2 ऑगस्ट

*📚परीपाठ🌹*

*❂ दिनांक:~ ०२ ऑगस्ट
        ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🖋 सुविचार 🖋*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*यशस्वी व्यक्तिपेक्षा*
*अपयशी व्यक्तींचे*
*अनुभव वाचा,यशाचा*
*मार्ग मिळेल"* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *⚜म्हणी व अर्थ ⚜*

*तोंड दाबुन बुक्यांचा मार*

*🔱अर्थ:-*
*एखाद्याला विनाकारन शिक्षण करने आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्ग मोकळा न ठेवणे.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
             *📆 दिनविशेष 📆*    


*🌞या वर्षातील🌞 २१४ वा (लीप वर्षातील २१५ वा) दिवस आहे.*


    *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*

*👉१६७७: शिवाजीमहाराज तामिळनाडूतील विरुधाचलम येथे देवदर्शनास गेले. तिथे त्यांनी डच प्रतिनिधींशी बोलणी केली.*
*👉१८७०: जगातील पहिल्या भूमिगत ट्यूब रेल्वेची टॉवर सबवे ची लंडन मध्ये सुरवात झाली.*
*👉१९५४: दादरा व नगर हवेली हा प्रांत भारतीयांनी पोर्तुगीजांकडुन ताब्यात घेतला.*
*👉१९७९: नगर जिल्ह्यातील डॉ. रजनीकांत आरोळे व त्यांच्या पत्‍नीला मॅगसेसे पुरस्कार जाहीर केला.*

    *🌹जन्मदिवस / जयंती🌹*

*👉१८३४: स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे रचनाकार फ्रेडेरीक ऑगस्टे बर्र्थोल्ड यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑक्टोबर १९०४)*
*👉१८६१: भारतीय रसायनशास्त्रज्ञ, बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स कंपनी चे संस्थापक आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९४४)*
*👉१८७६: भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगाली वेंकय्या यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १९६३)*

      *🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*

*👉१७८१: पेशवाईतील मुत्सद्दी, साडेतीन शहाण्यांपैकी एक पूर्ण शहाणे सखारामबापू बोकील यांचे निधन.*
*👉१९२२: टेलिफोन चे संशोधक अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांचे निधन. (जन्म: ३ मार्च १८४७)*
*👉१९३४: जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष पॉल फॉन हिन्डेनबर्ग यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर १८४७)* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉सांबर सरोवर देशातील कोणत्या राज्यात आहे?*
*🥇राजस्थान*

*👉समर्थ रामदास स्वामी यांचे मुळ नाव काय आहे?*
*🥇नारायण सुर्याजी ठोसर*

*👉फिरोजशहा कोटला मैदान देशातील कोणत्या शहरात आहे?*
*🥇दिल्ली*

*👉मॅगनेशियमची संज्ञा काय आहे?*
*🥇Mg*

*👉2.5 एकर म्हणजे किती हेक्टर?*
*🥇एक हेक्टर* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*
     
*🧠बुद्धीचा योग्य वापर*

*एक राजा कुशल प्रशासक होता. प्रजेचे सुख- दु:ख जाणून घेण्यासाठी तो साधारण वेशभूषा करून फिरत होता. एक दिवस जेंव्हा तो नगरातून जात होता तेंव्हा त्याला काही घोडेस्वार आपल्याकडे येताना दिसले, ते चोर असून आपल्याला लुटण्यासाठी येत आहेत असे राजाने हेरले. धाडसी राजा आता घाबरून जाण्याऐवजी लढण्यासाठी तयार झाला. त्याचवेळी त्याच्या घोड्याचा पाय खड्ड्यात अडकला. घोडा थोडासाही इकडे तिकडे हळू शकत नव्हता आणि चोर तर जवळ आले होते. तेवढ्यात तेथे काही तरुण आले. परिस्थिती ओळखून त्यांनी चोरांवर प्रतिहल्ला केला व हाकलून लावले. राजा यामुळे खुश झाला.*

              *त्याने त्या तरुणांना आपली ओळख दिली व बक्षीस म्हणून काही ना काही मागण्यास सांगितले. एका तरुणाने धन मागितले, दुसऱ्याने घर, तिसऱ्याने शेती, चौथ्याने सरपंचपद, पाचव्याने गावापर्यंत रस्ता बनवून मागितला आणि सहाव्याने म्हंटले, "महाराज ! मला काही देण्यापेक्षा तुम्हीच माझ्या घराचा पाहुणचार स्वीकारण्यासाठी माझ्या घरी वर्षातून दोन वेळा यावे." राजाने सर्वांच्या इच्छा पूर्ण केल्या व सहाव्या तरुणाला घरी येण्याचे वचन दिले. राजा त्याच्या घरी गेला तेंव्हा त्याचे घर खूप जीर्ण झाले होते. राजाला ते पाहवले नाही ते त्याने बांधून देण्याची आज्ञा केली. तसेच येण्याजाण्यासाठी चांगला रस्ता करून दिला. राजा हा पाहुणा म्हणून येत असल्याने त्याचा गावातील गावातील सन्मान वाढला. प्रतिष्ठा वाढली, राजाच्या जवळचा असल्याने राजदरबारी त्याचे म्हणणे मांडता येवू लागले. राजाने प्रत्येक वेळी त्याला काही ना काही वस्तू भेट दिल्याने त्याची श्रीमंती वाढत गेली. त्याच्या अक्कल हुशारीने तो गावातील प्रतिष्ठित नागरिक बनला.*

*🔔तात्पर्य:-*
*योग्य संधी मिळेल तेंव्हा बुद्धीचा वापर योग्य पद्धतीने केल्यास चांगले लाभ पदरात पडून घेता येतात.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
        

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

1000 "OPPOSITE" Words in English