26 ऑगस्ट

*📚परीपाठ🌹*

*❂ दिनांक:~ 26 ऑगस्ट,* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🖋 सुविचार 🖋*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*💡चूक नसतांना सुध्दा निव्वळ वाद टाळण्याकरिता मागितलेली माफी जीवनातील संयमाचं एक मोठं उदाहरण ठरतं!* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *⚜म्हणी व अर्थ ⚜*

*👩‍🍼ज्याच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी.*

*🔱अर्थ:-*
*मातेकडुनच बालकाला सुसंस्कार होतात म्हणून ते भविष्यात कर्तुत्वसप ठरते.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
             *📆 दिनविशेष 📆*  

  *🌞या वर्षातील🌞 २३८ वा (लीप वर्षातील २३९ वा) दिवस आहे.*

    *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*

*👉१९९४ : लोन टेनिसपटू रमेश कृष्णन आणि मध्यम पल्ल्याचा धावपटू बहादूर प्रसाद यांना के. के. बिर्ला फांउंडेशनचा पुरस्कार जाहीर*
*👉१८८३ : डच इंडीज (सध्याचे इंडोनेशिया) बेटावरील क्राकाटाऊ ज्वालामुखीच्या उद्रेकात १३५ गावे भस्मसात होऊन सुमारे ३६,००० लोकांचा बळी गेला.*
*👉१४९८ : मायकेल अँजेलो याने ’पिएटा’या जगप्रसिद्ध शिल्पकृतीच्या कामास सुरूवात केली.*

    *🌹जन्मदिवस / जयंती🌹*

*👉१९२२ : ग. प्र. प्रधान – समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, राजकारणी, लेखक, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती.*
*👉१९१० : मदर तेरेसा – भारतरत्‍न व नोबेल पारितोषिक विजेत्या*
*👉१७४३ : एंन्टॉइन लॅव्हाझिये – फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ, आधुनिक रसायन शास्त्राचा जनक*

      *🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*

*👉२०१२ : ए. के. हनगल – चित्रपट अभिनेते व स्वातंत्र्यसैनिक*
*👉१९७४ : चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग – धाडसी अमेरिकन वैमानिक. वैमानिकी जीवनाच्या अनुभवांवरील त्यांच्या ’द स्पिरीट ऑफ सेंट लुईस’ या पुस्तकास पुलित्झर पुरस्कार मिळाला.*
*👉१९४८ : कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर – ख्यातनाम नाटककार व पत्रकार, ’केसरी’चे संपादक, ’नवाकाळ’चे संस्थापक* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉लोकहितवादी यांचे संपूर्ण नाव काय?*
*🥇गोपाळ हरी देशमुख*

*👉दासबोध हा ग्रन्थ कोणत्या संताचा आहे?*
*🥇संत रामदास*

*👉मराठी भाषेचे पाणिनी कोनास म्हणतात?*
*🥇दादोबा पांडुरंग*

*👉फळांचा राजा कोणत्या फळाला ओळखले जाते?*
*🥇आंबा*

*👉भारत देशाची राष्ट्रभाषा कोणती आहे?*
*🥇हिंदी भाषा* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*
     
 *➖रेघ लहान झाली.*

*अकबर आणि बिरबल एकदा फिरायला गेले होते. चालता चालता बादशाह अचानक थांबला. बादशहाने वाळूत बोटाने एक रेघ मारली आणि बिरबलाला विचारले. “ही रेघ पाहिलीस? ही रेघ लहान करायची, पण पुसायची नाही, जमेल तुला?”*
*बिरबलाने एकवेळ बादशहाकडे व एकवेळ रेघेकडे पाहिले.  थोडा विचार केला.* *पटकन खाली वाकला. रेघेशेजारी दुसरी लांब रेघ मारली आणि म्हणाला, “झाली की नाही महाराज तुमची रेघ लहान?” बादशाह चकित होऊन पाहतच राहिला!*

*✅तात्पर्य:-*
*शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्टच असते.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

1000 "OPPOSITE" Words in English