6 ऑगस्ट
*📚परीपाठ🌹*
*❂ दिनांक:~ 06 ऑगस्ट ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🖋 सुविचार 🖋*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*⏰घड्याळाच्या गजरापेक्षा ज्यांना जबाबदारी जागं करते ती लोक आयुष्यात योग्य दिशेने पावल टाकतात....* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*⚜म्हणी व अर्थ ⚜*
*👵ताकापुरती आजीबाई.*
*🔱अर्थ:-*
*आपले काम होईपर्यन्त एखाद्याशी गोड बोलणे.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📆 दिनविशेष 📆*
*💥अणुबॉम्ब निषेध दिन:हिरोशिमा दिन*
*🌞या वर्षातील🌞 २१८ वा (लीप वर्षातील २१९ वा) दिवस आहे.*
*🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*
*👉१९९७ : कोलंबो येथे भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने ६ बाद ९५२ अशी विक्रमी धावसंख्या उभारली. त्यात सनत जयसूर्या याने ३४० धावा केल्या.*
*👉१९४५ : अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा या शहरावर अणूबॉम्ब टाकला. यात ७०,००० जण तात्काळ मृत्यूमुखी पडले तर पुढील अनेक वर्षे लोकांवर किरणोत्सर्गाचा परिणाम झाला.*
*👉१९२६ : जेरट्रूड एडर्ले ही इंग्लिश खाडी पोहुन जाणारी पहिली महिला बनली.*
*🌹जन्मदिवस / जयंती🌹*
*👉१९७० : एम. नाईट श्यामलन – भारतीय वंशाचे अमेरिकन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक*
*👉१९२५ : योगिनी जोगळेकर – लेखिका, ४५ कादंबर्या, ४ कवितासंग्रह, ४ नाटके, १२ कुमार वाङ्मयाची पुस्तके इ. त्यांची साहित्य संपदा आहे.*
*👉१८८१ : अलेक्झांडर फ्लेमिंग – नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ*
*🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*
*👉१९९९ : कल्पनाथ राय – केन्द्रीय मंत्री, राज्यसभा खासदार (३ वेळा), लोकसभा खासदार (४ वेळा),*
*👉१९६५ : वसंत पवार – संगीतकार*
*👉१९२५ : सुरेंद्रनाथ बॅनर्जी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि त्यातील जहाल गटाचे नेते, ’राष्ट्रगुरू’ (जन्म: १० नोव्हेबर १८४८)* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉भारतातुन सर्वात शेवटी निघुन जानारे परकीय कोण होते?*
*🥇पोर्तुगीज*
*👉महाराष्ट्राचे मॅचेस्टर कोणत्या शहरास म्हणतात?*
*🥇इचलकरंजी*
*👉लीप वर्ष दर किती वर्षांनी येते?*
*🥇४ वर्षांनी*
*👉हिवाळ्यात येणाऱ्या पिकांना कोनती पिके म्हणतात?*
*🥇रब्बी हंगामी पिके*
*👉ऑगस्ट क्रांती दिवस केंव्हा साजरा केला जातो?*
*🥇९ ऑगस्ट* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*💡जीवनाचे रहस्य*
*एक माणूस जीवनाला कंटाळला होता. त्याला असे वाटत होते की, इतक्या मोठया जगात आपण एकाकी आहोत. त्याला कोणी जवळ करत नाही, तो कोणाच्या प्रेमास पात्र नाही, असा विचार करून दु:खी राहायचा. वसंत ऋतु आला आणि चहूकडे सुगंधी फुले उमलल्याने सुवासाचा दरवळ पसरला होता. सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असताना त्या व्यक्तिने स्वत:ला घरात कोंडून घेतले होते. अचानक एक छोटी मुलगी दरवाजा उघडून घरात आली व म्हणाली,'' तुम्ही उदास आहात असे दिसते. याचे कारण काय?'' तो म्हणाला,'' माझ्यावर कोणी प्रेम करत नाही.'' ती मुलगी म्हणाली,'' तुम्ही कोणावर प्रेम करता?'' त्याच्याकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते. तेव्हा ती मुलगी त्याला म्हणाली,'' बाहेर येऊन पहा! तुमच्या दारासमोरच प्रेमाचा किती दरवळ आहे.'' तिने त्याचा हात धरून बाहेर पसरलेल्या फुलांच्या ताटव्यात उभे केले. तुम्ही ज्या फुलांवर जितके प्रेम कराल तितके करा! ते तितकेच प्रेम तुम्हाला देतील.'' त्या मुलीच्या बोलण्याने त्याचा भ्रम दूर झाला आणि त्याचे जीवन आनंदी झाले.*
*✅तात्पर्य:-*
*जीवनाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन बदलला की जीवन आनंदी होण्यास मदत होते.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment