11 ऑगस्ट
*📚परीपाठ🌹*
*❂ दिनांक:~ 11 ऑगस्ट * ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🖋 सुविचार 🖋*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*💡शक्य तेवढे प्रयत्न केल्यावर*
*अशक्य असं काहीच*
*राहत नाही.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*⚜म्हणी व अर्थ ⚜*
*⛰️दुरुन डोंगर साजरे*
*🔱अर्थ:-*
*कोणतीही गोष्ट लांबुन चांगली दिसते, परंतु जवळ गेल्यावर तिचे खरे स्वरूप कळते.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📆 दिनविशेष 📆*
*🌞या वर्षातील🌞 २२३ वा (लीप वर्षातील २२४ वा) दिवस आहे.*
*🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*
*👉१९४३: सी. डी. देशमुख हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया चे पहिले भारतीय गव्हर्नर झाले.*
*👉१९७९: गुजरात मोर्वी येथे धरण फुटून हजारो लोक मृत्यूमुखी पडले.*
*👉१९९४: अफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व डॉ. नेल्सन मंडेला यांच्या निकटवर्ती सहकारी डॉ. फातिमा मीर यांना विश्वगुर्जरी पुरस्कार जाहीर.*
*👉१९९९: बारा वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय जलद बुद्धीबळ स्पर्धेत नवी दिल्ली येथील सहा वर्षे वयाच्या परिमार्जन नेगी याने विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा जिंकणारा सर्वात छोटा खेळाडू ठरला.*
*👉१९९९: शतकातील शेवटचे खग्रास सूर्यग्रहण झाले.*
*🌹जन्मदिवस / जयंती🌹*
*👉१९११: पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक प्रेम भाटिया यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे १९९५)*
*👉१९२८: लेखक व पत्रकार विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी २०००)*
*👉१९४३: पाकिस्तानचे १० वे राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांचा जन्म.*
*👉१९५४: क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचा जन्म.*
*🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*
*👉१९०८: क्रांतिकारक खुदिराम बोस यांचे निधन. (जन्म: ३ डिसेंबर १८८९)*
*👉१९७०: साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ इरावती कर्वे यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर १९०५)*
*👉२०००: दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते अभिनेते पी. जयराज यांचे निधन. (जन्म: २८ सप्टेंबर १९०९)*
*👉२००३: स्विस गणितज्ञ अर्मांड बोरेल यांचे निधन. (जन्म: २१ मे १९२३)*
*👉२०१३: भारतीय पक्षीशास्त्रज्ञ आणि लेखक जफर फटहॅली यांचे निधन. (जन्म: १९ मार्च १९२०)* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉गरबा हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे?*
*🥇गुजरात*
*👉भारताची स्वरसम्राज्ञी म्हणून कोणत्या गायीकेला ओळखले जाते?*
*🥇लतादिदी मंगेशकर*
*👉बेळगांव हे मराठी भाषिक असलेले गांव कोणत्या राज्यात आहे?*
*🥇कर्नाटक*
*👉जगातील विस्ताराने अतिलहान देश कोनता?*
*🥇वेटिकन सिटी*
*👉भारताने अवकाशात सोडलेला पहिला उपग्रह कोनता?*
*🥇आर्यभट्ट* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*🧙♂️व्यापारी व उंट🐪*
*एक व्यापारी आपल्या दोन उंटावर माल लादून गावा गावातून तो विकत असे. अशाच एका गावात त्याने दिवसभर विक्री केली. रात्र झाल्याने तिथेच एका मंदिराच्या आवारात मुक्काम करण्याचे त्याने ठरवले. मैदानातील झाडाला उंट बांधून स्वतः मंदिराच्या ओसरीत झोपायचं असा विचार तो करतो. दोन्ही उंटांना झाडाजवळ नेतो. एका उंटाला दोरीने बांधतो. मात्र दुसऱ्या उंटाला बांधायला जातो तर दोरी कमी पडते., आता काय करावे...? पंचाईत झाली... उंट तसाच मोकळा ठेवणे शक्य नव्हते... व्यापारी परेशान झाला. इकडे तिकडे एखादी दोरी सापडतीय का ते पाहून लागला., ती काही दिसेना...*
*त्याची परेशानी पाहून मंदिराचा पुजारी त्याच्या जवळ येऊन म्हणाला, अरे.,* *पहिल्या उंटाला बांधले तसेच दुसऱ्याला बांध.*
*महाराज, पण दोरी नाहीये ना...*
*पुजारी म्हणाला, "तू नुसतं दोरी बांधल्याचा नाटक कर".,*
*त्याप्रमाणे व्यापाऱ्याने खोटे खोटेच उंटाला दोरी बांधली...* *आश्चर्य म्हणजे त्यानंतर तो दुसरा उंटही निवांत खाली बसला...*
*सकाळी व्यापारी उठून, सगळे आवरून दुसऱ्या गावी जायला निघाला. झाडाजवळ येऊन पहिल्या उंटाची दोरी सोडली., तो उंट उभा राहिला.*
*दुसऱ्या उंटाला काही दोरी बांधलेली नव्हतीच म्हणून व्यापाऱ्याने त्या दुसऱ्याला फक्त "झ्याक झ्याक" असा आवाज देऊन उठवले... पण तो दुसरा उंट काही उठेना., व्यापारी पुन्हा परेशान...*
*तिथेच उभा असलेला पुजारी हसू लागला. तो म्हणाला, अरे, तो उठणार नाही. कारण तू त्याची दोरी कुठे काढलीस...?*
*पण महाराज., मी दोरी बांधलीच कुठे होती...? नुसते नाटक केले होते ना...*
*पुजारी म्हणाला, नाटक तुझ्यासाठी होते., पण त्याला तर ते खरेच वाटले होते ना... म्हणून आता ती काल्पनिक दोरी सोडव., मग पहा...*
*त्याप्रमाणे व्यापाऱ्याने दोरी काढल्याचे नाटक केले., आणि काय आश्चर्य...? तो दुसरा उंट तटकन उठला की..., व्यापारी चकित झाला...!*
*पुजारी म्हणाला जसा हा उंट अदृष्य दोरीने बांधला गेला तसेच आपणही जुन्या, कालबाह्य रूढीमध्ये अडकलॊ आहोत.*
*"ती" अदृश्य दोरी काढून टाकण्याची इच्छाच नाही तर आपण दुसऱ्या आनंदाचा गावी जाणार कसे?*
*✅तात्पर्य_:-*
*आपल्या आनंदाच्या वाटेत आपल्या शिवाय दुसरा कोणीही अडथळा आणू शकत नाही...*
*निष्कारण स्वतःच स्वतःला बांधून घेतलेल्या अनेक "दोऱ्या" सोडवून पाहूया.., आपण नक्की आनंदी होऊ.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment