3 सप्टेंबर
*📚परीपाठ🌹*
*❂ दिनांक:~ 03 सप्टे ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🖋 सुविचार 🖋*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*💡प्रामाणिकपणाने वागण्याने यश मिळत नाही असे म्हणतात. पण प्रामाणिक राहणे हेच मोठे यश आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*⚜म्हणी व अर्थ ⚜*
*🏠घर ना दार देवळी बिरहाड.*
*🔱अर्थ:-*
*बायकोपोरे नसनारा एक पुरुष किंवा शिरावर कोणतीही जवाबदारी नसलेला व्यक्ती.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📆 दिनविशेष 📆*
*🌞या वर्षातील🌞 २४६ वा (लीप वर्षातील २४७ वा) दिवस आहे.*
*🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*
*👉३०१: जगातील सर्वात जुने प्रजासत्ताक राष्ट्र सॅन मरीनो स्थापित झाले.*
*👉१७५२: अमेरिकेत ग्रेगरियन कॅलेंडरचा वापर सुरू झाला.*
*👉१९१६: श्रीमती अॅनी बेझंट यांनी होमरुल लीगची स्थापना केली.*
*👉१९३५: सर मॅल्कम कॅम्पबेल ताशी ३०० मैल पेक्षा जास्त जोरात ऑटोमोबाईल चालवणारे पहिले व्यक्ति झाले.*
*👉१९७१: कतारला स्वातंत्र्य मिळाले.*
*🌹जन्मदिवस / जयंती🌹*
*👉१८५५: आध्यात्मिक गुरू पंत महाराज बाळेकुंद्री यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर १९०५)*
*👉१८६९: सेंद्रिय पदार्थांच्या पृथक्करणासाठी रसायनशास्त्राचा नोबेल पारितोषिक मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ फ्रिट्झ प्रेग्ल यांचा जन्म. (मृत्यू: १३ डिसेंबर १९३०)*
*👉१९२३: महाराष्ट्र शाहीर कृष्णराव तथा शाहीर साबळे यांचा जन्म.*
*👉१९३८: नोबेल पारितोषिक विजेते जपानी रसायनशास्त्रज्ञ रायोजी नोयोरी यांचा जन्म.*
*👉१९४०: लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार प्यारेलाल शर्मा यांचा जन्म.*
*👉१९५६: भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक जिझु दासगुप्ता यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर २०१२)*
*👉१९७६: चित्रपट अभिनेता विवेक ओबेरॉय यांचा जन्म.*
*🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*
*👉१६५८: इंग्लंडचा राज्यकर्ता ऑलिव्हर क्रॉमवेल यांचे निधन.*
*👉१९४८: चेकोस्लोव्हेकियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष एडवर्ड बेनेस यांचे निधन.*
*👉१९५३: तबला, घुमट व सारंगीवादक लक्ष्मण तथा खाप्रुमामा पर्वतकर यांचे निधन.*
*👉१९५८: निसर्गकवी माधव केशव काटदरे यांचे निधन. (जन्म: ३ डिसेंबर १८९२)*
*👉१९६७: वार्ताहर, संपादक अनंत हरी गद्रे तथा समतानंद यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १८९०)*
*👉२०००: स्वातंत्र्यसैनिक, गोवा विधानसभेचे पहिले सभापती पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर यांचे निधन.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉पेनाल्टी कॉर्नर हा शब्द कोणत्या खेळाशी संबधित आहे?*
*🥇हॉकी, फुटबॉल*
*👉वेरुळ हे प्रसिद्ध क्षेत्र कोणत्या जिल्ह्यातील आहे?*
*🥇औरंगाबाद*
*👉पाणी उकळले असता त्यात विरघळलेला कोणता वायु निघुन जातो?*
*🥇ऑक्सीजन*
*👉विश्वचषक क्रिकेट 2019 स्पर्धेमधिल उपविजेता संघ कोणता होता?*
*🥇न्यूझीलैण्ड*
*👉'झूमर' हा कोणत्या राज्यातील नृत्यप्रकार आहे?*
*🥇राजस्थान* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*🌱लहान झाड व मोठे झाड🌳*
*नदीच्या काठी मोठे झाड होते ते सोसाट्याचा वारा आला असता पडले व नदीतील पाण्याबरोबर वहात चालले. वाटेत नदीकाठी उभे असलेले एक लहान झाड त्याला दिसले. तेव्हा त्याने त्या लहान झाडाला विचारले, 'अरे, या वार्याने माझ्यासारखं मोठं झाड पाडलं, त्या वार्याच्या सपाट्यातून तू कसा काय वाचलास ?' त्यावर लहान झाडाने उत्तर दिलं, 'अरे मित्रा, तुझ्या नि माझ्या वागण्यात बराच फरक आहे, तेच त्याचं कारण होय. बलवानांपुढे आपलं चालणार नाही हे लक्षात घेऊन मी वार्यापुढे नम्र होतो पण आपल्या शक्तीच्या गर्वामुळे तू ताठ उभा राहतोस.'*
*✅तात्पर्य :-*
*समर्थापुढे दुर्बलाने नम्रपणे वागावे, तसे न करता जे उद्दामपणे वागतात ते बर्याच वेळा स्वतःचा नाश करून घेतात.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment