14 ऑगस्ट

*📚परीपाठ🌹*

*❂ दिनांक:~ 14 ऑगस्ट  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🖋 सुविचार 🖋*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

    *💡"कौतुक" हा फार छोटा शब्द आहे.*
 *पण ते करायला "मन" मात्र खुप मोठे लागतं.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *⚜म्हणी व अर्थ ⚜*

*✊शेंडी तुटो की पारंबी तुटो.*

*🔱अर्थ:-*
*पक्का निश्चय करणे.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
             *📆 दिनविशेष 📆*    

*🇩🇿पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन*

*🌞या वर्षातील🌞 २२६ वा (लीप वर्षातील २२७ वा) दिवस आहे.*

    *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*

*👉१९४७ : भारताच्या घटनासमितीने सत्ता स्वीकारण्याचा ठराव मंजूर केला आणि लॉर्ड माऊंटबॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक केली.*
*👉१९४७ : पाकिस्तानला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.*
*👉१८६२ : मुंबई, कलकत्ता उच्‍च न्यायालयाची स्थापना*

    *🌹जन्मदिवस / जयंती🌹*

*👉१९५७ : जॉन प्रकाश राव जनुमला ऊर्फ ’जॉनी लीवर’ – विनोदी अभिनेता*
*👉१९२५ : जयवंत दळवी – साहित्यिक, नाटककार व पत्रकार. कथा, कादंबरी... ते ’ठणठणपाळ’ या टोपणनावाने विनोदी व मार्मिक लेखन करीत.*
*👉१९०७ : गोदावरी परुळेकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका. महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील म्हणून त्यांनी सनद मिळवली.*

      *🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*

*👉२०१२ : विलासराव देशमुख – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री*
*👉२०११ : शम्मी कपूर – हिन्दी चित्रपट अभिनेता व निर्माता*
*👉१९८४ : कुस्तीगीर खाशाबा दादासाहेब जाधव – १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय, शिवछत्रपती पुरस्कार [मरणोत्तर]* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉कडधान्यांच्या पिकामूळे जमिनिला कशाचा पुरवठा होतो?*
*🥇नत्राचा*

*👉मुंबई येथे शारदा सदन ही संस्था कोणी सुरु केली?*
*🥇पंडिता रमाबाई*

*👉भारुड रचना ही कोणत्या संताने केली?*
*🥇संत एकनाथ*

*👉सशस्त्र क्रांतिकारक म्हणून कोणास ओळखले जाते?*
*🥇भगतसिंग व राजगुरु*

*👉गोवा या राज्याची राजधानी कोनती आहे?*
*🥇पणजी* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*
     
    *🤲50 वर्षाची तप:श्चर्या*
     
*एक फकीर 50 वर्षे एकाच जागेवर बसून रोज 5 वेळेला नमाज अदा करत असे. एक दिवस आकाशवाणी झाली आणि अल्लाचा आवाज फकीराच्या कानी पडला,'' हे फकीरबंदे, तू 50 वर्षापासून नमाज अदा करत आहेस पण तुझी एकही नमाज अजूनपर्यंत कबूल झालेली नाही.'' फकीराच्या शेजारी बसणा-या इतर सर्वांनी ही आकाशवाणी ऐकली व ते सर्वजणच दु:खी झाले. 50 वर्षाची तप:श्चयर्या निष्फळ ठरली आणि फकीराची यावर प्रतिक्रिया असेल याचा विचार करत असतानाच एक आश्चर्यचकित घटना तेथे घडू लागली. ज्या फकीराबाबत ही आकाशवाणी घडली होती तो फकीर आनंदाने नाचू लागला होता. तो अल्लाहचे आभार मानत होता आणि अल्ला, अल्ला्, या खुदा तेरा शुक्रिया करत आनंदाने नाचत होता. हे पाहून इतर सर्वांना वाटले या आकाशवाणीचा या फकीराच्या मनावर खूपच परिणाम झाला आहे. हे सर्व तो परिणामात करत आहे असे त्यांना वाटले. कोणीतरी त्यार फकीराला विचारले,''बाबा, तुम्हाला खरे तर दु:ख व्हायला हवे होते. कारण तुमची 50 वर्षाची तप:श्च र्या आताच खुदाने नाकारली आहे. तरी पण तुम्हील इतके आनंदात कसे'' फकीर आनंदात उत्तरला,'' अरे गेली ती 50 वर्षाची तप:श्चर्या पण खुदाला हे तर माहित आहे की मी 50 वर्षे झाले त्याचे स्म:रण करतो आहे. त्याला माझे या निमित्ताने का होईना स्मरण झाले हे काय कमी आहे. खुदाने माझी आठवण ठेवली हेच मला खूप आहे.''*

*✅तात्पर्य :- कोणतीही सेवा ही निष्फळ होत नाही, यथायोग्य वेळेस त्याचे फळ हे मिळतेच. सेवा करताना मनात तर मेवा मिळविण्याचा भाव असेल तर सेवेला किंमत राहत नाही.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

1000 "OPPOSITE" Words in English