण्यास दात्याला गोड लागावे पण ते घेत्याला रुचू नये अशी समजूत झाली म्हणजे, दान, धर्म, दया, उपकार इत्यादी गुणांपासून समाजावर दुष्ट परिणाम उत्पन्न न होता कल्याणकारी कायदा होईल.
९. सदाचरण हे मनुष्यास अधीक सुख प्राप्त करून घेण्याचे व्रत आहे. ह्या व्रताने सर्व संसार दुःखांचा नाश होतो.
१०. मनुष्याने सर्वकाळ काहीतरी परोपकार सतकार्य करण्याचा उद्देश मनात धरून ते चिकाटिने तडीस जाण्याची काळजी घेतली पाहिजे.
११. जे माता-पिता आपल्या पुत्रास किंवा कन्येस शिकवीत नाहीत ते आपल्या पुत्राचे व कन्येचे शत्रू आहेत असे समजावे. विद्या नसणे हे नाशाचे व अनर्थाचे मूळ आहे. विद्या नसल्याने सत्यासत्य ओळखता येत नाही.
१२. लाच कोणी देऊ नये व लाच कोणी घेऊ नये. सरकारी काम इमानाने व प्रामाणिकपणाने केले असता समाधानाचा अलभ्य लाभ प्राप्त होतो.
१३. व्यसन हे मनुष्यास अधीक दुःखे प्राप्त करून देण्याचे दुषकृत्य आहे. कोणत्याही व्यसनाने संसार सुखाचा घात होतो. व्यसनापासून मनुष्याची बुद्धी भ्रष्ट होते व माणुसकीही नष्ट होते.
१४. दारूबाज, जुवेबाज व रंडिबाज ही मनुष्ये माणुसकिला लाथाडून लावतात. ती दूराचारी बनतात. या तीन बाजीपासून मनुष्य दूर राहील तर त्याचे कल्याण होऊन तो समाधानी पावेल.
१५. ऋण काढून सण साजरा या म्हणीत वेडेपणाचा अर्थ भरलेला आहे. कर्ज काढणे हे अनर्थाचे मूळ असून ते सर्वस्वाचे दिवाळे काढते.
साभार, (मातोश्री सावित्रीबाईंची भाषणे)

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

1000 "OPPOSITE" Words in English