12 ऑगस्ट
*📚परीपाठ🌹*
*❂ दिनांक:~ 12 ऑगस्ट ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🖋 सुविचार 🖋*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*💡नेहमी तयारीत राहा*
*संधी केव्हाही येऊ शकते* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*⚜म्हणी व अर्थ ⚜*
*🕺कुडी तशी पुडी*
*🔱अर्थ:-*
*देहाप्रमाने आहार किंवा कुवतीनुसार मिळणे.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📆 दिनविशेष 📆*
*🌞या वर्षातील🌞 २२४ वा (लीप वर्षातील २२५ वा) दिवस आहे.*
*🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*
*👉१९४८: लंडनमधे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने हॉकीमधे सुवर्णपदक मिळवले.*
*👉१९६४: वंशभेद केल्याबद्दल दक्षिण अफ्रिकेची ऑलिम्पिक स्पर्धांमधुन हकालपट्टी झाली.*
*👉१९८१: आय. बी. एम. कंपनीचा पहिला पर्सनल कॉम्प्युटर बाजारात आला.*
*👉१९८९: कुसूमाग्रज यांच्या अध्यक्षतेखाली पहिली जागतिक मराठी परिषद मुंबई येथे सुरू झाली.*
*👉१९९८: सचिन तेंडुलकर यांना राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार जाहीर.*
*👉२००५: श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री लक्ष्मण कादिरमगार यांची तामिळ अतिरेक्यांनी हत्या केली.*
*🌹जन्मदिवस / जयंती🌹*
*👉१८६०: एडॉल्फ हिटलर यांही आई क्लारा हिटलर यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर १९०७)*
*👉१८९२: भारतीय गणितज्ञ व ग्रंथालयशास्त्रतज्ञ एस. आर. रंगनाथन यांचा जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर १९७२)*
*👉१९०६: लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंगराव (पाटील) तथा एस. पी. पी. थोरात यांचे निधन. (मृत्यू: १० ऑगस्ट १९९२)*
*👉१९१९: भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार डॉ. विक्रम साराभाई यांचा जन्म. (मृत्यू: ३१ डिसेंबर १९७१)*
*👉१९२५: गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस् चे सहसंस्थापक नॉरिस मॅक्विहिर यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २००४)*
*👉१९४८: कवी, समीक्षक व अनुवादक फकिरा मुंजाजी तथा फ. मुं. शिंदे यांचा जन्म.*
*🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*
*👉१९६४: दुसर्या महायुध्दातील गुप्तहेर, लेखक, पत्रकार आणि जेम्स बाँड चे जनक इयान फ्लेमिंग यांचे निधन. (जन्म: २८ मे १९०८)*
*👉१९६८: नामवंत वक्ते आणि विद्वान साहित्याचार्य बाळशास्त्री व्यंकटेश हरदास यांचे निधन.*
*👉१९७३: गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक, उद्योगपती दयानंद बाळकृष्ण ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांचे निधन. (जन्म: १२ मार्च १९११)*
*👉१९८४: कवी, समीक्षक व अनुवादक आनंदीबाई जयवंत यांचे निधन.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती केंव्हा असते?*
*🥇5 सप्टेंबर (शिक्षक दिवस)*
*👉कानिफनाथ महाराज यांची समाधी कोठे आहे?*
*🥇मढ़ी (अहमदनगर)*
*👉देशातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते?*
*🥇मुंबई आकाशवाणी केंद्र*
*👉महाराष्ट्रातील मुख्य व्यवसाय कोणता आहे?*
*🥇शेती*
*👉365 दिवस असणाऱ्या वर्षाला काय म्हणतात?*
*🥇सौर वर्ष* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*👴🏻म्हातारा आणि मृत्यु👤*
*एक अतिशय म्हातारा माणूस लाकडे आणण्यासाठी रानात गेला. तेथे काही लाकडे जमा करून त्याची एक मोळी बांधली व ती डोक्यावर घेऊन मोठ्या कष्टाने पावले टाकत घराकडे चालला.*
*वाटेत डोक्यावरच्या ओझ्याने तो अगदी थकून गेला आणि ओझे खाली टाकून धापा टाकत खाली बसला. त्यावेळी तो मृत्युला म्हणाला, 'हे प्राणीमात्राच्या विसाव्या, तू ये आणि या दुःखातून मला सोडव.'*
*ते ऐकताच प्रत्यक्ष मृत्यू म्हातार्याच्या पुढे येऊन उभा राहिला व त्याला म्हणाला, 'बाबा, तू माझी आठवण का केली होती?' मृत्यू इतका जवळ आहे हे त्या बिचार्या म्हातार्याला माहीत नव्हते.*
*मृत्यूची ती भितीदायक मूर्ति पाहून म्हातार्याची भितीने गाळण उडाली. मग थोड्या वेळाने तो थरथरत मृत्यूला म्हणाला, 'मृत्यू देवा, मी अशक्त, माझ्या डोक्यावरची मोळी अचानक खाली पडली. ती उचलून देशील म्हणून मी हाक मारली. दुसरं काही कारण नाही. खरंचच इतकं काम होतं आणि यात जर मी तुझा अपमान केला असं तुला वाटत असेल, तर मी तुझ्या पाया पडतो. मला क्षमा कर व आलास तसाच कृपा करून माघारी जा.'*
*✅तात्पर्य :-*
*मृत्यूविषयी थट्टेने बोलण्याची काही लोकांना सवय असते. थोडेसे संकट आले की मरण येईल तर बरे असे म्हणतात पण मृत्यू दूर आहे तोवरच ह्या गोष्टी.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment