सर्व पालकांना विनंती की....

*सर्व पालकांना विनंती की आपल्या मुलांना शाळेत विद्यार्थी म्हणूनच पाठवा. काही मुद्दे खालीलप्रमाणे असावेत.* 

*1)* त्याच्या केसांची ठेवण व्यवस्थित असावी. साधी ठेवन असावी. उगीचच वेगवेगळे कट मारू नका. 
*2)* पायातील बूट जास्त किमतीचे नसावेत. साधे असावेत. 
*3)* शालेय गणवेश व्यतिरिक्त इतर ड्रेस वर जास्त खर्च करू नका 
*4)* वह्या आणि पुस्तके योग्य तेवढीच घ्या.... 
*5)* दादाचा मुलगा भाऊचा मुलगा या उपाध्या घरीच ठेवून फक्त विद्यार्थी म्हणूनच शाळेत पाठवून द्या.
*6)* अँड्रॉइड मोबाईल पासून मुलांना दुर ठेवा..... 
*7)* मुलांचे चुकीचे लाड आणि हट्ट पुरवू नका..... 
*8)* तुमची क्षमता असली तरी आपल्याकडे काहीतरी कमी आहे उणीव आहे हे त्याच्या लक्षात येऊ द्या...... 
*9)* पैशाचे महत्त्व त्याला कळू द्या.... 
*10)* शाळेत पाठवताना त्याच्याकडे एकही रूपया देऊ नका ..... 
*11)* आपल्या मुलांना शिक्षीत बनवण्यापेक्षा सुशिक्षित बनवण्यासाठी शिक्षकांना सहकार्य करा.... 
*12)* 24 तासांपैकी कमीत कमी एक तास मुलांसोबत बसून अभ्यास घ्या.... 
*13)* आपली मुलं विकृत विचारसरणीच्या सहवासात जात असतील तर त्यांना वेळीच त्या सहवासातून बाजूला घ्या... जास्तीत जास्त तुमच्या सहवासात ठेवा..... 
*14)* महीन्यातून कमीत कमी दोन वेळा शिक्षकांना भेटायला नक्की जा.... 
*15)* तुमच्या सहकार्याशिवाय शिक्षक मुलांमध्ये बदल घडवूच शकत नाहीत... 
*16)* मुलांना एकदा शाळेत पाठवले की आपली जबाबदारी संपली असे समजू नका... 
*17)* आपल्या मुलांचा शिक्षक योग्य संस्कार आणि शिक्षण देतो की नाही ते तपासून पाहत जा आणि नसेल तर ते शिक्षकांच्या लक्षात आणून द्या...
*18)* शिक्षकांचा मान सन्मान करायला आपल्या पाल्यांला सांगा आणि ते कृतीतून दाखवून द्या..
 *चला तर मग आपण आपल्या देशाचे एक चांगले दक्ष व सुसंस्कृत नागरिक होवू या.....*
 आणि वरील सुचना पाळू या....
🌈 *स्कूल चले हम.................*
--------------📚🖥️📚-------------

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

जालना नवोदय कट ऑफ लिस्ट 2025

इतिहासात पहिल्यांदाच नवोदय परीक्षामधील मुलांचे मार्क कळत आहेत. बघा यावर्षी चे मार्क्स