23 ऑगस्ट

*📚परीपाठ🌹*

*❂ दिनांक:~ 23 ऑगस्ट,* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🖋 सुविचार 🖋*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*💡कठीण परिस्थितीमध्ये*
*संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते...*
*ज्याच नाव आहे....*

*""आत्मबल-"* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *⚜म्हणी व अर्थ ⚜*

*🦊कोल्ह्याला द्राक्षे आंबट*

*🔱अर्थ:-*
*आपल्याला न मिळणाऱ्या गोष्टीला कमी लेखने.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
             *📆 दिनविशेष 📆*    

*🌞या वर्षातील🌞 २३५ वा (लीप वर्षातील २३६ वा) दिवस आहे.*

    *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*

*👉२००५ : कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान*
*👉१९६६ : ‘लूनार ऑर्बिटर-१‘ या मानवरहित अंतराळयानाने चंद्रावरून पहिल्यांदाच पृथ्वीची छायाचित्रे काढली.*
*👉१९४२ : दुसरे महायुद्ध – स्टालिनग्राडची लढाई सुरू*

    *🌹जन्मदिवस / जयंती🌹*

*👉१९७३ : मलाईका अरोरा - खान – मॉडेल व अभिनेत्री*
*👉१९४४ : सायरा बानू – चित्रफट अभिनेत्री*
*👉१९१८ : गोविंद विनायक तथा 'विंदा' करंदीकर* – *लेखक, कवी, लघुनिबंधकार व टीकाकार.* 
*(मृत्यू: १४ मार्च २०१०)*

      *🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*

*🥇१९९४ : आरती साहा – इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतणपटू*
*👉१९७५ : पं. विनायकराव पटवर्धन – नामवंत शास्त्रीय गायक, गुरू, संगीतप्रसारक व अभिनेते.*
*👉१९७४ : डॉ. शंकर दामोदर पेंडसे – मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉मराठी या व्याकरण प्रकारातील संधीचे किती प्रकार पडतात व कोनते?*
*🥇तीन प्रकार 1) स्वर संधी 2) व्यंजन संधी 3) विसर्ग संधी*

*👉भीमाशंकर हे महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे?*
*🥇पुणे जिल्हा*

*👉जागतिक एड्स प्रतिबंध दिन हा केंव्हा असतो?*
*🥇1 डिसेंबर*

*👉महाराष्ट्र राज्याची स्थापना किती साली झाली आहे?*
*🥇1 में 1960*

*👉माइक्रोमीटरने काय मोजले जाते?*
*🥇लहान (कमी) अंतर* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*
     
    *▪️वकील व सरदार▪️*

*एका राजाने आपला वकील दुसर्‍या राजाच्या दरबारी पाठविला. तो तेथे जाऊन पोहोचल्यावर तेथील राजाने नोकर-चाकर पाठवून वाजंत्री वाजवत मोठय़ा सन्मानाने शहरात नेण्यास सुरुवात केली. तो वकील कंजूष असल्याने वाजंत्री व मिरवणूक यात पैसा विनाकारण खर्च व्हावा हे त्याला पटले नाही. म्हणून तो त्यांना म्हणाला, ''अरे, माझी आई वारली, तिच्या सुतकात मी असल्यामुळे हा सगळा थाटमाट तुम्ही बंद कराल तर बरं होईल.'' ते ऐकताच लोकांनी आपली वाद्य बंद केली. पुढे ही हकीगत तेथील एका सरदाराला समजली. तेव्हा तो त्या वकीलाजवळ येऊन त्याला म्हणाला,'' वकीलसाहेब आपल्या आईच्या मृत्यूची बातमी ऐकून मला फार वाईट वाटलं, आपली आई वारली, त्याला आज किती दिवस झाले बरं?'' वकील उत्तरला, ''त्या गोष्टीला आज चांगली चाळीस वर्षे झाली असतील.''*

*✅तात्पर्य :-*
*पैसा वाचविण्यासाठी कंजूष माणूस वाटेल ती सबब सांगायला कमी करत नाही.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
        

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

1000 "OPPOSITE" Words in English