09 ऑगस्ट

*📚परीपाठ🌹*

❂ *दिनांक:~ 09 ऑगस्ट  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🖋 सुविचार 🖋*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

    *⚛️जीवन खुप सुंदर आहे....*
*अनुभव आपणास मिळत जाईन प्रयत्न करायला विसरु नका मार्ग सापडत जाईन.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *⚜म्हणी व अर्थ ⚜*

*🪓काळ आला होता पन वेळ आली नव्हती.*

*🔱अर्थ:-*
*नाश होण्याची वेळ आली असतांना थोडक्यात बचावले.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
             *📆 दिनविशेष 📆*    

*💫ऑगस्ट क्रांतिदिन*

*🌞या वर्षातील🌞 २२१ वा (लीप वर्षातील २२२ वा) दिवस आहे.*

*🌐आंतरराष्ट्रीय भूमिपूत्र दिन*

*📚भारतीय ग्रंथालय दिन*

*🇮🇳भारत छोडो दिवस*

    *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*

*👉१९९३ : छोडो भारत चळवळीच्या सुवर्णजयंती सांगतासमारंभानिमित्ताने ’सरहद गांधी’ खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन*
*👉१९४५ : अमेरिकेने जपानच्या नागासाकी शहरावर ’फॅटबॉय’* *हा अणूबॉम्ब टाकला. यात ३९,००० लोक तत्क्षणी म्रुत्यूमुखी पडले तर हजारो लोकांना पुढील अनेक वर्षे किरणो त्सर्गाचे परिणाम भोगावे लागले.*
*👉१९४२ : ’चले जाव’ चा नारा दिल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली.*

    *🌹जन्मदिवस / जयंती🌹*

*👉१९०९ : डॉ. विनायक कृष्ण गोकाक – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक*
*👉१८९० : ’संगीतसूर्य’ केशवराव भोसले – ’संगीत सौभद्र’ मधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते.*
*👉१७५४ : पिअर चार्ल्स एल्फांट – वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंता*

      *🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*

*👉२००२ : शांताबाई दाणी – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी*
*👉१९०१ : विष्णूदास अमृत भावे – मराठी रंगभुमीचे जनक, त्यांची पन्नासहून अधिक नाट्याख्याने नाट्य कवितासंग्रह‘ या नावाने प्रसिद्ध झाली आहेत.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉भारतीय राज्यघटनेने सर्वोच्य स्थान कोणाला दिलेले आहे?*
*🥇राष्ट्रपती*

*👉राज्यातील शैक्षणिक धोरण कोण ठरवितात?*
*🥇शिक्षनमंत्री*

*👉कपाशीवर पडनारी दुर्दैवाची कीड कोनती?*
*🥇बोंड अळी*

*👉चहाच्या निर्यातित भारताबरोबर स्पर्धा करणारा देश कोणता?*
*🥇श्रीलंका*

*👉इंग्लैडच्या संसद गृहाचे नाव काय आहे?*
*🥇पार्लमेंट* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*
     
    *👍व्यवस्थापन*

*एकदा धर्मपुर नगराचा राजा सोमसेन शिकारीवरून परतत असताना काही कारणाने आपल्या सर्व साथीदारापासून रस्ता चुकला आणि वेगळ्याच रस्त्याला लागला. जंगलातून रस्ता काढत काढत तो नगराच्या दिशेने वाटचाल करू लागला. रस्त्याने चालत असताना त्याला एक माणूस खांद्यावर कु-हाड घेवून व तोंडाने बासरी वाजवत चाललेला दिसून आला. तो माणूस हि नगराच्या दिशेने चाललेला होता तेंव्हा राजाने त्याच्यासोबत जाण्याचे ठरविले. दोघांनी एकमेकांशी संभाषण सुरु केले. राजाने त्या माणसाला विचारले,"तू कोण आहे?, तुझा व्यवसाय काय? आणि तू जे काही मिळवतो त्यात तू खुश आहे आहे काय?" त्या माणसाने उत्तर दिले,"महाराज! मी एक लाकुडतोड्या असून लाकडे तोडण्याचे काम करतो. रोज मला चार रुपये मिळतात. त्यापैकी पहिला रुपया मी पाण्यात टाकून देतो, दुसरा रुपया मी कर्ज चुकविण्यासाठी वापरतो, तिसरा रुपया मी उधार देण्यासाठी उपयोग करतो तर चौथा रुपया मी जमिनीत गाडून टाकतो."*

                *या म्हणण्याचा अर्थ राजाला काही समजण्याच्या आतच राजाचे सैनिक शोधत तेथे आले व राजा त्यांच्यासोबत निघून गेला. राजाला त्या लाकुडतोड्याचे म्हणणे शांत बसू देईना, त्याने भर दरबारात हा प्रश्न उपस्थित केला,"तो लाकुडतोड्या जे चार रुपये खर्च करतो, ते कसे ते मला सांगा?" कोणालाच या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. मग राजाने निर्णय घेतला कि त्या लाकुडतोड्याला दरबारात बोलवायचे. राजाने तसा आदेश दिला व दुसऱ्या दिवशी लाकुडतोड्याला घेवून सैनिक हजर झाले. लाकुडतोड्या आलेला दिसताच राजा सोमसेन त्याला म्हणाला,"तुझ्या धनाचे तू जे व्यवस्थापन करतो ते कसे ते मला सांग? मला काल काहीच कळले नाही." लाकुडतोड्या हसून म्हणाला, "महाराज! पहिला रुपया मी पाण्यात टाकून देतो म्हणजे मी माझ्या परिवाराचे पोषण करतो., दुसरा रुपया मी कर्ज चुकविण्यासाठी वापरतो म्हणजे म्हाताऱ्या आईवडिलांच्यासाठी खर्च करतो., तिसरा रुपया मी उधार देण्यासाठी उपयोग करतो म्हणजे म्हणजे मी माझ्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करतो जेणे करून ते शिकून माझ्या म्हातारपणी मला सांभाळतील.तर चौथा रुपया मी जमिनीत गाडून टाकतो म्हणजे धर्म, दक्षिणा, दान यात खर्च करतो म्हणजे जेंव्हा मी मरेन त्याचे पुण्य मला मिळेल." राजाने हे उत्तर ऐकताच आनंदित होवून लाकुडतोड्याचा मोठा सन्मान केला आणि मोठे इनाम देवून त्याला त्याच्या घरी पाठविले.*

*✅तात्पर्य:-*
*माणसाने मिळालेल्या पैश्याचा योग्य व व्यवस्थित वापर केला तर भविष्यातिल अडचणी कमी होतात.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

जालना नवोदय कट ऑफ लिस्ट 2025

इतिहासात पहिल्यांदाच नवोदय परीक्षामधील मुलांचे मार्क कळत आहेत. बघा यावर्षी चे मार्क्स