1 सप्टेंबर

*📚परीपाठ🌹*
*
*❂ दिनांक:~ 1 सप्टेंबर  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🖋 सुविचार 🖋*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

    *💡संयमाचा एक क्षण पुढे येणाऱ्या अनंत अडचणी सोडवू शकतो.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *⚜म्हणी व अर्थ ⚜*

*🏠घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात.*

*🔱अर्थ:-*
*एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारेच त्याच्याशी वाईटपणे वागु लागतात.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
             *📆 दिनविशेष 📆*    

*🌞या वर्षातील🌞 २४४ वा (लीप वर्षातील २४५ वा) दिवस आहे.*

    *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*

*👉१९१४: रशियातील सेंट पीट्सबर्ग शहराचे नाव बदलुन पेट्रोग्राड करण्यात आले.*
*👉१९२३: टोक्यो आणि योकोहामा परिसरात भूकंप १,०५,००० ठार.*
*👉१९३९: जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. या घटनेमुळे दुसर्‍या महायुद्धाची सुरुवात झाली.*
*👉१९५६: भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC of India) स्थापना.*
*👉१९६९: लिबीयात उठाव- हुकूमशहा मुअम्मर गडाफी सत्तेवर आला.*
*👉१९७२: अमेरिकेच्या बॉबी फिशरने रशियाच्या बोरिस स्पास्कीला बुद्धीबळात पराभूत केले व जगज्जेता बनला.*
*👉१९७९: पायोनियर- ११ अंतराळयान शनीपासून २१,००० किमी अंतरावरुन गेले.*
*👉१९८५: संयुक्त अमेरिकन-फ्रेंच मोहिमेमुळे बुडालेले आरएमएस टायटॅनिक सापडले.*

    *🌹जन्मदिवस / जयंती🌹*

*👉१९३१: महाराष्ट्राचे १०वे मुख्यमंत्री आणि माजी आमदार शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा जन्म.( मृत्यू : ४ ऑगस्ट २०२०)*
*👉१८१८: कोस्टा रिका देशाचे पहिले राष्ट्रपती जोस मारिया कॅस्ट्रो माद्रीझ यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १८९२)*
*👉१८९५: मानव-सक्षम विमानांचे निर्मिते एंगलबर्ट जशचा यांचा जन्म. (मृत्यू: २६ जून १९५५)*
*👉१८९६: हरेकृष्ण पंथाचे संस्थापक अभय चरणारविंद भक्तिवेदांत तथा स्वामी प्रभूपाद यांचा जन्म. (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९७७)*
*👉१९०८: हिन्दी चित्रपटांतील गाजलेले खलनायक के. एन. सिंग यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी २०००)*
*👉१९१५: ऊर्दू कथाकार आणि हिन्दी पटकथालेखक राजिंदरसिंग बेदी यांचा जन्म.*
*👉१९२१: यष्टीरक्षक व फलंदाज माधव मंत्री यांचा जन्म.*

      *🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*

*👉२००८ : थॉमस जे. बाटा – बाटा शू कंपनीचे संस्थापक (जन्म: १७ सप्टेंबर १९१४)*
*👉१८९३ : काशिनाथ त्र्यंबक तेलंग – प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडीत, समाजसुधारक, अखिल भारतीय काँग्रेसचे एक संस्थापक, काँग्रेसचे चिटणीस (१८८५-१८८९), मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू (१८९२), हिंदू कायद्यात सुधारणा होण्यासाठी त्यांनी प्रयत्‍न केले. भगवद्‌गीतेचा त्यांनी इंग्रजीत अनुवाद केला. (जन्म: ३० ऑगस्ट १८५०)*
*👉१७१५ : सलग ७२ वर्षे राज्यकारभार केल्यानंतर फ्रान्सचा राजा १४ वा लुई मरण पावला. त्याचा राज्यकाल कोणत्याही युरोपीय राज्यकर्त्यापेक्षा जास्त होता. (जन्म: ५ सप्टेंबर १६३८)*
*👉१५८१ : गुरू राम दास – शिखांचे चौथे गुरू (जन्म: २४ सप्टेंबर १५३४)* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉महानायक म्हणून कोणत्या चित्रपट कलाकाराला ओळखले जाते?*
*🥇अमिताभ बच्चन*

*👉आपल्याला स्वच्छतेचा संदेश देणारे कोणते एक महान संत होऊन गेले?*
*🥇संत गाडगे महाराज*

*👉महाराष्ट्रातील सप्तश्रृंगी गड (वणी) हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यातील आहे?*
*🥇नाशिक जिल्हा*

*👉भारताने अवकाशात सोडलेला पहिला उपग्रह कोणता?*
*🥇आर्यभट्ट*

*👉महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे आहे?*
*🥇प्रवरा नगर(अ.नगर)* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*
     
        *🐭उंदराचे सिंहाशी लग्न🦁*

*उंदरामुळे जाळ्यातून सुटलेला सिंह खूश होऊन त्या उंदराला म्हणाला, ''अरे, तू माझ्यावर फार उपकार केले आहेस त्यासाठी तुला जे काय हवे असेल ते माझ्याजवळ माग, मी देतो.'' ते ऐकून उंदीर गर्वाने फुगला व आपल्या योग्यतेचा विचार न करता म्हणाला, ''महाराज, ज्या अर्थी आपण आनंदाने काय पाहिजे ते माग म्हणता त्या अर्थी काहीही भीती न धरता मी मागतो की तुमची मुलगी मला द्यावी.'' हे ऐकताच सिंहाला फार वाईट वाटले, पण तो वचनात गुंतल्यामुळे त्याला नाही म्हणता आले नाही. त्याने आपली मुलगी आणून उंदराच्या स्वाधीन केली. ती तरुण मुलगी मोठय़ा डौलाने चालत असता तिचा पाय उंदरावर पडून तो तात्काळ मरण पावला.*

*✅तात्पर्य :-*
*जे मागायचे ते विचारपूर्वक व आपल्या योग्यतेला साजेल असे मागावे, नाहीतर भलतेच मागणे मागितल्यामुळे संकट निर्माण होईल.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

1000 "OPPOSITE" Words in English