13 ऑगस्ट
*📚परीपाठ🌹*
*
*❂ दिनांक:~ 13 ऑगस्ट
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🖋 सुविचार 🖋*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*💡स्वप्न खूप मोठी असावीत...*
*पण जग दाखवणाऱ्या*
*आई वडीलांपेक्षा नाही...* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*⚜म्हणी व अर्थ ⚜*
*👤मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.*
*🔱अर्थ*
*प्रत्यक्ष अनुभव घेतल्या शिवाय कळत नाही* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📆 दिनविशेष 📆*
*🌎आंतरराष्ट्रीय डावखुरे दिन*
*🌞या वर्षातील🌞 २२५ वा (लीप वर्षातील २२६ वा) दिवस आहे.*
*🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*
*👉२००४ : ग्रीसमधील अथेन्स येथे २८ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. सुमारे ३०० दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन अंदाजे ४ अब्ज लोकांनी हा उद्घाटन सोहळा पाहिला.*
*👉१८९८ : कार्ल गुस्ताव्ह विट याने 433 Eros या पृथ्वीजवळच्या पहिल्या लघुग्रहाचा शोध लावला.*
*🌹जन्मदिवस / जयंती🌹*
*👉१९३६ : वैजयंतीमाला बाली ऊर्फ ’वैजयंतीमाला ’ – चित्रपट अभिनेत्री*
*👉१८९८ : प्रल्हाद केशव तथा आचार्य अत्रे – लेखक, कवी, शिक्षणतज्ञ,*
*👉१८९० : त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा ’बालकवी’ –*
*🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*
*👉१९८८ : गजानन जागीरदार – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’चे (FTII) पहिले संचालक*
*👉१९८० : पुरुषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे – अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक*
*👉१७९५ : महाराणी अहिल्याबाई होळकर – देशातील अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रातील देवळांचा त्यांनी जीर्णोद्धार केला.(जन्म: ३१ मे १७२५)* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉भारतीय ध्वजाला कोणत्या नावाने ओळखले जाते?*
*🥇तिरंगा*
*👉कोपरगाँव शहरातुन वाहत जानारी नदी कोनती आहे?*
*🥇गोदावरी*
*👉श्री क्षेत्र पुणतांबे येथे कोणाची समाधी आहे?*
*🥇चांगदेव महाराज समाधी*
*👉आदीवासिंचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?*
*🥇नंदुरबार*
*👉गुरुत्वकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला?*
*🥇न्यूटन* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*🪓कूह्राड आणि दांडा*
*एकदा कु-हाड आणि लाकडाचा दांडा यांच्यामध्ये वादविवाद सुरु झाला. दोघेही स्वत:ला अतिशय शक्तिशाली असल्याचे सांगत होते लाकडाचा दांडा नंतर शांत झाला. मात्र कु-हाडीची बडबड मात्र अखंडपणे चालूच होती. कु-हाडीला प्रचंड अहंकार होता.ती रागाच्या भरात काय वाटेल ते बोलत सुटली होती,"अरे लाकडाच्या दांडक्या ! तू स्वत:ला काय समजतोस? तुझी शक्ती माझ्यापुढे पाणी भरते, मी ठरवले तर मोठमोठे वृक्ष मी सहज कापून काढते, तुझ्यासारख्या दांड्याने माझ्याशी वैर घेणे चांगले नाही. तू माझी बरोबरी करू नको." लाकडाचा दांडा कु-हाडीचे अहंकारी सुरातील बोलणे मन लावून ऐकत होता. काही काळ बडबड केल्यावर कु-हाड शांत झाली मग लाकडाचा दांडा बोलू लागला,"तू जे म्हणते आहेस ते सर्व खरे आहे. तू झाडे तोडू शकतेस, तुझी शक्ती माझ्यापेक्षा जास्त आहे.*
*हे सगळे खरे आहे पण तू एका गोष्टीकडे लक्ष दिले नाहीस ते म्हणजे तू वरीलपैकी कोणतेच काम एकट्याने करू शकत नाहीस. तुला प्रत्येक गोष्टीत माझ्या सहकार्याची गरज हि लागतेच. तू कोणतेच काम एकटीच्या जीवावर कधीच करू शकणार नाही हे तुला माहित असतानासुद्धा तू नको त्या शक्तीचा गर्व बाळगून आहेस. तेंव्हा स्वत:ला यापासून वेळीच सावर अन्यथा तुला कुणी किंमत देणार नाही." कु-हाडीला तिची चूक समजली व तिने दांड्याची माफी मागितली.*
*✅तात्पर्य-:*
*सहकार्य भावना महत्वाची असते. अहंकारातून सहकार्य भावनेला जर तडा गेला तर काम करता येणे अशक्य आहे. परस्परसंबधी आदरभाव ठेवणे गरजेचे आहे.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment