4 सप्टेंबर

*📚परीपाठ🌹*

*❂ दिनांक:~ 04 सप्टें  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🖋 सुविचार 🖋*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

    _*💡" दुखा:चा विचार करत बसलं की समोर उभं असलेलं सुख पण डोळ्यांना दिसत नाही...!!! "*_ ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *⚜म्हणी व अर्थ ⚜*

*👹निंदकाचे घर असावे शेजारी.*

*🔱अर्थ:-*
*आपल्यातला दोष दाखविनारा व्यक्ती आपल्यासोबत असल्यास आपल्याला दोष कमी करण्यात संधी मिळते.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
             *📆 दिनविशेष 📆*    


*🌞या वर्षातील🌞 २४७ वा (लीप वर्षातील २४८ वा) दिवस आहे.*

    *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*

*👉१८८२: थॉमस एडिसन यांनी इतिहासातील पहिल्या व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प चालु केले वीजयुगाची सुरुवात म्हणून हा दिवस ओळखला जातो.*

*👉१९३७: प्रभातच्या संत तुकाराम या चित्रपटाची जगातल्या तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून निवड झाली.*

*👉१९७२: मार्क स्पिटझ हा एकाच ऑलिम्पक स्पर्धेत ७ सुवर्णपदके मिळवणारा पहिला खेळाडू बनला.*

*👉१९९८: स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेइ ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी गुगलची स्थापना केली.*

*👉२००१: हेवलेट पॅकर्ड या कंपनीने संगणक क्षेत्रातील कॉम्पॅक कॉर्पोरेशन ही बलाढ्य कंपनी २५ अब्ज डॉलर्सला विकत घेतली.*

    *🌹जन्मदिवस / जयंती🌹*

*👉१२२१: महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचा जन्म. (मृत्यू: ७ फेब्रुवारी १२७४)*

*👉१८२५: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय पितामह दादाभाई नौरोजी यांचा जन्म. (मृत्यू: ३० जून १९१७)*

*👉१९०१: जॅग्वोर कार चे सहसंस्थापक विल्यम लियन्स जॅग्वोर यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९८५)*

*👉१९४१: केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा जन्म.*

*👉१९५२: अभिनेता ऋषी कपूर यांचा जन्म.*

*👉१९६२: यष्टीरक्षक किरण मोरे यांचा जन्म*

      *🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*

*👉१९९७: हिन्दी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार व धर्मयुग साप्ताहिकाचे २७ वर्षे संपादक डॉ. धर्मवीर भारती याचं निधन. (जन्म: २५ डिसेंबर १९२६)*

*👉२०००: खळाळून हसवणारे विनोदी कलाकार मोहम्मद उमर मुक्री याचं निधन. (जन्म: ५ जानेवारी १९२२)*

*👉२०१२: भारतीय लेखक सय्यद मुस्तफा सिराज यांचे निधन. (जन्म: १३ ऑक्टोबर १९३०)*

*👉२०१२: भारतीय गायक-गीतकार हांक सूफी यांचे निधन. (जन्म: ३ मार्च १९५२)*

*👉२०१५: भारतीय सर्जन आणि राजकारणी विल्फ्रेड डी डिसोझा यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १९२७)* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉भारतातील सर्वात जास्त जिल्ह्यांचे राज्य कोणते?*
*🥇उत्तर प्रदेश*

*👉आंतरराष्ट्रीय डमडम विमानतळ कोठे आहे?*
*🥇कलकत्ता*

*👉भगवान शंकराच्या एकूण ज्योतिर्लिंगांची संख्या किती आहे?*
*🥇बारा ज्योतिर्लिंग*

*👉मिसाइल मॅन म्हणून भारतातील कोणत्या व्यक्तीचा गौरव केला जातो?*
*🥇डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम सर*

*👉दूध नासणे ही कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे?*
*🥇जीवरासायनिक* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*
     

    *🦊कोल्ह्याची हालत*

*एका कोल्ह्याचे शेपूट लोखंडी सापळ्यात सापडले असता ते तोडून तो पळाला. प्रथम त्याला आनंद झाला की प्राणांवरचे शेपटीवर निभावले. पण जेव्हा तो आपल्या मंडळीत जाऊ लागला, तेव्हा त्याला आपल्या लांडेपणाचे फार वाईट वाटून तो मनात म्हणाला, 'मी मेलो असतो तर बरं झालं असतं. पण ही अप्रतिष्ठा वाईट, पण जे झाले त्याला उपाय नाही. आता हेच कसं शोभवून नेलं म्हणजे झालं ! यासाठी काय बरं युक्ती करावी ?' याचा तो विचार करीत असता त्याला एक युक्ती सुचली ती अशी की आपण सर्व कोल्हे मंडळींना एकत्र जमवून सांगावे की, 'माझी शेपटी मी तोडून टाकून ही भूषणाची नवी पद्धत काढली आहे. ही चांगली आहे अन् तुम्हीसुद्धा अवश्य करावं.' मग त्याने सगळ्या कोल्ह्यांना आपल्या घरी बोलावले व आपल्या युक्तीप्रमाणे त्यांच्यापुढे भाषण दिले. तो म्हणाला, 'अहो, या शेपटीपासून काहीच फायदा नाही. आपल्याला शेपटी म्हणजे ओझंच. शेपटी तोडून टाकल्यानं एक प्रकारचं सौंदर्य येऊन शिवाय पळण्यातली अडचण दूर होते. मी ह्या गोष्टीचा अनुभव घेतला आहे नि शेपटी तोडल्यापासून सुखी आहे. हे सुख तुम्हाला प्राप्त व्हावं असं मला वाटलं.' इतके बोलून आपले कितीजण ऐकतात हे पाहण्यासाठी तो सगळ्यांकडे पाहू लागला. इतक्यात एक म्हातारा कोल्हा त्याची लबाडी ओळखून मान वाकडी करून म्हणाला, 'अहो, पंडित महाराज, आपली हुषारी पुरे. शेपटी काढल्यामुळे तुमचं कल्याण झालं असेल, यात शंका नाही. अन् आमच्यावर जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्हीही आपली शेपटी कापून टाकू. तोपर्यंत तुम्ही आम्हाला आग्रह करू नये हेच बरं.'*

*✅तात्पर्य:-*
*आपली अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आपले दोष हे नसून गुण आहेत असे बरेचजण सांगतात पण शहाणे लोक त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीत.* ‍ ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

1000 "OPPOSITE" Words in English