5 ऑगस्ट

*📚परीपाठ🌹*

*❂ दिनांक:~ ०५ ऑगास्ट  ❂*
        ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🖋 सुविचार 🖋*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*आनंदी राहण्यासाठी पैशाने*              
   *कमवलेल्या वस्तुंपेक्षा*
*स्वभावाने कमवलेली माणसं*
       *जास्त सुख देतात* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *⚜म्हणी व अर्थ ⚜*

*👥ढ़वळ्या शेजारी पवळ्या बांधला,वाण नाही पण गुण लागला.*

*🔱अर्थ:-*
*वाईट माणसाच्या संगतीने चांगला मनुष्यही बिघडतो.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
             *📆 दिनविशेष 📆*    


*🌞या वर्षातील🌞 २१७ वा (लीप वर्षातील २१८ वा) दिवस आहे.*


    *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*


*👉१८६१: अमेरिकन सैन्यातील चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा बंद करण्यात आली.*
*👉१९६२: नेल्सन मंडेला यांना तुरुंगात टाकण्यात आले. यानंतर १९९० मधे त्यांची सुटका झाली.*
*👉१९६५: पाकिस्तानी सैन्याने साध्या वेषात घुसखोरी केल्यामुळे भारत पाकिस्तान युद्धाला सुरूवात झाली.*
*👉१९९७: रशियाच्या दोन अंतराळवीरांना घेऊन सोयूझ-यू हे अंतराळयान मीर अंतराळस्थानकाकडे रवाना.*

    *🌹जन्मदिवस / जयंती🌹*

*👉१९३०: चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव नील आर्मस्ट्राँग यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट २०१२)*
*👉१९३३: लेखिका व समीक्षिका विजया राजाध्यक्ष यांचा जन्म.*
*👉१९६९: जलदगती गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांचा जन्म.*
*👉१९८७: भारतीय अभिनेत्री जेनेलिया डिसोझा यांचा जन्म.*

      *🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*

*👉८८२: फ्रान्सचा राजा लुई (तिसरा) यांचे निधन.*
*👉१९६२: अमेरिकन अभिनेत्री मेरिलीन मन्‍रो यांनी गोळी मारून आत्महत्या केली. (जन्म: १ जून १९२६)*
*👉२००१: गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार विजेत्या गायिका आणि अभिनेत्री ज्योत्स्‍ना भोळे यांचे निधन. (जन्म: ११ मे १९१४)* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉लाल, बाल, पाल या टोपन नावाने भारतातील कोणत्या नेत्यांना ओळखले जाते?*
*🥇लाला लजपतराय, गंगाधर टिळक व बिपीनचंद्र पाल.*

*👉बंगळुर हे शहर कोणत्या राज्यात आहे?*
*🥇कर्नाटक*

*👉भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोणत्या?*
*🥇श्रीमती प्रतिभाताई पाटील*

*👉क्रिकेट विश्वात मास्तर ब्लास्टर म्हणून कोणाला ओळखतात?*
*🥇सचिन तेंडुलकर*

*👉इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?*
*🥇नवी दिल्ली* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*
     
*🤦‍♂उंटावरचा शहाणा*

*एका सावकाराच्या वाड्यात खूप मोठा जनावरांचा गोठा होता. गाई, म्हशी, वासरं तेथे सदैव बांधलेली असत. यातील एका वासराला अतिशय तहान लागली होती. कोणी पाणी पाजायला येईल म्हणून बराच वेळ वाट पाहिली. पाण्याशिवाय त्याचा जीव अगदी कासावीस झाला. शेवटी आसपास कुठे पाणी मिळते कौ हे पाहाण्यासाठी त्याने ओढाताण करून आपल्या गळ्याला बांधलेली दोरी तोडली आणि गोठ्यात इकडेतिकडे ते पाण्याच्या शोधासाठी हिंडू लागले. एका भिंतीजवळ एक लहानसे मडके होते. त्याच्या तळाला थोडेसे पाणी त्या वासराला दिसले. तहानलेल्या वासराने मागचा पुढचा विचार न करता पाणी पिण्यासाठी त्या मडक्यात तोंड घातले आणि लहानशा त्या मडक्यात त्याचे डोकेअडकले काही केल्या डोके बाहेर काढता येईना. तेव्हा सावकाराच्या माणुसांनी एका व्यक्तीला सल्ला देण्यासाठी बोलावून आणले. तो उंटावर बसून आला आणि ‘वासराचे डोके कसे काढायचे हे पाहाण्यासाठी वासराजवळ जावे लागेल. पण मी उंटावरून तेथे जाईन. त्यासाठी घराची भिंत पाडावी लागेल. मग सावकाराच्या नोकराने भिंत पाडून त्याची आत जाण्याची सोय केली. त्यानंतर हाउटावरचा शहाणा गोठ्यात वासराजवळ गेला. वासरू डोके काढण्यासाठी खूप धडपड करत होते. ते पाहून उंटावरचा शहाणा माणूस म्हणाला, आधी वासराची मान कापा म्हणजे मडक्यात त्याचे डोके सुरक्षित राहिल आणि त्यानंतर मडके फोडा म्हणजे कापलेले असले तरी डोके शाबूत राहिल. बघा कसा चुटकीसरशी प्रश्न सोडवला ते.*

*✅तात्पर्य :-*
 *उंटावरच्या शहाण्यांकडून म्हणजे मूर्ख माणसाकडून असेच सल्ले मिळतात.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

1000 "OPPOSITE" Words in English