17 ऑगस्ट
*📚परीपाठ🌹*
*❂ दिनांक:~ 17 ऑगस्ट ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🖋 सुविचार 🖋*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*💡कळकळ ही जीवनाची सुरूवात करते तर त्याग हा त्याचा शेवट करतो.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*⚜म्हणी व अर्थ ⚜*
*🦊कोल्हा काकडीला राजी –*
*🔱अर्थ :-*
*लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📆 दिनविशेष 📆*
*🌞या वर्षातील🌞 २२९ वा (लीप वर्षातील २३० वा) दिवस आहे.*
*🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*
*👉१६६६: शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतून पसार झाले.*
*👉१८३६: रजिस्ट्रेशन ऑफ बर्थस अॅक्ट ब्रिटिश संसदेने मान्यता दिलेल्या कायद्याची १८३७ पासून अंमलबजावणी सुरू झाली.*
*👉१९४५: ईंडोनेशियाला नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य.*
*👉१९५३: नार्कोटिक्स अॅनॉनिमस या संस्थेची पहिली सभा दक्षिण कॅलिफोर्नियात झाली.*
*👉१९८२: पहिली सी. डी. जर्मनीमधे विकण्यात आली.*
*👉१९८८: पाकिस्तानचे ६वे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल हक आणि अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत अर्नोल्ड रॅफेल विमान अपघातात ठार झाले.*
*👉१९९७: उस्ताद अली अकबर खाँ यांना अमेरिकेचा नॅशनल हेरिटेज पुरस्कार प्रदान.*
*👉१९९९: तुर्कस्तानच्या इझ्मित शहराजवळ ७.४ रिश्टर तीव्रतेचा भूकंप. १७,००० ठार, ४४,००० जखमी.*
*👉२००८: एकाच ऑलिंपिक स्पर्धेत आठ सुवर्ण पदक जिंकणारे मायकेल फेल्प्स हे पहिले खेळाडू ठरले.*
*🌹जन्मदिवस / जयंती🌹*
*👉१९०५: ग्रंथसूचीकार शंकर गणेश दाते यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १९६४)*
*👉१९१६: ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉ. विनायक पेंडसे यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑगस्ट १९७५)*
*👉१९२६: चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे मुख्य सचिव जिआंग झिमिन यांचा जन्म.*
*👉१९३२: नोबेल पारितोषिक विजेते त्रिनिदादी-भारतीय लेखक व्ही. एस. नायपॉल यांचा जन्म.*
*👉१९४४: ओरॅकल कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक लैरी एलिसन यांचा जन्म.*
*👉१९४९: इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांचा जन्म.*
*👉१९७०: अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू जिम कुरिअर यांचा जन्म.*
*🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*
*👉१८५०: पेरू देशाचे पहिले अध्यक्ष जोस डे सान मार्टिन यांचे निधन. (जन्म: २५ फेब्रुवारी १७७८)*
*👉१९०९: क्रांतीकारात मदनलाल धिंग्रा यांनी न्यायलयात स्वतःहून फाशीची शिक्षा मागितली असून त्यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १८८३)*
*👉१९२४: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू टॉम केन्डॉल यांचे निधन.*
*👉१९८८: पाकिस्तानचे ६ वे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल हक यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९२४)* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉जहाजबांधणी व्यवसायात जगातील अग्रेसर देश कोणता?*
*🥇जपान*
*👉नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?*
*🥇दख्खनचे पठार*
*👉 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?*
*🥇नदीचे अपघर्षण*
*👉दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?*
*🥇लीगनाईट Lignite*
*👉मातीच्या भांडय़ांसाठी प्रसिद्ध असलेला देश कोनता आहे?*
*🥇चीन* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*◼️मन माणसाचे *डोके..........?*
*एका माणसाला काही कामानिमित्त आपल्या गावातून शहराकडे जायचे होते. तो बेरोजगार होता व गावात त्याला काही काम उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्याने शहरात जाऊन काम करण्याचे ठरवले होते. जवळ पैसे नसल्याने गावापासून शहरापर्यंतचा प्रवास तो पायीच करणार होता. त्याला ज्या रस्त्याने जायचे होते तो रस्ता जंगलातून जाणारा होता. त्यामुळे त्याला जंगली श्वापदांची भीती वाटत होती. परंतु दुसरा काही मार्ग नसल्याने त्याने धाडस करून जंगलात प्रवेश केला. काही अंतर गेल्यावर त्याला झाडावर एक माकड दिसले. त्याला पाहताच माकडाने झाडावरून त्याच्या पुढ्यात उडी मारली. परंतु माकडाने त्याला काही इजा केली नाही. उलट त्याने माणसाला त्याच्याबाबत माहिती विचारली. त्यावर माणसाने बरीच मोठी पाल्हाळीक कथा त्याला ऐकवली. ती ऐकल्यावर माकडाने त्याला पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले. पण त्यासाठी त्याला एक अटही घातली, तू मला क्षणभरही कामाशिवाय मोकळे सोडायचे नाही. नाही तर मी तुला मारून टाकीन. माणसाने त्या माकडाची अट मान्य केली. माकड त्या दिवसापासून माणसाची सर्व कामे करू लागले. माणसाची सर्व कामे करून माकड त्याच्यासोबत चांगलेच रुळले. परंतु माणसाच्या मनात मात्र, सुरुवातीला हा आपल्याला मारणार तर नाही ना? अशी धास्ती वाटत होती. पण नंतर त्याला एक युक्ती सुचली. माकडासाठी जेव्हा काहीच काम नसे तेव्हा माणूस एक शिडी लावून त्यावर माकडाला चढ - उतार करण्यास सांगत असे. हळूहळू माकडाला त्याची सवय झाली. माणसाची सर्व कामे ते करू लागले.*
*✅तात्पर्य :- माकड हे मानवी मेंदूचे प्रतीक आहे. आपण मेंदूला सदैव विविध कार्यात गुंतवून ठेवले पाहिजे. तरच ते सदैव रचनात्मक विचारांनी प्रेरित होऊन सकारात्मक योगदान देत राहील. परंतु त्याला काही काम नसेल तर ते नकारात्मक विचार करू लागेल. हिंसक होईल, भरकटेल. त्यामुळेच म्हटले जाते की, रिकामा मेंदू हा सैतानाचे घर असतो.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment