2 सप्टेंबर
*📚परीपाठ🌹*
*❂ दिनांक:~ 2 सप्टेंबर ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🖋 सुविचार 🖋*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*💡ज्यांचा वर्तमान काळ प्रयत्नवादी असेल,*
*त्यांचा भविष्य काळ नक्कीच उज्वल असेल.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*⚜म्हणी व अर्थ ⚜*
*⛰️डोंगर पोखरुन उंदीर काढणे.*
*🔱अर्थ:-*
*खुप मेहनत करुण छोटेसे यश मिळणे.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📆 दिनविशेष 📆*
*🌞या वर्षातील🌞 २४५ वा (लीप वर्षातील २४६ वा) दिवस आहे.*
*🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*
*👉१९१६: पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.*
*👉१९२०: म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.*
*👉१९३९: दुसरे महायुद्ध – जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.*
*👉१९४६: भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.*
*👉१९६०: केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.*
*👉१९९९: भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली.*
*🌹जन्मदिवस / जयंती🌹*
*👉१८८६: साहित्यिक, विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्न करणारे कृतिशील समाजसुधारक प्रा. श्रीपाद महादेव माटे तथा श्री. म. माटे यांचा जन्म. (मृत्यू: २५ डिसेंबर १९५७)*
*👉१९३२: स्नॅपल चे संस्थापक अर्नोल्ड ग्रीनबर्ग यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑक्टोबर २०१२)*
*👉१९४१: चित्रपट अभिनेत्री साधना शिवदासानी ऊर्फ साधना यांचा जन्म.*
*👉१९६५: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक पार्थो सेन गुप्ता यांचा जन्म.*
*👉१९८८: भारतीय क्रिकेट खेळाडू इशांत शर्मा यांचा जन्म.*
*🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*
*👉१९६०: वनस्पतीतज्ञ, विज्ञान वर्धिनी महाराष्ट्र या संस्थेचे संचालक डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर यांचे निधन.*
*👉१९६९: व्हिएतनामचे राष्ट्रपती हो ची मिन्ह यांचे निधन. (जन्म: १९ मे १८९०)*
*👉१९७६: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कादंबरीकार वि. स. खांडेकर यांचे निधन. (जन्म: १९ जानेवारी १८९८)*
*👉१९९०: मराठवाड्याचा चालताबोलता इतिहास अशी ओळख असणारे लेखक न. शे. पोहनेरकर यांचे निधन. (जन्म: ३ ऑक्टोबर १९०७)*
*👉१९९९: चित्रकार व लेखक डी. डी. रेगे यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९११ – पाचल, राजापूर, रत्नागिरी)*
*👉२००९: आंध्र प्रदेशचे १४वे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे विमान अपघातात निधन. (जन्म: ८ जुलै १९४९)* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉मानवी मनाचा अभ्यास कोणत्या वैज्ञानिक शास्रात केला जातो?*
*🥇मानसशास्त्र (साइकोलॉजी)*
*👉दूरबीन या उपकरनाचा शोध कोणत्या शास्रज्ञाने लावला आहे?*
*🥇गॅलिलिओ*
*👉खेडयातिल कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करतो?*
*🥇पोलिस पाटील*
*👉कात्रजघाट हा कोणत्या जिल्ह्यात आहे?*
*🥇पुणे*
*👉महाराष्ट्र पठार हे कोणत्या खडकाचे बनलेले आहे?*
*🥇बेसाल्ट* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*🤦♂लोभी माणूस*
*एका लोभी माणसाने आपला सगळा पैसा शेतात पुरून ठेवला होता. तेथे दिवसातून दोन वेळा जाऊन त्या पुरलेल्या जागेकडे पाहून तो मोठे समाधान मानीत असे. ते त्याचे वागणे त्याच्या नोकराने पाहिले व त्याने तर्क केला की, आपला मालक या जागेकडे नेहमी पाहतो, तेव्हा तेथे काहीतरी पुरलेले असावे. रात्री त्याने तेथे जाऊन खणून पाहिले तर आत बरेच धन त्याला दिसले. ते घेऊन तो पळून गेला. दुसर्या दिवशी तो लोभी माणूस नेहमीप्रमाणे तेथे येऊन पाहतो तर सगळे धन चोरीला गेलेले त्याला दिसले. मग तो डोके बडवून घेत रडू लागला. तेव्हा त्याचा शेजारी त्याच्याजवळ येऊन रडण्याचे कारण विचारू लागला. लोभी माणसाने घडलेली हकीकत त्याला सांगितली. ते ऐकून शेजारी म्हणाला, 'अरे मला वाटतं की तसं तुझं काहीच गेलं नाही. आपला पैसा येथेच आहे, असं समजून तू पूर्वीप्रमाणेच या जागेकडे पहात जा म्हणजे झालं.*'
*✅तात्पर्य:-*
*लोभी माणसे पैसे असून दरिद्री व अशांना पैशाचा उपयोग न होता दुसरेच कोणीतरी त्याचा उपयोग करून घेतात. जवळ असलेला पैसा वापरायचा नाही तर तो चोरीला गेल्यावर शोक करण्यात काय अर्थ ?* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment