20 ऑगस्ट
*📚परिपाठ🌹*
*
*❂ दिनांक:~ 20 ऑगस्ट ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🖋 सुविचार 🖋*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*💡माणसाने विझलेले दिवेही पहायचे नसतात*
*आणि आजूबाजूची रोषणाईही पहायची नसते...*
*ज्याला चालायचं असतं त्यानं फक्त आपल्या* *ओंजळीतला दिवा* *जपायचा असतो आणि अविरत* *चालायचं असतं ध्येय गवसेपर्यंत.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*⚜म्हणी व अर्थ ⚜*
*🐶कूत्र्याचे शेपुट नळीत घातले तरी वाकडेच.*
*🔱अर्थ:-*
*मुळचा स्वभाव कधीच न बदलने.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📆 दिनविशेष 📆*
*💡अक्षय ऊर्जा दिवस*
*🌞या वर्षातील🌞 २३२ वा (लीप वर्षातील २३३ वा) दिवस आहे.*
*👥लोकशाही दिन👥*
*🙏सद्भावना दिन*
*🦟जागतिक डास दिन*
*🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*
*👉२००८ : भारताचा कुस्तीगीर सुशीलकुमार याला बिंजिंग ऑलिंपिकमध्ये ब्राँझ पदक मिळाले.*
*👉१८९७ : सर रोनाल्ड रॉस यांनी (भारतात) हिवतापाच्या जीवाणूचा शोध लावला. त्यांना १९०२ मध्ये नोबेल पुरस्कार देण्यात आला.*
*👉१८२८ : राजा राम मोहन रॉय यांनी तीन मित्रांच्या साहाय्याने कोलकाता यथे ब्राम्हो सभेची स्थापना केली. या सभेलाच पुढे ’ब्राम्हो समाज’ म्हणू लागले.*
*🌹जन्मदिवस / जयंती🌹*
*👉१९४६ : एन. आर. नारायण मूर्ती – ’इन्फोसिस’चे सहसंस्थापक*
*👉१९४४ : "राजीव गांधी -भारताचे ६ वे पंतप्रधान, भारतरत्न (१९९१) मरणोत्तर (मृत्यू: २१ मे १९९१)*
*🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*
*👉२०१३ : डॉ. नरेन्द्र दाभोळकर -- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, थोर समाजवादी विचारवंत व साधना साप्ताहिकाचे संपादक यांची पुणे येथे गोळ्या घालुन हत्या*
*👉१९८८ : माधवराव शिंदे – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व संकलक. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला.*
*👉१९८४ : रघुवीर भोपळे ऊर्फ ’जादूगार रघुवीर’ – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगार. त्यांनी ‘फिरता जादूगार‘ व ‘मी पाहिलेला रशिया‘ ही पुस्तके लिहिली आहेत.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉मुंबईची परसबाग कोणत्या शहरास म्हणतात?*
*🥇नाशिक*
*👉पोलीस यंत्रनेवर कोणत्या खात्याचे नियंत्रण असते?*
*🥇गृहखात्याचे*
*👉पोलीस पाटलाच्या नेमनुकीसाठी किमान वयोमर्यादा किती वर्षे आहे?*
*🥇25 वर्षे*
*👉गोफनमधून सोडलेल्या दगडात कोनती ऊर्जा असते?*
*🥇गतिज ऊर्जा*
*👉नुकताच आपल्या देशाने कोणता राष्ट्रीय उत्सव साजरा केला?*
*🥇15 ऑगस्ट स्वातंत्र्य-उत्सव* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*💫कर्मातच देवाचा शोध*
*एकदा एक बाई रामकृष्ण परमहंसाकडे आल्या आणि म्हणाल्या , " मला या संसाराचा विट आला आहे . मुलं मोठी झाली. आता प्रपंच सुटेल असे वाटले . पण नातवंडांच्या प्रेमात पडले . रोज त्याला सांभाळावे लागते . तेव्हा आता घर सोडायचा विचार आहे . "*
*रामकृष्णांनी विचारले , " घर सोडून तुम्ही काय करणार ? "*
*त्या बाई म्हणाल्या , " गंगेच्या तीरावर एक झोपडी बांधणार . त्यात श्रीकृष्णाची मूर्ती बसविणार . रोज त्या मूर्तीची पूजा करणार . कृष्णाला नेवैद्याने जेवू घालणार . कृष्णाला झोपेतून उठविणार, आंघोळ घालणार . "*
*परमहंसांनी विचारले , "* *श्रीकृष्णाची मूर्ती दगडाची असणार न ? " तेव्हा त्याबाई ' हो ' म्हणाल्या . रामकृष्णांनी विचारले , " आपण दगडाच्या मूर्तीत श्रीकृष्ण पाहणार ? " त्या बाई ' हो ' म्हणाल्या . त्यावर रामकृष्ण म्हणाले . " आपण दगडाच्या मूर्तीत श्रीकृष्ण पाहणार , मग नातवंडामध्ये श्रीकृष्ण का पाहत नाहीत ? श्रीकृष्ण समजून नातवंडाला जेवू घाला. श्रीकृष्ण म्हणून आंघोळ घाला. श्रीकृष्ण म्हणून त्याला झोपवा. "*
*तुम्ही तुमच्या नातवंडानाच तुमचा श्रीकृष्ण समजून वागा. मनातला भाव चांगला ठेवा म्हणजे तुम्हाला सर्वत्रच भगवंत दिसेल आवश्यक नाही मुर्तीतच देव पाहणे.तुम्ही तुमच्या नित्यकर्मात पण देवाचे दर्शन घेऊ शकता.*
*✅तात्पर्य :-*
*नित्य कर्मामध्ये भगवतभाव ओतला की ते कर्म नाम साधनेच्या दर्जाचे होते व तेच कर्म पूजा ठरते.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment