7 ऑगस्ट

*📚परीपाठ🌹*
*
*❂ दिनांक:~ 07 ऑगस्ट  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🖋 सुविचार 🖋*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्कीच खुप पुढे जाणार आहात.... कारण " धनुष्याचा " बाण लांब जाण्यासाठी आधी मागेच खेचावा लागतो....* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *⚜म्हणी व अर्थ ⚜*

*🐂अगं अगं म्हशी, मला कोठे नेशी*

*🔱अर्थ:-*
*स्वताची चुक मान्य करन्याऐवजी दुसऱ्याला दोष देने.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
             *📆 दिनविशेष 📆*   
 
*🌞या वर्षातील🌞 २१९ वा (लीप वर्षातील २२० वा) दिवस आहे.*

    *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*

*👉२००० : ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत नऊ वर्षाखालील गटात भारताच्या संकल्प मोदवलने संयुक्त विजेतेपद मिळवले.*
*👉१९९७ : चित्रपट निर्माते गौतम घोष यांना इटालियन दिग्दर्शक सिका यांच्या नावाने दिला जाणारा ’व्हिट्टोरिओ डी सिका’ हा सन्मान जाहीर*
*👉१९९१ : जमिनीवरुन हवेत मारा करणार्‍या ’पृथ्वी’ या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोटा येथे तिसर्‍यांदा यशस्वी चाचणी*

    *🌹जन्मदिवस / जयंती🌹*

*👉१९२५ : डॉ. मनकोम्बू साम्बसिवन तथा एम. एस. स्वामीनाथन – भारतीय शेतीतज्ञ, हरितक्रांतीचे जनक आणि केन्द्रीय कृषी मंत्री, हरित क्रांतीद्वारे भारताला अन्नधान्यात स्वयंपूर्ण बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.*
*👉१९१२ : केशवराव कृष्णराव दाते – हृदयरोगतज्ञ*
*👉१८७६ : माता हारी – पहिल्या महायुद्धात गाजलेली डच नर्तिका, सौंदर्यवती व गुप्तहेर*

      *🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*

*👉१९७४ : अंजनीबाई मालपेकर – भेंडीबाजार घराण्याच्या शास्त्रीय गायिका*
*👉१९४१ : रविंद्रनाथ टागोर- कवी, लेखक, कलावंत, तत्त्वचिंतक आणि शिक्षणतज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते भारतीय लेखक. ’जन गण मन ...’ हे भारताचे राष्ट्रगीत त्यांनी लिहिले आहे.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉देशाचे राष्ट्रपिता म्हणून कोणाला ओळखले जाते?*
*🥇महात्मा गांधी*

*👉ययाती या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?*
*🥇वि.स.खांडेकर*

*👉फुटबॉल या खेळातिल एका टीमची संख्या किती असते?*
*🥇11*

*👉पहिल्या महिला I P S अधिकारी कोण होत्या?*
*🥇किरण बेदी*

*👉ओरिसा या राज्याची भाषा कोनती आहे?*
*🥇उड़िया* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*
     
    *⚛️साधू आणि यक्ष⚛️*

*एक साधू तपश्‍चर्येस एका निर्जन स्‍थळी बसले होते. त्‍या ठिकाणी एका यक्षाचे वास्‍तव्‍य होते. या गोष्‍टीची साधूला कल्‍पना नव्‍हती. ते जेव्‍हा तेथे पोहोचले तेव्‍हा निर्जन स्‍थान पाहून त्‍यांनी तेथेच ध्‍यानधारणा सुरु केली. त्‍या वेळी यक्ष तेथे नव्‍हता. रात्री जेव्‍हा यक्ष तेथे आला तेव्‍हा आपल्‍या जागेवर दुस-यास व्‍यक्तीला पाहून त्‍याला राग आला. त्‍याने मोठ्याने आरडाओरड सुरु केली, पण समाधी अवस्‍थेत असलेल्‍या साधूवर त्‍याचा काहीच परिणाम झाला नाही. यक्षाने मग हत्तीचे रूप घेऊन त्‍यांना भीती दाखविण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु ते ध्‍यानस्‍थ असल्‍याने त्‍यांच्‍यावर याचा काहीच परिणाम झाला नाही.*

                *मग यक्षाने वेगवेगळी रूपे घेऊन साधूला घाबरविण्‍याचा प्रयत्‍न केला. कधी तो वाघ, सिंह, तरस, कोल्‍हा अशा जंगली प्राण्‍यांची रूपे घेतली तरी साधूच्‍या ध्‍यानात काहीच खंड पडेना. शेवटी त्‍याने विषारी सापाचे रूप धारण करून त्‍यांना दंश केला तरीही त्‍यांच्‍यावर याचा काहीच परिणाम दिसेना. इतक्‍या प्रयत्‍नानंतरही साधूवर कोणताही परिणाम न झाल्‍याने यक्ष झालेल्‍या श्रमाने थकून सर्परूपातच विश्रांती घेऊ लागला. थोड्याच वेळात साधूंची समाधी अवस्‍था पूर्ण झाली व ते जागे झाले व त्‍यांची नजर सर्परूपी यक्षावर पडली. त्‍या नजरेत इतके प्रेमभाव भरलेले होते की त्‍या कृपादृष्‍टीने सापाच्‍या अंगातील विष अमृत बनले. यक्ष साधूंना शरण गेला व त्‍याने त्‍यांना आदरपूर्वक वंदन केले.*

*✅तात्‍पर्य –*
*एकाग्रता, स्‍नेह आणि प्रेमभावनेने कोणावरही विजय प्राप्त करता येतो.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

1000 "OPPOSITE" Words in English